सन्माननीय व्यक्तींचे स्वागत रोप, पुस्तक देऊन करा
*जिल्हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन
यवतमाळ, दि. 5 : जिल्ह्यामध्ये कामकाजाच्या निमित्ताने अधिकारी आणि मान्यवर व्यक्ती शासकीय कार्यालय आणि इतर ठिकाणी भेटी देत असतात. या मान्यवरांचे स्वागत प्रामुख्याने पुष्पगुच्छ देऊन करतात. मात्र पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी परिसरातील झाडांच्या फांद्या, पाने, फुले आणि वृक्षवेली तोडल्या जातात. यामुळे दुर्मिळ पक्षी आणि वन्यजीवन यांचा अधिवास आणि अन्न साखळी प्रभावित होते, तसेच परिसरातील निसर्ग सौंदर्यांची जपणूक करण्यावर मोठा परिणाम होत असल्याने सन्माननीय व्यक्तींचे स्वागत रोप, पुस्तके देऊन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र  प्रताप सिंह यांनी केले आहे.
स्वागतानिमित्त देण्यात आलेले रोपे विविध ठिकाणी लावण्यात आल्याने वृक्षांचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. तसेच पुष्पगुच्छांवर होणारा खर्चही वाचू शकेल. तसेच वन आणि वन्यजीव यांच्याशी संबंधित पुस्तक भेट दिल्यास त्यातील माहिती आणि ज्ञानाचा प्रसार-प्रचार होऊन वन आणि वन्यजीवनांचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी स्वागत आणि इतर कार्यक्रमाचे वेळी रोपे किंवा पुस्तक देऊन स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी