ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदारयाद्या दुरूस्ती कार्यक्रम
यवतमाळ, दि. 7 : आर्णी तालुक्यातील सप्टेंबर 2016 ते मे 2017 या कालाधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कापेश्वर येथील सार्वत्रिक निवडणूक आणि आयता वार्ड क्र. 1, बेलोरा (वन) वार्ड क्र. 2, 3, खडका वार्ड क्र. 2, शेकलगाव वार्ड क्र. 1, सायखेडा वार्ड क्र. 3, पाळोदी वार्ड क्र. 3 च्या पोट निवडणुकीसाठी मतदारयाद्या तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यानुसार 16 जानेवारी 2016 ही मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक आहे. राज्या निवडणूक आयोगाने अधिसुचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या प्रभाग निहाय मतदारयादीवरून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरीता प्रभाग निहाय मतदार यादी 12 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर 19 जुलै पर्यंत हरकती व सुचना दाखल करता येणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजी मतदारयादीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आर्णी येथील तहसिलदार यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी