केरोसीनचे जुलै महिन्यासाठी नियतन मंजूर
यवतमाळ दि. 5 : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी जुलै महिन्यांचे केरोसीन 50 टक्के द्वारवितरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. जुलै महिन्यातील 636 केएल केरोसीन पैकी 324 केएल केरोसीन द्वारवितरण प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केरोसीन नियतनामध्ये बदल करण्यात आले आहे. यापुढे केरोसीनचे वितरण सरळ किरकोळ केरोसीन परवानाधारकांना कंपनीकडील एजंटामार्फत तालुकास्तरावर द्वारवितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार घाऊक, अर्धघाऊक केरोसीन एजंटांना 25 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने केरोसीनची उचल करावी लागणार आहे. या वाटप केलेल्या केरोसीनची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी