मानसेवी होमगार्डची सदस्य नोंदणी
            यवतमाळ दि. 30 : जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्यातर्फे मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी जिल्ह्यातील पुसद, वणी, पांढरकवडा, दारव्हा आणि यवतमाळ येथे सुरू करण्यात आली आहे. यातील 595 रिक्त पदांसाठी पुरुष आणि महिला होमगार्ड सदस्य नोंदणी दि. 20 ऑगस्‍ट रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, गुरुद्वारा जवळ, आर्णी रोड, वाघाडी येथे सकाळी सात वाजल्यापासून घेण्यात येणार आहे.
            पद भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास, पुरुषांकरिता उंची 162 सेंमी व महिलासाठी 150 सेंमी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना शारिरीक चाचणीत धावणे, गोळाफेक आदी चाचण्या पुर्ण कराव्या लागेल. उमेदवारास ज्या  पोलिस स्टेशनला नाव नोंदणी करावयाची आहे, तो त्याच ठिकाणाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. होमगार्ड नोंदणीबाबतची  विस्तृत माहिती जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, समादेशक अधिकारी होमगार्ड आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड कार्यालय या ठिकाणी उपलब्ध आहे. होमगार्ड नोंदणी नि:शुल्क असून उमेदवारांनी मोठ्या संख्येने स्वखर्चाने नोंदणीसाठी उपस्थित राहावे लागेल, असे जिल्हा समादेशक होमगार्ड डॉ. काकासाहेब डोळे यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी