मतदार ओळखत्रासोबत आधार जोडणीसाठी नागरिकांना पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Ø मतदार ओळखत्रासोबत आधार जोडणीसाठी 1 ऑगपासून विशेष मोहीम यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- एका व्यक्तीचे कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने आता मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑगपासून ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छीक असून केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढले जावू शकत नाही. तरी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यानी केले आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज 6-ब तयार करण्यात असून तो निवडणूक आयोगाच्या eci.gov.in आणि https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र.6ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज 6ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जं क्रमांक 6-ब बिएलओ यांचे मार्फतही घरोघरी भेटी देवून गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराचे आयोजनामधुनही अर्ज क्रमांक 6-ब गोळा करण्यात येईल. मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्रमांक 6-ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी मनरेगा जॉब कार्ड बँक/पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमीत केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय मार्फत वितरीत केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहीत पेंशन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र सादर करता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी