Posts

Showing posts from May, 2018

जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन

Image
                                 v पालकमंत्र्यांनी घेतली रेशीम विकास आढावा बैठक यवतमाळ, दि. 28 : रेशीम शेती उद्योगासाठी यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान अतिशय अनुकूल आहे. कृषीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला तसेच शेतक-यांचे उत्पन्न वाढविणारा हा उद्योग आहे. जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असलयाने सन 2018-19  या वर्षात जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात रेशीम विकास आढावाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक संजय कदम, अमरावती येथील सहसंचालक एम.बी. ढवळे, शास्त्रज्ञ डॉ. कुशवाह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा रेशीम अधिकारी पी.एम. चौगुले उपस्थित होते. जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चांगली मागणी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, तुतीच्या लागवडीकरीता शेतकरी पुढकार घेत आहे. जिल्ह्यातील बेंब

चापडोह धरणग्रस्तांना त्वरीत मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री मदन येरावार

Image
                                              v यावली येथे वाढीव धनादेश वाटप कार्यक्रम यवतमाळ, दि. 28 : यवतमाळ शहराची तहान भागविणा-या चापडोह धरणासाठी यावली येथील शेतक-यांनी जमिनी दिल्या. या धरणासाठी ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, त्या शेतक-यांना शासनाने मोबदला दिला. मात्र वाढीव मोबदल्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यानंतर तो मंजूर करण्यात आला. यानंतरही काही उर्वरीत शेतकरी मोबदल्यापासून वंचित असतील तर त्यांना तो मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. यावली येथे वाढीव धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, गावच्या सरपंचा ज्योती वरठी, उपसरपंच विनोद चव्हाण, तंटामुक्त समितीचे विठ्ठल जाधव, मोनाली राठोड आदी उपस्थित होते.  चापडोह धरणाच्या विकासात यावलीकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, चापडोहमुळे यवतमाळची तहान भागते. पिण्याच्या पाण्यासाठी कार्यरत होणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. नगर पालिका हद्दित पाणी पुरवठा होत असल्यामुळे हे धरण नगरविकास विभागाकडे आह

पालकमंत्र्यांनी घेतला श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज समाधी स्थळ विकासाबाबत आढावा

Image
v प्रथम टप्प्यात सहा तर दुस-या टप्प्यात चार कोटींचा निधी वितरीत यवतमाळ, दि. 25 : दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज समाधी स्थळाच्या विकासाबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी आज (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत लाखाणी, नगररचना विभागाचे सहायक संचालक मा.गो.सुर्यवंशी, मुंगसाजी महाराज देवस्थान संस्थानचे अध्यक्ष संजय देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज समाधी स्थळाच्या पायाभुत विकासासाठी शासनाने 25 कोटी रुपये मंजूर केले आहे. यात सर्व पायाभूत सुविधांचा समावेश आहे. आतापर्यंत सहा कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून यात महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह व बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम, पालखी मार्गाचे बांधकाम आणि धामणगाव ते कोहळा रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत 19 कोटी रुपयांपैकी प्रथम टप्प्यात चार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. शासन

‘महाराष्ट्र वार्षिकी - 2018’ चे जिल्हाधिका-यांचे हस्ते विमोचन

Image
v जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी संदर्भग्रंथ उपलब्ध यवतमाळ, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी – 2018’ चे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, माहिती व सुचना केंद्राचे राजेश देवते, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. ज्ञान व माहितीचा खजिना असलेल्या महाराष्ट्र वार्षिकीमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची  कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दुरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना यात उपलब्ध होणार आहे. या शिवाय मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधीत गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानम

तरुण शेतक-याने मूरमाड जमिनीवर फुलवली शेती

Image
v फळवर्गीय आणि भाजीपाल्यातून वर्षाकाठी 6 लक्ष रुपये नफा v विहिर पुनर्भरणातून बारामाही शेतीला पाणी यवतमाळ ,   ता .   24   :   मुरमाड पडीक जमिनीला काळी कसदार करून नंदनवन करण्याची किमया तरुण शेतक-याने केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन या तरुणाने फळवर्गीय आणि भाजीपाल्याची लागवड शेतीत केली आहे. यातून वर्षाकाठी त्याला निव्वळ नफा 6 लक्ष रुपये होत असून फळविक्रितून दरमहा हातात पैसा राहत आहे. शिवशंकर मारोती वाटोळे (35) असे या उपक्रमशील तरुण शेतक-याचे नाव आहे. महागाव तालुक्यातील कावरवाडी (इजारा) येथे त्याची 13 एकर शेती आहे. मूळचा पुसद तालुक्यातील सेलूवाडी येथील रहिवासी असलेल्या शिवशंकरने 2011 मध्ये कावरवाडी येथे शेती विकत घेतली. संपूर्ण मुरमाड, पडीक असेच चित्र होते. या जमिनीलाच काळी कसदार करण्याचा त्याने चंग बांधला. पाच-पन्नास नव्हे तर तब्बल 200 ट्रॅक्टर काळी माती जमिनीवर टाकून त्याला समतल केले. बांध काढून संपूर्ण जमिनीचा उतार ज्या भागात एकत्र येतो तेथे विहिर खोदली. पहिल्या वर्षी विहिरीला पाणी लागले नाही म्हणून शेतात बोअर केली. यातून हिरवाईचे स्वप्न दृष्टीक्षेपास

शेतक-यांसाठी 20, 26 व 27 मे रोजी ‘अर्ज द्या, कर्ज घ्‍या’ मेळावा

Image
v बळीराजा चेतना अभियानातर्फे बॅंक शाखा स्‍तरावर कर्ज मेळावे यवतमाळ , दि. 18 : खरीप हंगामाला सुरवात झाली असून पेरणी तोंडावर आलेली आहे. अशावेळी शेतक - यांना बॅंकाकडून तातडीने कर्ज पुरवठा होण्‍याची गरज आहे. त्‍यामुळे बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील 239 बॅंकांच्‍या शाखा स्‍तरावर ‘ अर्ज द्या , कर्ज घ्‍या ’   मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. हे मेळावे 20 , 26 व 27 मे रोजी   घेण्यात येणार आहे. या कर्ज मेळाव्‍याचा लाभ शेतक-यांनी घ्‍यावा. तसेच या कर्ज मेळाव्‍यात आपल्‍या गावातील शेतक-यांना कर्ज मिळवून देण्‍यासाठी ग्रामस्‍तरीय समितीचे अध्‍यक्ष व सचिव यांनी पुढाकार घ्‍यावा , असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.                     खरीप हंगामात शेतक-यांना कर्जासाठी बॅंकांमध्‍ये चकरा माराव्‍या लागतात. काग द पत्रांची पूर्तता करण्‍यासाठी त्रास सहन करावा लागतो. जर वेळीच पतपुरवठा झाला नाही तर शेतकरी आपल्‍या शेतामध्‍ये पेरणी करू शकणार नाही. त्‍यामुळे शेतक-यांची कर्जासाठी होणारी पायपीट थांबविण्‍यासाठी , त्‍यांना एकाच छताखाली सुलभरित्‍या कर्ज उपलब्‍ध व्‍हा

बेंबळा पुनर्वसीत गावठाणातील नागरी सुविधेकरीता प्रशासकीय मार्ग मोकळा

v पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नांना यश       यवतमाळ, दि. 18 : बेंबळा प्रकल्पांतर्गत हस्तांतरीत झालेल्या 17 पुनर्वसीत गावठाणातील नागरी सुविधा दुरुस्ती तथा आधुनिकीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून ही जाचक अट रद्द करण्यात आली असून शासनाने याबाबत पत्र काढले आहे.             28 ऑगस्ट 2015 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेंबळा प्रकल्पास भेट दिली होती. यावेळी त्यांनी पुनर्वसीत गावठाणातील नागरी सुविधा नव्याने दुरुस्ती तथा दर्जेदार पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दर्जेदार पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. शासनाने बेंबळा प्रकल्पांतर्गत यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील पुनर्वसीत गावठाणातील नागरी सुविधेच्या आधुनिकीकरणासाठी 88.46 कोटी किंमतीच्या प्रस्तावास काही अटींसह मान्यता दिली.             त्यानुसार हस्तांतरीत न झालेल्या गावातील नागरी सुविधांच्या दुरुस्तीसाठी नागरी सुविधेवर झालेल्या खर्चाच्या 20 टक्क्यांपर्यंत प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधि

ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत राळेगाव सर्कलमध्ये विविध कार्यक्रम

Image
यवतमाळ, दि. 1 0 : केंद्र शासनाच्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत 14 एप्रिल ते 5 मे या कालावधीत राळेगाव सर्कलमध्ये आ.प्रा.अशोक ऊईके यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम घेण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त करंजी ता.केळापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच गावातील नागरीक, शेतकरी, शेतमजूर दलीत यांच्याशी संवाद साधून त्यांना ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली. स्वच्छ भारत पर्व ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत शरद ता. कळंब येथे ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, गावासाठी प्रचार प्रसार जनजागृती, प्रत्येक घरी शौचालय अभियानाला गती द्यावी म्हणून कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, शेतमजूर महिला इत्यादी व शासनाचे कर्मचारी उपस्थित होते. उज्वला पंचायत अभियानांतर्गत डेहणी ता. बाभुळगाव येथे उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण तसेच या   कार्यक्रमांतर्गत गॅस कनेक्शन वितरण, पात्र ग्राहक नोंदणी अभियानाच्या माध्यमातून किन्ही जवादे ता.राळे

आगामी वर्षात टँकरमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट ठेवा - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

Image
       यवतमाळ, दि. 2 : यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी यवतमाळ जिल्हा हा पाण्याचे स्त्रोत असलेला जिल्हा आहे. अशा स्त्रोतांचा शोध घेऊन पिण्याचे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना त्वरीत पूर्ण करून सन 2018-19 या वर्षात जिल्हा टँकरमुक्त करण्याचे अधिका-यांनी उद्दिष्ट ठेवावे, अशा सुचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जिल्हा खनीकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी. राठोड आदी उपस्थित होते.             गतवर्षी ग्रामीण भागात तसेच शहरात टँकरची संख्या कमी होती, मात्र यावर्षी त्यात वाढ झाली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता न

पालकमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल स्वाक्षरी सातबाराचे वाटप

Image
v उत्कृष्ट काम करणा-या तलाठ्यांचा सत्कार       यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र दिनानिमित्त यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातसुध्दा पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, राष्ट्रीय सुचना केंद्राचे कन्नेवार आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, डिजीटल स्वाक्षरी सातबारा वाटप कार्यक्रम संपूर्ण राज्यात आजपासून सुरू झाला आहे. याकरीता महसूल विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी मेहनत घेतली. सातबारा हा शेतक-यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अनेक अडचणींचा सामना करीत महसूल विभागाने कमी दिवसात हे काम केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहे. अनेक बाबतीत जिल्हा अव्वल आहे. डिजीटल स्वाक्षरी सातबारा वाटपातसुध्दा यवतमाळ जिल्ह्याने अव्वल राहावे. महसूल विभाग हा सर्वसामान्य माणसाशी निगडीत असा विभाग आहे. त्यामुळे समाजाची मोठी जबाबदारी या विभागावर आहे. गोरगरीब जनतेला चांगली सेवा देण्याचा आप

सर्व घटकांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री मदन येरावार

Image
v जिल्ह्यात फॅगशीप योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी v पाण्याच्या संवर्धनासाठी श्रमदान करा v टंचाईच्या काळात काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 2 : या देशातील गोरगरीब, सामान्य नागरिक, शेतकरी, दुर्बल व वंचित घटक यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या आहेत. त्याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. समाजातील सर्व घटकांसाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आदी उपस्थित होते.     शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्य शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेची व्याप्ती