तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढला कल

यवतमाळ, दि. २२ : यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तंत्रनिकेतन प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत 1521 अर्जांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1065 अर्ज निश्चित केले आहेत. यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. प्रथम वर्षासाठी दिनांक 21 जुलै व थेट द्वितीय वर्षासाठी दिनांक 22 जुलै पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन व मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 60 अशा एकूण 300 जागांची प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत संस्थेच्या सुविधा केंद्रामध्ये 784 अर्ज निश्चित झाले आहेत. तसेच आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यासाठी 1521 अर्जांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1065 अर्ज निश्चित केले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे. शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष तंत्रनिकेतन प्रवेशासाठी सुविधा केंद्राची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी www.poly22.dte.maharashtra.gov.in व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी www.dsd22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज नोंदणी करता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रा. केशव बेले (9423940081) आणि प्रा. प्रशांत सब्बनवार (9823664631) तर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी प्रा. वैभव येडे (9503746496) यांचेशी संपर्क साधावा, असेही यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी