Posts

Showing posts from July, 2016
टिपेश्वर अभयारण्याच्या विकास आराखड्यासाठी 50 लाख -पालकमंत्री संजय राठोड * उत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यावर भर *अभयारण्यात राहण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न * नियोजन निधीमध्ये विशेष तरतूद करणार यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य नैसर्गिक संपदेने नटलेले एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करावा, यासाठी संपूर्ण मदत देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. येथील विश्रामगृह येथे आज टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन विकासाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी दिपककुमार मिना, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जंगल सफारी आणि व्याघ्र पर्यटनासाठी राज्यभरातील नागरीक आता टिपेश्वरचे  नाव घेऊ लागले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत हे अभयारण्य आहे. त्यामुळे याठिकाणी पोहोचण्याचा प्रश्न नाही. मात्र याठिकाणी पर्यटकांना राहण्याची चांगली व्यवस्था नाही. परिणामी केवळ दि
Image
महसूल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेचा फोटो 
Image
नेर येथील पुतळ्यांचे सौदर्यीकरण करणार -पालकमंत्री संजय राठोड             यवतमाळ, दि. 30 : नेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दर्गा अशा तिनही स्थळांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेऊन नेर येथील पुतळ्यांचे सौदर्यीकरण करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज विश्रामगृहात नगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.             पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, नेर शहरात सार्वजनिक उपयोगासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नागरीकांनी त्यांना सोयीच्या ठिकाणी महापुरूषांचे पुतळे उभारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत जागी असलेले पुतळे आणि बांधकाम हटवावे लागणार आहे. त्यामुळे नेर येथीलही पुतळ्याचा प्रश्न समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत कमी जागेत आहे. याच ठिकाणी या पुतळ्याचे सौदर्यीकरण करणे शक्य होणार नाही. त्यासाठी शिवाजीनगर येथील उद्यानात हा पुतळा हलविला जाऊ शकतो काय याबाबत स्थानिक नागरीकांशी चर्चा करावी. नागरीकांनी सहमती दर्शविल्यास याच
कृषि शेतमाल विक्री केंद्राचा पालकमंत्र्यांकडून आढावा *आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश             यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शेतमाल विक्री केंद्राचा आराखडा तातडीने तयार करून कामाला सुरवात करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. 5 जून रोजी या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.             शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, यासाठी त्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यवतमाळ येथे सर्वसोयींनी युक्त असे केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचा आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात यावी. त्यानंतर हा आराखडा मुख्यमंत्री यांच्या मान्यतेस पाठविण्यात येणार आहे. सुरवातीला शेतकऱ्यांना तातडीने जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पहिल्या माळ्यावर 35 दुकाने उभारण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. याच ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण हॉल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक कक्ष आदी उभारण्याचा मानस आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात निधीची क
Image
टाकळी-डोल्हारी प्रकल्पाच्या भूसंपादनाचे नियोजन करावे -पालकमंत्री संजय राठोड             यवतमाळ, दि. 30 : नेर तालुक्यातील टाकळी-डोल्हारी येथील मध्यम प्रकल्प परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प सुरवातीच्या काळात आहे, त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज विश्रामगृह येथे टाकळी-डोल्हारी प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता राजेश काटपेल्लीवार आदी उपस्थित होते.             पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, नवे प्रकल्प हाती घेण्यापूर्वी जे जुने प्रकल्प 80 टक्के पूर्ण झालेले आहे, ते पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊन ते पूर्ण करण्यात येत आहे. तसेच त्यावरील सिंचन क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. मध्यम प्रकल्पाची उपयोगिता आणि जे प्रकल्प केवळ सुरवातीच्या टप्प्यात आहेत, अशा प्रकल्पांना शासनाकडून निधी मिळणे कठिण आहे. टाकळी-डोल्हारी हा प्रकल्पाचे अद्यापही भूसंपादन किंवा पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पासमो
प्रधानमंत्री पिक विमा योजनेस 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ             यवतमाळ दि. 30 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2016 ही अंतिम मुदत देण्यात आली होती, परंतु हा कालावधी कमी पडल्याने शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता दि. 2 ऑगस्ट 2016 पर्यत योजनेत सहभागी होण्यास मुदतवाढ दिली आहे.             प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 करिता अधिसुचित क्षेत्रातील पिकांकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2016 होती. ही योजना नवीन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागणी लक्षात घेता केंद्र शासनाने अंतिम मुदत वाढवुन 2 ऑगस्ट केली आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 2 ऑगस्टपर्यत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 00000
मानसेवी होमगार्डची सदस्य नोंदणी             यवतमाळ दि. 30 : जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्यातर्फे मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी जिल्ह्यातील पुसद, वणी, पांढरकवडा, दारव्हा आणि यवतमाळ येथे सुरू करण्यात आली आहे. यातील 595 रिक्त पदांसाठी पुरुष आणि महिला होमगार्ड सदस्य नोंदणी दि. 20 ऑगस्‍ट रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, गुरुद्वारा जवळ, आर्णी रोड, वाघाडी येथे सकाळी सात वाजल्यापासून घेण्यात येणार आहे.             पद भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास, पुरुषांकरिता उंची 162 सेंमी व महिलासाठी 150 सेंमी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना शारिरीक चाचणीत धावणे, गोळाफेक आदी चाचण्या पुर्ण कराव्या लागेल. उमेदवारास ज्या  पोलिस स्टेशनला नाव नोंदणी करावयाची आहे, तो त्याच ठिकाणाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. होमगार्ड नोंदणीबाबतची  विस्तृत माहिती जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, समादेशक अधिकारी होमगार्ड आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड कार्यालय या ठिकाणी उपलब्ध आहे. होमगार्ड नोंदणी नि:शुल्क असून उमेदवारांनी मोठ्या संख्येने स्वखर्चाने नोंदणीसाठी उपस्थित राहावे लागेल, असे जिल्हा समादेशक होमगार्ड डॉ. काका
प्रकल्पासाठी जमिन आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव द्यावेत यवतमाळ, दि. 29 : यवतमाळ प्रदेश प्रादेशिक योजनेत संबंधित विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पासाठी जमिन आरक्षित ठेवण्यासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाचे कार्यालयातील सहाय्यक संचालक यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्याच्या प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि यवतमाळ प्रदेशची  स्थापना करण्यात आली आहे. यातील प्रादेशिक योजना एका वर्षाच्या आत शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावयाच्या आहेत. यासाठी यवतमाळ प्रदेश प्रादेशिक योजनेत संबंधित विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पासाठी जमिन आरक्षित ठेवावयाची असल्यास गावाचे नाव, गट क्रमांक, आवश्यक क्षेत्रफळ, सात-बाराचा उतारा आदी माहिती तीन महिन्याच्या आत प्रादेशिक मंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयात सादर करावी, यासाठी शासनाने कालमर्यादा ठरवून दिली असल्याने यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 00000
जिल्हा न्यायालयात सोमवारी मोबाईल लोकअदालत यवतमाळ, दि. 29 : ‘मोबाईल विधी सेवा-कम-लोकअदालत’ योजनेंतर्गत यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयात सोमवारी, दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव यांच्या हस्ते मोबाईल लोकअदालतीचे उद्घाटन होईल. याचा नागरिकानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव एस. एम. आगरकर यांनी केले आहे. 00000
जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीत प्रवेशाची संधी *16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागणार यवतमाळ, दि. 29 : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीमध्ये प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रवेश परिक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. हे अर्ज दि. 16 सप्टेंबर पर्यंत स्विकारले जातील. तसेच ही प्रवेश परिक्षा रविवारी,  दि. 8 जानेवारी 2017  रोजी होणार आहे. परिक्षेचे आवेदन पत्र आणि माहिती पुस्त‍िका माध्यमिक शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात मोफत उपलब्ध आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी जिल्ह्यातील शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळेत पाचवीमध्ये सन 2016-17 या वर्षात शिकत असावा. विद्यार्थ्याने सन 2014-15, 2015-16 व 2016-17 मध्ये सलग इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी उत्तीर्ण केलेली असावी. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2004 ते 30 एप्रिल 2008 च्या दरम्यान असावा. नवोदय विद्यालयात 75 टक्के जागा ग्रामीण विद्यार्थ्यासाठी राखीव असतील. 15 टक्के जागा अनुसूचित जाती, 7.5 टक्के जागा अनुसूचित जमाती आणि 3 टक्के जागा अपंग उमेदवारांकरीता राखीव राहतील. संपु
सोमवारी लोकशाही दिन यवतमाळ, दि. 29 : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी, दि. 1 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000
सव्वाकोटीच्या सावकारी कर्जातून 1087 शेतकऱ्याची मुक्तता *शेतकऱ्यांना मिळाला सावकारी कर्जातून दिलासा *जिल्हास्तरीय समितीकडून आदेश पारीत यवतमाळ, दि. 29 : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय 2014च्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी एक कोटी 14 लाख रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले आहे. यामुळे 1087 शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन त्यांची सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्यासोबतच सावकराकडे असलेले तारणही परत मिळणार आहे. नोंदणीकृत सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज आणि त्यावरील व्याज या योजनेंतर्गत सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे सावकारांकडे असलेले तारण परत करण्यात येऊन सावकाराकडून त्यासंबंधीचे हमीपत्र सादर करावे लागत आहे. जिल्ह्य
Image
अल्‍प भूधारक शेतकऱ्याच्‍या मुली बनणार डॉक्टर *बळीराजा चेतना अभियानाची साथ *गोंदिया, नागपूर येथे प्रशासाठी मदत यवतमाळ,  दि. २८ : अल्‍प भूधारक शेतकऱ्याच्‍या दोन मुली वैद्यकीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेतही अव्‍वल  ठरून केवळ आर्थिक संकटामुळे एमबीबीएस प्रवेशसाठी रखडला होता.  मात्र, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेल्‍या बळीराजा चेतना अभियानाच्‍या आर्थिक मदतीमुळे एकीचा गोंदिया, तर दुसरीचा नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. त्‍यांना अभियानाच्या माध्यमातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून प्रवेशासाठी मदत दिल्‍याने त्‍यांचा डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुभाष गायकवाड यांच्‍या किरण आणि पूजा या नेर-नबाबपूर येथील दोन भगिनी. बारावीच्या परीक्षेत किरण गतवर्षी ८७ टक्के गुण घेऊन तर पूजा ९०.१५ टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाली. या दोघींनी यंदा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दिली. किरणला सीईटी परीक्षेत १६४ तर पूजाला १७७ गुण मिळाले. किरणचा गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि पूजाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रव
Image
बळीराजातून १५ शेतकऱ्यांना कर्करोगासाठी मदत *शेतकऱ्यांनी प्रस्‍ताव पाठविण्‍याचे आवाहन यवतमाळ, दि.२८ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यातील कर्करोगग्रस्‍त (कॅन्‍सर) शेतकऱ्यांना उपचारासाठी हातभार लागावा, यासाठी ‘कर्करोगपिडीतांना बळीराजा चेतना अभियानाची मदत’ ही योजना अंमलात आणलेली आहे. यातून जिल्‍ह्यातील १५ कर्करोगग्रस्‍त शेतकऱ्यांना प्रत्‍येकी १० हजारांची मदत देण्‍यात आली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांच्‍या खांद्यावरील आर्थिक भार कमी झाल्‍याने दिलासा मिळत आहे. या योजनेचा लाभ पिडीत शेतकरी कुटुंबियांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतीवरच उपजिविका असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एखादा सदस्य कर्करोगाने पिडीत असल्यास अशा व्‍यक्तींच्या उपचारासाठी १० हजार रूपये बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या खात्‍यामध्‍ये जमा झालेल्‍या लोकवर्गणीतून देण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबांसाठी कर्करोगाची समस्या ही गंभीर स्वरूपाची असून त्याच्या उपचारासाठी कुटुंबांना पैशाची तजवीज करावी लागते. उपचारासोबत तपासणी, औषध, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीकरिता जाण्यासाठी वाहतूक खर्च, रूग्णालयात उपच
आर्थिकदृष्ट्या सबळ झाल्यास शिधापत्रिका बदलून घ्यावी *तहसिलदारांचे आवाहन यवतमाळ, दि. 28 : अंत्योदय, बीपीएल प्राधान्य योजनेंतर्गत शिधापत्रिका काढून शासकीय योजनेचा आर्थिकदृष्ट्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र सध्यास्थितीत ही शिधापत्रिकाधारक आर्थिकदृष्ट्या सबळ झाले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन या शिधापत्रिका बदलून घ्याव्यात, असे आवाहन यवतमाळ येथील तहसिलदार यांनी केले आहे. प्रशासनातर्फे येत्या काळात अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांची सखोल व सुक्ष्म चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे कार्य तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. अपात्र शिधापत्रिकाधारक शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अंत्योदय, बीपीएल शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेत बदल करून शुभ्र शिधापत्रिका काढून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000
पांढरकवडा येथे शनिवारी मौखिक आरोग्य तपासणी यवतमाळ, दि. 28 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालयाच्या वतीने पांढरकवडा येथील उपजिल्हा रूग्णालयात शनिवारी, दि. 30 जुलै रोजी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार या सप्ताहात पांढरकवडा येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत उपजिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दंत चिकित्सकाच्या माध्यमातून मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा परिसरातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. 00000
शिष्यवृत्तीची अखर्चित रक्कम जमा करावी *रक्कम जमा न करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई यवतमाळ, दि. 28 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, शिक्षण फी आणि परिक्षा फीच्या महाविद्यालयांकडे असलेल्या अखर्चीत रकमा, अग्रीम, रकमा त्वरीत शासन खाती जमा करण्यात यावी. ही रक्कम जमा न करणाऱ्या प्राचार्य, संस्थाविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच 2015-16 च्या भरलेल्या अर्जाच्या हार्ड कॉपी त्वरीत सादर करण्यात याव्यात, अशा सुचना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. 00000
रूग्णालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन * 14 ऑगस्टपर्यंत नोंदणीकरणाचे अर्ज सादर करावेत यवतमाळ, दि. 28 : बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार नोंदणीकृत नसणाऱ्या रूग्णालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने केले आहे. जिल्ह्यातील अनेक रूग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार नोंदणी केलेली नाही. रूग्णालयांनी नोंदणीकण आणि नुतनीकरण केलेले नसले ही बाब   बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टचे उल्लंघन करणारी आहे. या कायद्याच्या कलम 27 नुसार नोंदणी नसणाऱ्या रूग्णालयांना दहा हजार रूपये दंड व तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. नोंदणी केल्यानंतर याची वैधता तीन वर्षापर्यंतच आहे. नोंदणी झालेली नसणे किंवा नुतनीकरण केलेली नसल्यास संबंधित रूग्णालयांची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात येत नाही. यामुळे रूग्णालयांनी 14 ऑगस्टपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणीकरणाचे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी आणि नुतनीकरण केले नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे.
वणीतील अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला *माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केली प्रवेशाची व्यवस्था यवतमाळ, दि. 28 : वणी येथील अकरावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील वंचित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची व्यवस्था माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केली आहे. शहरातील विविध महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची निर्देश देऊन प्रवेश देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न आता मिटला आहे. अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक महाविद्यालय, एसपीएम उच्च माध्यमिक विद्यालय, वणी पब्लिक उच्च माध्यमिक विद्यालय, लायन्स उच्च माध्यमिक विद्यालय याठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित महाविद्यालयांना देण्‍यात आली आहे. या महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी यादीनुसार प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार शालेय शुल्क आकारून प्रवेशाची कार्यवाही करावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे. 00000
माजी सैनिकांसाठी सैनिक दरबाराचे आयोजन यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांच्या काही अडीअडचणी असल्यास त्यांनी त्या लेखी स्वरूपात सर्व कागदपत्रांसह दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतीमध्ये दिनांक 8 ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दाखल करून टोकन प्राप्त करून घ्यावे. मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जाचा विचार पुढील सैनिक दरबाराच्यावेळी करण्यात येईल. मोघम स्वरूपाच्या समस्यांचे निवेदन, तसेच न्याय प्रविष्ठ असलेली प्रकरणे सादर करू नये. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांनी या दरबाराचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. 00000
माजी सैनिकांचा पाल्यांना शिष्यवृत्ती *15 ऑक्टोबरपूर्वी अर्ज सादर करावेत यवतमाळ, दि. 28 : कल्याणकारी निधीमधून माजी सैनिकांचा अथवा त्यांच्या विधवा पत्नीच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. मागिल शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदविका, पदवी परिक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच पी.एच.डी. किंवा तत्सम विषयामध्ये संशोधनपर अभ्यास करणाऱ्या आणि 2016-17 या शैक्षणिक वर्षात पुढील शिक्षण घेणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांनी 15 ऑक्टोबर 2016 पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. एखाद्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यास प्रवेश दिनांकापासून एका महिन्याच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे. ज्या पाल्यांनी सीईई, जेईईसाठी गॅप घेऊन पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे, त्यांना गॅस सर्टिफीकेट जोडणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी विहित नमुना अर्ज जिल्हा सैनिक कल्याण आणि yavatmal.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असून अर्जासोबत माजी सैनिक, विधवांच्या ओळखपत्राची झेरॉक्सप्रत, बोनाफाईड सर्टिफीक
आज आसोला येथे विशेष चर्मरोग तपासणी शिबिर यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्वचारोगाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आसोला येथे एक दिवसाचे विशेष चर्मरोग निदान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी, दि. 29 जुलै रोजी हे शिबिर घेण्यात येणार आहे. पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा, आसोली, करणवाडी, केळापूर आदी गावांमध्ये बुरशीजन्य आजाराची लागण झाली असल्याच्या तक्रारी आहे. या गावातील नागरीकांनी जिल्हाधिकारी यांची काल भेट घेऊन गावात त्वचारोगाचे विशेष शिबिर घेण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांच्याशी चर्चा करून या गावांमध्ये विशेष शिबिर घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बांगडे यांनी डॉ. अमर सुरजुसे, डॉ. सारस्त आणि डॉ. दुधाळकर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ विठ्ठल बुच्चे यांचे विशेष पथक तयार केले आहे. हे पथक संपूर्ण औषधसाठ्यासह शुक्रवारी आसोला येथे भेट देऊन संपूर्ण रूग्णांची तपासणी करणार आहेत. या रूग्णांना
विद्यार्थी अपघात योजनेतून 35 लाखांची मदत यवतमाळ, दि. 28 : पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांना होणाऱ्या अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येते. जिल्ह्यातील 49 विद्यार्थ्यांना 35 लाख 25 हजार रूपयांची मदत देण्यास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. ‍जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर उपस्थित होत्या. जिल्ह्यात 2014-15 आणि 2015-16 या दोन वर्षांमधीहल एकूण 57 विद्यार्थ्यांना मदत द्यावयाची होती. यापैकी 49 विद्यार्थ्यांना 35 लाख 25 हजार रूपयांची मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना केल्या. या योजनेत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूसाठी 75 हजार रूपये, अपघातामुळे दोन अवयव यामध्ये दोन डोळे किंवा एक अवयक आणि एक डोळा
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 27 जुलै ते 10 ऑगस्ट 2016 पर्यंत जमावास बंदी राहणार आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3)अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे. 00000
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्रावर जमावबंदी यवतमाळ, दि . 27   : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे   रविवारी, दिनांक   31 जुलै रोजी सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी   सचिंद्र प्रताप सिंह   यांनी फौजदारी दंड प्र क्रि या सहिंता 1973 चे कलम 144 जारी केले आहे. या कलमातील तरतुदीनुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परीक्षा   चालू   असताना सकाळी 8 ते सायं काळी   6 या कालावधीत परीक्षार्थी   आणि   परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी   आणि   कर्मचा ऱ्यां व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही ,   असेही या आदेशात न मु द करण्यात आले आहे. 00000
कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांचा कौतुक सोहळा प्रामाणिक माणुस बना : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यवतमाळ, दि. 27 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल न्याय मंडळ आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई संचालित रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टीस यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे कायदेविषयक जनजागृती शिबिर आणि बालकांच्या कौतुक सोहळा जिल्हा व सत्र न्यायालयातील सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी खुप मोठा माणूस बनण्यापेक्षा प्रामाणिक माणूस बना, असा सल्ला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यसाधीश डी. आर. शिरासाव अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, जिल्हा न्यायाधीश पी. एस. खुणे जिल्हा महिला व बाल‍ विकास अधिकारी अर्चना इंगोले उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मुलगा-मुलगी एकसमान असून त्यांना सारखी वागणूक दिली पाहिजे. व्यवस्थेत काम करीत असताना आपल्यासमोर बालकांचा विषय आल्यास स्वत:च्या मुलासारखे त्यांना वागणूक द्यायला हवी. मुलांना मार्गदर्शन करताना चुकीचे काम कर
Image
बळीराजाच्या दुसऱ्या टप्प्यात सामाजिक, कृषि समुदेशन - किशोर तिवारी *मदतीचे वाटप जाहिर कार्यक्रमात करावे *चांगल्या कामाचा सत्कार करणार *नाविण्यपूर्ण योजना सुचवाव्यात यवतमाळ, दि. 27 : बळीराजा चेतना अभियाना जिल्ह्यात सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. सर्व यंत्रणांच्या मदतीने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या अभियानातून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी सामाजिक आणि कृषि समुपदेशनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आज बळीराजा चेतना अभियानांतर्गत करावयाच्या मदतीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप‍ सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. श्री. त
Image
तंबाखूच्या कर्करोगाबाबत जनजागृती महत्त्वाची -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *संपुर्ण शाळा तंबाखूमुक्त कराव्यात *कार्यालय प्रमुखांवर दंडाची जबाबदारी *दुष्परिणामासाठी व्यापक मोहिम यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यातील बालके अत्यंत अल्प वयातच तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत. याचे दुरगामी परिणाम कर्करोगात होणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी याबाबत सजग राहून तंबाखूपासून होणाऱ्या कर्करोगाची शालेय आणि कार्यालयीन पातळीवर जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोगा दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांबाबत विरोधी मत तयार करताना व्यापक जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंबाखूमुळे झालेल्या नुकसानीचे चित्र किंवा इतर साहित्य तयार करून ते गावपातळीवर वितरीत करण्यात यावे. तं
Image
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती यवतमाळ, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संदीप महाजन, जिल्हा नाझर डी. जे. कडासने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 00000
कृषी विभाग पिक विमाचा अर्ज देणार * विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही यवतमाळ, दि. 26 : यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना खरीप 2016 च्या हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग होण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2016 आहे. या योजनेमध्ये भाग घेणेसाठी आवश्यक असणारे अर्ज बँकेकडे उपलब्ध नसल्यास हे अर्ज कृषि विभागाकडून उपलबध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या कृषी आयुक्तालयाचे निर्देशानुसार ज्या ठिकाणी विमा कंपनीकडून अर्ज उपलब्ध करून दिलेले नाहीत, त्या ठिकाणी कृषी विभागामार्फत विहित अर्जाचा नमुना उपयोगात आणून बिगर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी करून घेण्याच्यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा बँकांनी याबाबतची नोंद घेवून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, तसेच कोणताही शेतकरी विमा येाजनेमध्ये भाग घेण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता बँकांनी घ्यावी. कृषी विभागामार्फत विहित केलेला अर्जाचा नमुना वापरण्यासाठी बँकांना कळविण्यात आले असल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्
सोयाबिनवरील किडीच्या व्यवस्थापनाविषयी सल्ला यवतमाळ, दि. 26 :  सद्यापरिस्थितीत सोयाबिन पिक किमान सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसाचे झाले आहे. सोयाबिन पिकावर काही ठिकाणी मोझॅक रोगाला तुरळक प्रमाणात सुरुवात झाली आहे. तसेच उंट अळी, तंबाखुची पाने खाणाऱ्या अळींचा तसेच केसाळ अळीचा प्रादुर्भाव सुरु झाल्याच्या तक्रारी येत आहे. या सोयाबिन पिकावर यावेळेस खोडमाशी आणि चक्रभुंगा किडीचाही प्रादुर्भाव येत असतो. या किडीचा व्यवस्थापनाच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी वेळीच किड किंवा किडीच्या प्रार्दुभावाची आर्थिक नुकसान संकेत पातळी आढळून आल्यास केबल क्लेम शिफारशीत किटकनाशकाची फवारणी करावी, असे कृषी विज्ञान केंद्राने कळविले आहे. मोझॅक या रोगामध्ये झाडांची वाढ खुटलेली दिसते. पाने आखूड लहान, जाडसर, व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी लागतात व त्याही खुरटलेल्या सापडतात. या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यांपासून होतो. पिवळा मोझॅक या रोगामध्ये झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. मोझॅक