कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत महिलांसाठी रोजगाराविषयक प्रशिक्षण

“ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” निशुल्क प्रशिक्षण यवतमाळ, दि 6 जुलै (जिमाका) :- महिलांना रोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी अमरावती येथे कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमरावती, कौशल्य विकास विभाग आणि नवगुरूकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर यांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत “ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” या कोर्सचे प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिलांना नामांकित कंपनी, स्टार्टअप मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असुन हे प्रशिक्षण महिलांकरिता निशुल्क व निवासी स्वरुपाचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने पर्यत असणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी महिलांचे वय 17 ते 28 वर्षे असावे व किमान शैक्षणिक पात्रता बरावी पास (विज्ञान, कला, वाणिज्य) असणे आवश्यक आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशिम येथील रहिवासी असलेल्या एकूण 200 लाभार्थी महिलांची निवड या प्रशिक्षणासाठी प्रवेश परिक्षेद्वारे करण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी 5 जुलै 2022 पासून सुरु होणार असून त्यामध्ये प्रशिक्षण प्रवेशाकरिता ऑनलाईन, ऑफलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षा 23 जुलै 2022 व ऑफलाईन परिक्षा 24 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेमध्ये चाळणी परिक्षा, इंग्रजी, सामान्य गणित व मुलाखत आदी घटकांचा समावेश असणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, दुरध्वनी क्रमांक 07232-244395 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी