रूग्णालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन
*14 ऑगस्टपर्यंत नोंदणीकरणाचे अर्ज सादर करावेत
यवतमाळ, दि. 28 : बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार नोंदणीकृत नसणाऱ्या रूग्णालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यातील अनेक रूग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार नोंदणी केलेली नाही. रूग्णालयांनी नोंदणीकण आणि नुतनीकरण केलेले नसले ही बाब बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टचे उल्लंघन करणारी आहे. या कायद्याच्या कलम 27 नुसार नोंदणी नसणाऱ्या रूग्णालयांना दहा हजार रूपये दंड व तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. नोंदणी केल्यानंतर याची वैधता तीन वर्षापर्यंतच आहे. नोंदणी झालेली नसणे किंवा नुतनीकरण केलेली नसल्यास संबंधित रूग्णालयांची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात येत नाही. यामुळे रूग्णालयांनी 14 ऑगस्टपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणीकरणाचे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी आणि नुतनीकरण केले नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्व नोंदणीकृत रूग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टच्या सर्व नियम व अटींचे पालन करावे, आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करावा आणि आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहाभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी