25जुलै रोजी ‘सैनिक दरबार’

यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या फक्त वैयक्तिक अडीअडचणी व तक्रार असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे 15 जुलै 2022 पुर्वी सादर करून टोकण प्राप्त करावे. यापुर्वी लोकशाही दिन मध्ये सादर केलेली तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल. तरी सदहु सैनिक दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी