लोकसंख्या स्थिरता पंधरवाड्याचे आयोजन
*नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन
*विविध कार्यक्रम राबविण्यात येणार
यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी ‘जबाबदारी स्विकारा, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करा’ असे आहे. सध्यास्थितीत राज्याने 1.8 इतका जननदर साध्य केलेला आहे. येत्या वर्षात एकूण जननदराची ही पातळी कायम ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दोन भागात राबविण्यात येणार आहे. यात दांपत्य संपर्क पंधरवाडा 27 जून ते 10 जुलै आणि लोकसंख्या स्थितरता पंधरवाडा 11 ते 24 जुलै दरम्यान आयेाजित करण्यात येणार आहे. दांपत्य संपर्क पंधरवाड्यात आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्तीमार्फत कुटुंब पाहणी, सर्व्हेक्षण यादी अद्ययावत करून घेण्यात येणार आहे. यातून उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य जोडप्यांची निवड करून कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पद्धती व सेवांची माहिती देण्यात येणार आहे. लोकसंख्या स्थितरता पंधरावाडामध्ये उपलब्ध कुटुंब नियोजन पद्धतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. प्रजन व बाल आरोग्य कार्यक्रम, लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्याबद्दल समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच कुटुंब आरोग्य मेळाव्याचे आयोजन, कुटुंब नियोजन साधनाचा वापर करणे, विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत तपासणी सुविधा, तांबी बसविणे, स्त्री-पुरूष नसबंदी करणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जागतिक लोकसंख्या दिनी जिल्हा व तालुकास्तरावर कुटुंब आरोग्य मेळावा तसेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रॅलीचे आयोजन, लिंगभेद, बेटी बचाव या विषयांवर मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, तससिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, हौशी कलावंत, स्वयंसेवी संस्था आदींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी