आणखी एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर, एकूण संख्या 76 वर


v आयसोलेशन वॉर्डात 314 जण भरती
यवतमाळ, दि. 29 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76 वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या नागरिकांची संख्या एकूण 314 झाली असून यापैकी 238 केसेस प्रिझेमटिव्ह आहे. गत 24 तासात आयसोलेशन वॉर्डात चार जण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1148 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 1125 रिपोर्ट आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. यात एकूण 1039 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 150 तर गृह विलगीकरणात एकूण 884 जण आहेत.

आता सकाळी 8 ते 12 या वेळेत अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सुरू
यवतमाळ शहर तीन दिवसांच्या लॉकडाऊनंतर दि. 28 आणि 29 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेशित करण्यात आले होते. मात्र भर दुपारच्या या वेळेत नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आता शहर लॉकडाऊन राहणार नाही. मात्र शहरातील प्रतिबंधित भाग वगळता उर्वरीत यवतमाळ शहरात अत्यावश्यक वस्तुंची दुकाने आता सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच या वेळेत दुचाकीला शहरात मुभा राहील. इतर वेळेस मात्र अनावश्यकपणे फिरतांना आढळले तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक व इतर कोणतेही दुकाने सुरू राहणार नाही. तसेच प्रतिबंधित भागात दुचाकीला संपूर्णत: बंदी कायम आहे. बँकांची वेळ सुध्दा सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत करण्यात आली आहे.
वरील सर्व बदलांची यवतमाळकरांनी नोंद घ्यावी. तसेच अनावश्यकपणे कोणीही बाहेर फिरु नये. आपल्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांचा अवधी द्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.     

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी