प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पाण्यात जाणाऱ्या त्या दोघांवर फौजदारी कार्यवाही

Ø बाभुळगाव येथे दोघांना बचाव पथकाने काढले सुखरूप बाहेर धोक्याची सुचना दिल्यावर निष्काळजीपणाने बाहेर पडू नये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन यवतमाळ, दि 18 जुलै (जिमाका) :- धोक्याची सुचना देवूनही पाण्याची ठीकाणी जाणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे कोणीही जीवावर बेतेल असे धाडस करू नये व निष्काळजीपणाने बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. बाभुळगाव तालुक्यातील पालोती गावातील दोघेजण आज दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 पर्यंत पुराच्या पाण्यात झाडावर अडकले होते, त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बचाव पथकाने बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढले आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने पुराच्या पाण्यात जाऊ नये याबाबत वारंवार आवाहन करूनही पलोती येथील महादेव पवार (वय 55) व मारोती चव्हाण (वय 50) हे पाण्याच्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे या दोघांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी सुरू केली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी