Posts

Showing posts from April, 2020

जिल्ह्यात कापूस खरेदीचा तिढा सुटला

Image
v पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून जिनिंग प्रतिनिधींचा सकारात्मक प्रतिसाद v चना व तूर खरेदीकरीता 31 मेपर्यंत मुदत यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतीय कापूस निगम (सीसीआय), कापूस पणन महासंघ (कॉटन फेडरेशन) यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलणी करून कापूस खरेदीचा तिढा सोडविला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व जिनिंगची बैठक घेऊन त्यांना कापूस खरेदीच्या सुचना केल्या. जिनिंगच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता जिल्ह्यात जिनिंगमध्ये कापूस खरेदी होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.   भारतीय कापूस निगमच्या अध्यक्षा पी. अल्ली इराणी यांच्यासह पालकमंत्र्यांनी पणन मंत्री, प्रधान सचिव, महाराष्ट्र कॉटन जिनिंग असोशिएशनचे अध्यक्ष श्री. राजपाल यांच्याशी संपर्क करून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील उपलब्ध असलेला सर्व कापूस खरेदी करण्याबाबत तात्काळ नियोजन करण्याचे संबंधितांना सुचित केले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व खाजगी तसेच सहकारी जिनिंगचे मालक, भारतीय कापूस निगम, कापूस पणन महासंघ, जिल्हा उप

33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी

Image
v दोन पॉझेटिव्ह वाढले, एकूण संख्या 78 वर यवतमाळ, दि. 30 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 2 जणांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78 वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 33 जणांना सुट्टी देण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. आयसोलेशन वॉर्डात गत 24 तासात एक जण भरती झाला असून सद्यस्थितीत भरती रुग्णांची संख्या 282 आहे. यापैकी 204 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. आज तपासणीकरीता सात नमुने पाठविण्यात आले. आतापर्यंत सुरवातीपासून एकूण 1155 नमुने तपासणीकरीता पाठविले आहे. यापैकी 1140 अहवाल प्राप्त आहे तर 15 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी 1052 नमुने निगेटिव्ह आले आहे. गत 24 तासात 15 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी दोन नमुने पॉझेटिव्ह, 10 निगेटिव्ह आणि तीन नमुने निश्चित सांगता येत असल्याने त्यांना तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार अ

मुख्यमंत्री सहायता निधीस दिव्यांग कृष्णाने दिला ‘खाऊ’

Image
v वाढदिवस साजरा न करता प्रशासनाकडे निधी सुपुर्द v जिल्ह्यातून सीएम आणि पीएम रिलिफ फंडकरीता 55 लाखांचा निधी यवतमाळ, दि. 30 : कोरोना विरुध्दची लढाई शासन, प्रशासन, सर्व यंत्रणा, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्यापरीने लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्यापरीने शासनास मदत करीत आहेत. यवतमाळमध्येसुध्दा एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेला ‘खाऊ’ चक्क मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपल्या वाढदिवसाची अनोखी भेट कोरोना लढाईसाठी दिली.   येथील वडगाव रोड भागातील जयसिंगपुरे ले-आऊटमध्ये राहणारा कृष्णा विनोद राऊत (13) हा जन्मत: दिव्यांग आहे. बुधवारी 29 एप्रिल रोजी त्याचा 13 वा वाढदिवस होता. मला कोणीही वाढदिवसाला काहीही भेट आणू नका तर कोरोनाची लढाई नेटाने लढणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांना मलाच ‘खाऊ’ भेट म्हणून द्यायचा आहे, असे त्याने सर्वांना सांगितले. आपला वाढदिवस साजरा न करता वर्षभर गोळा केलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची ही कल्पना त्याने आई, वडिलांना सांगितली. त्याचे वडील घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. हातावर

जीवनाश्यक वस्तु : 30 एप्रिलपासून दुकानाची वेळ आता सकाळी 8 ते 12

Image
v यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व शहरी व ग्रामीण भागासाठी आदेश यवतमाळ, दि. 29 : यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांचे रिपोर्ट सतत पॉझेटिव्ह येत असल्यामुळे 28 व 29 एप्रिल 2020 रोजी यवतमाळ शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दुपारी 12 ते 3 कालावधीत सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे कामकाज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेशित केले होते. मात्र यात आता 30 एप्रिलपासून बदल होणार असून जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणची अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने व बँकांचे कामकाज एकाच वेळी सुरु ठेवण्याबबात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बुधवारी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 30 एप्रिल 2020 पासून खाली नमुद केलेल्या वेळेनुसार वस्तुंची सेवा, दवाखाने, बँका सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. किराणा माल, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला व फळे, अंडी, मांस, मासे, पशुखाद्याची दुकाने, पिठाची गिरणी, पिण्याच्या पाण्याचे दुकान व वाटप (ॲक

आणखी एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर, एकूण संख्या 76 वर

Image
v आयसोलेशन वॉर्डात 314 जण भरती यवतमाळ, दि. 29 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76 वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या नागरिकांची संख्या एकूण 314 झाली असून यापैकी 238 केसेस प्रिझेमटिव्ह आहे. गत 24 तासात आयसोलेशन वॉर्डात चार जण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1148 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 1125 रिपोर्ट आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. यात एकूण 1039 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 150 तर गृह विलगीकरणात एकूण 884 जण आहेत. आता सकाळी 8 ते 12 या वेळेत अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सुरू यवतमाळ शहर तीन दिवसांच्या लॉकडाऊनंतर दि. 28 आणि 29 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेशित करण्यात आले होते. मात्र भर दुपारच्या या वेळेत नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आता शहर लॉकडाऊन राहणार नाही. मात्र शहरातील प्रतिबंधित भाग वगळता उर्वरीत यव

अन्यथा जिनिंगवर कडक कारवाई करा – पालकमंत्री राठोड

Image
v शेतमाल खरेदी उपाययोजनेबाबत आढावा बैठक यवतमाळ, दि. 29 : शेतक-यांना दिलासा देण्यासाठीच शासनाकडून हमीभाव जाहीर होत असतो. या हमीभावाने शेतमालाची खरेदी हा शेतक-यांचा हक्क आहे. शेतक-यांचा कापूस सध्या घरात आहे. या कापसाची तात्काळ खरेदी केली तर खरीप हंगामासाठी शेतक-यांच्या हाती पैसे येतील. त्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगला निर्देश देण्यात यावे. अन्यथा चालढकल करणा-या जिनिंगवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. कापूस, चना व तूर खरेदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, कापूस पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक चक्रधर गोसावी, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक अमोल राजगुरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे, प्रभारी अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात एकूण 52 जिनिंग असून यापैकी 28 सीसीआय, 16 कॉटन फेडरेशन आणि उर्वरीत आठ खाजगी आहेत, असे सांगू

आतापर्यंत जिल्हाधिका-यांनी केले 15 मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

Image
यवतमाळ, दि. 29 : कोरोना विषाणु संसर्गामुळे आपात्कालीन आरोग्यविषयक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा 1897, संचारबंदी   व सर्वत्र लॉकडाऊन असतांना शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा-या 15 दुकानांचे परवाने आतापर्यंत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहे. यात सहा बार ॲन्ड रेस्टॉरंट, पाच देशी दारुची दुकाने, दोन वाईन शॉप, एक बिअर शॉपी आणि विदेशी दारुचे होलसेल असलेल्या एका गोदामाचा यात समावेश आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉक डाउन सुरू आहे. सोबतच   जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीसुध्दा या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्य विक्री करणारे चार देशी दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हा नोंद केला आहे. यात पुसद येथील सतीश भगवान यांच्या मालकीचे के.के.ट्रेडर्स, पुसद येथीलच अरविंद चव्हाण आणि मल्लेशाम पल्लेवार यांच्या मालकीच

75 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात 312 जण भरती

Image
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच असून आज (दि. 28) सहा जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 75 वर पोहचली असून या वॉर्डात एकूण 312 नागरिक भरती आहे. गत तीन दिवसांत 24 ते 27 एप्रिल या कालावधीत एकूण 393 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले. यापैकी पूर्ण 393 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत पाठविलेले एकाही नमुन्याचे अहवाल आता प्रलंबित नाही. आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1150 आहे. संस्थात्मक विलगीकरणात 195 तर गृह विलगीकरणात एकूण 837 जण आहे, असे प्रशासनाने कळविले आहे.  बुधवारी दुपारी 12 ते 3 यावेळेत दुचाकींना सुट : बुधवार दि. 29 एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेची दुकाने जसे किराणा, दुग्धजन्य पदार्थ, भाजी, फळे आदी खरेदी करण्याकरीता 12 ते 3 या वेळेत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ या वेळेत दि. 29 एप्रिल रोजी दुचाकी वाहनांना परवानगी राहील. यानंतर मात्र दुचाकी फिरविण्यास बंदी कायम राहील,असे प्रशासनाने कळविले आहे.

बँकांच्या वेळा आता दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत

Image
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात 15 एप्रिल 2020 नुसार दिनांक 3 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संचारबंदीच्या कालावधीमध्ये जीवनाश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा सुरु ठेवण्याबाबत प्रतिबंध करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बँकेत ग्राहकांची गर्दी होत असल्यामुळे सर्व बँकाच्या कामकाजाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. मात्र यवतमाळ शहरात रुग्णांचे रिपोर्ट सतत पॉझिटीव्ह येत असल्यामुळे दिनांक 28 व 29 एप्रिल 2020 रोजी यवतमाळ शहरातील बँकेच्या कामकाजाची वेळ दुपारी 12 ते दुपारी 3 पर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असल्यामुळे बँकेच्या आर्थिक व इतर कामात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे सर्व बँकेच्या कामकाजात एकसुत्रता राहण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बँकेचे व्यवहार एकाच वेळी सुरु ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2,

‘पॉझेटिव्ह ते निगेटिव्ह’ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
                                   v शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराबाबत आढावा यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसह संपूर्ण प्रशासन या आपात्कालीन परिस्थितीत अतिशय संवेदनशीलपणे काम करीत आहे. तरीसुध्दा भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक तथा बालरोग विभाग प्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके आदी उपस्थित होते. पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांवर योग्य उपचार ही अतिशय महत्वाची बाब आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शल्य चिकित्सक व जिल्ह

मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम

Image
  v ‘उमेदच्या’ बचत गटाच्या महिलांनी तयार केले पाच लाख मास्क यवतमाळ, दि. 28 : सद्यस्थितीत कोरोना विषाणुचे संकट सर्व जगावर पसरले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नागरिकांनी ‘मास्क’ वापरणे हाच आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून यवतमाळ जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) च्या बचत गटातील महिला पुढे सरसावल्या. नागरिकांसाठी मास्क निर्मितीचे काम या महिलांनी हाती घेतले आणि पाहता पाहता मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ठरला. उमेदच्या महिलांनी एक, दोन नव्हे तब्बल 5 लाख 15 हजार 775 मास्क एका महिन्याच्या काळात तयार केले.   यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1422 उमेदच्या महिला बचत गटांनी मास्क शिवण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी जिल्ह्यातून बचत गटाच्या 2466 महिला पुढे आल्या. या महिलांनी 5 लक्ष 15 हजार 775 मास्कची निर्मिती करून एक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे संकटाच्या या काळात ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेतून त्यांनी मास्कची निर्मिती केली. सामाजिक जाणीव लक्षात ठेवून गावातील नागरिकांना, गावातील अपं

कामगार नोंदणी नुतणीकरणची अट शिथील करा

Image
v पालकमंत्र्यांचे कामगारमंत्र्यांना पत्र यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड 1 जून 2018 पासून नुतणीकरण करण्यात आलेले नाही. यातील अनेक बांधकाम कामगारांनी नोंदणी कार्ड नुतणीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु यवतमाळ जिल्ह्यात गत वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकांची आचारसंहिता आणि आता कोरोनाचा संसर्ग यामुळे या कार्डांचे नुतणीकरण करण्याचे राहिले आहे. त्यामुळे कामगारांच्या नोंदणीकार्डच्या नुतणीकरणाची अट शिथिल करण्याबाबत राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.   यवतमाळ जिल्ह्यात मध्यंतरीच्या कालावधीत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका, तद्वनंतर यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची पोट निवडणूक तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची आदर्श आचारसंहिता असल्यामुळे बांधकाम मजूरांना ऑनलाईन पध्दतीने कार्ड नुतणीकरण करता आले नाही. सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कामग

पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार शेतमालाच्या खरेदी विक्रीला सुरुवात

Image
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय हमीभावानुसार व्ही.सी.एम.एफ. व डी.एम.ओ. मार्फत तूर व चना यांची खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात शेतमालाच्या खरेदी विक्रीला सुरवात करण्यात आली आहे. शेतक-यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात 16 खरेदी केंद्र असून त्यापैकी दिग्रस, दारव्हा, नेर व मारेगांव या तालुक्यामध्ये निधी व गोडावून अभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. त्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रावर तूर व चना खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी खाजगी गोडावून ताब्यात घेतलेत व शेतकऱ्याकडून खरेदी माल गोडावून मध्ये ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग उद्योगातील कामगार कोरोनामुळे गावाकडे गेले होते. परंतु त्यांना परत कामावर रुजू करून घेण्यासाठी कोविड – 19 च्य एसओपी (निकषानुसार) विशेष काळजी घेवून जिनिंग सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापूस खरेदीसुध्दा सुरु झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना म

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक निर्णय– पालकमंत्री संजय राठोड

Image
                                                                 v नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन v जिल्ह्यात 89 फिवर क्लिनिक सुरू यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जास्तीत जास्त नमुने तपासणीकरीता पाठविण्यात येत आहे. हा संसर्ग इतरत्र होऊ नये म्हणून आणखी कडक निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रशासन सर्व गोष्टींची अतिशय गांभिर्याने दखल घेत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी 15 तालुक्यात याचा संसर्ग नाही. यवतमाळ तालुक्यातसुध्दा कोरोनाचा संसर्ग नसून केवळ शहरात आहे. दिल्ली कनेक्शनचे लोक इतरत्र फिरले त्यामुळे याचा प्रादुर्भाव वाढला. तरीसुध्दा ही परिस्थिती पुर्ववत आणण्यासाठी तसेच विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन नियोजनप

जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69 वर

Image
v आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण भरती यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात विशेषत: यवतमाळ शहरात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी 50 पर्यंत असलेला हा आकडा आज 69 वर गेला आहे. रविवारी मध्यरात्री नंतर 5 जणांचे, सोमवारी सकाळी 6 जणांचे तर संध्याकाळपर्यंत 8 जण असे एकूण संपूर्ण दिवसभरात 19 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. सद्यस्थितीत 69 ॲक्टिव्ह पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण भरती आहे. आयसोलेशन वॉर्डात आज तीन जण नव्याने भरती झाले आहे. आज नागपूरला तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 32 असून सद्यस्थितीत 102 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली. जीवनावश्यक वस्तुंसाठी तीन तासांची मुभा तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर यवतमाळ शहरात मंगळवारी आणि बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, किराणा, भाजीपाला, दुध, फळे आदी केवळ दिलेल्या वेळेतच सुरू राहतील. बाजार समितीची ठोक भाजीमंडी मात्र बंद राहणार आहे. तसेच घरोघरी भाजीचे हातठेले फिरविण्यास मुभा रा

प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची सीमा बंद

Image
यवतमाळ, दि. 27 : यवतमाळ शहरातील भाग क्र.10 आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे व पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे त्याभागास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून या भागाच्या 3 कि.मी. परिघाच्या सीमा बंद करण्यात आल्या. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात एकूण सहा प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले. यापैकी तीन क्षेत्र यवतमाळ शहरातील आहे. त्यानुसार कोराना विषाणुद्वारे बाधित व्यक्ती किंवा समुदायाच्या केंद्रबिंदुपासून 3 किलोमिटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालून मज्जाव करण्याबाबत निर्देशित केले आहे.           त्यानुसार यवतमाळ शहरातील इतर भागात कोरोना विषाणूचा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये यादृष्टीने पोलिस अधिक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार यवतमाळ शहरातील चापनवाडी, तारपूरा, शिंदेनगर, आठवडी बाजार, अलकबीर नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शुभंकर रोड, सुदर्

50 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती

Image
v रविवारी आणखी 16 जणांचे पॉझेटिव्ह अहवाल प्राप्त यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे. दि. 26 रोजी सकाळी पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेले सात रुग्ण सुरवातीला संस्थात्मक विलगीकरणात भरती होते. मात्र त्यांचे पॉझेटिव्ह अहवाल प्राप्त होताच त्यांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. तर दुपारी आणखी 9 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे दिवसभरात 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता 50 पॉझेटिव्ह रुग्णांसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. रविवारी एकूण 39 जण नव्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहेत. नागपूर येथे तपासणीकरीता आज 64 नमुने पाठविले असून सद्यस्थितीत 264 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. संस्थात्मक विलगीकरणात 166 जण तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहे. प्रशासनाच्यावतीने आवाहन : कोरोना विषाणुचा विळखा यवतमाळ जिल्ह्यात घट्ट होत आहे. रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे. तरीसुध्दा नागरिकांकडून निष्क