वसतीगृहासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
*प्रकल्प कार्यालयाचे आवाहन
यवतमाळ दि. 5 : अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि तालुकास्तरावरील वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरावा लागणार आहे. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेले यवतमाळ, मारेगाव, घाटंजी, झरी, राळेगाव, बाभुळगाव, पांढरकवडा, कळंब आणि वणी येथील वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 15 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर भरलेले अर्ज संबंधित वसतिगृहात स्विकारले जाणार नाहीत, याची विद्यालयीन, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल