कृषि शेतमाल विक्री केंद्राचा पालकमंत्र्यांकडून आढावा
*आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश
            यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शेतमाल विक्री केंद्राचा आराखडा तातडीने तयार करून कामाला सुरवात करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. 5 जून रोजी या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.
            शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, यासाठी त्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यवतमाळ येथे सर्वसोयींनी युक्त असे केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचा आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात यावी. त्यानंतर हा आराखडा मुख्यमंत्री यांच्या मान्यतेस पाठविण्यात येणार आहे. सुरवातीला शेतकऱ्यांना तातडीने जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पहिल्या माळ्यावर 35 दुकाने उभारण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. याच ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण हॉल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक कक्ष आदी उभारण्याचा मानस आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात निधीची कमतरता आणि संपूर्ण बांधकाम करण्यास वेळ लागणार असल्याने पहिल्या टप्प्यात केवळ पहिल्या माळ्यावरील कामाचे नियोजन करावे, त्यादृष्टीने आराखडा तयार करून मंजूरात घेण्यात यावी. यासाठी दोन कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती