जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34 वर


v आज तपासणीसाठी पाठविले 163 नमुने
यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 14 वरून शनिवारी एकदम 34 वर पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. दि. 25 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार एकूण 20 रुग्णांचे नमुने पॉझेटिव्ह आले. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत एकूण 34 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहे. 
नव्याने पॉझेटिव्ह आलेले रुग्ण हे पूर्वी भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आले होते. तसेच त्यांच्या तीन कुटुंबातील सदस्यांचा यात समावेश आहे. गत काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या या रुग्णांचा रिपोर्ट शनिवारी महाविद्यालयाला प्राप्त झाला. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत एकूण 261 नागरिक भरती असून शनिवारी सकाळी 163 नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. आज दिवसभरात एकूण 12 रुग्ण भरती झाले आहेत. गत 24 तासात एकूण 38 रिपोर्ट प्राप्त झाल्या असून यापैकी एकूण 20 पॉझेटिव्ह, 14 निगेटिव्ह तर चार जणांचे रिपोर्ट तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 100 तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहेत.
शहरात प्रतिबंधित असलेल्या भागाचा जिल्हा प्रशासनाकडून नियमित सर्वे सुरू आहे. यात प्राप्त नमुनेसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीने रँडम पध्दतीने तपासणीकरीता पाठविण्यात येत आहे. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने समोर येऊन प्रशासनास माहिती द्यावी. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. शासन व प्रशासनाच्या दिलेल्या सुचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी