75 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात 312 जण भरती


यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच असून आज (दि. 28) सहा जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 75 वर पोहचली असून या वॉर्डात एकूण 312 नागरिक भरती आहे.
गत तीन दिवसांत 24 ते 27 एप्रिल या कालावधीत एकूण 393 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले. यापैकी पूर्ण 393 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत पाठविलेले एकाही नमुन्याचे अहवाल आता प्रलंबित नाही. आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1150 आहे. संस्थात्मक विलगीकरणात 195 तर गृह विलगीकरणात एकूण 837 जण आहे, असे प्रशासनाने कळविले आहे. 
बुधवारी दुपारी 12 ते 3 यावेळेत दुचाकींना सुट : बुधवार दि. 29 एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेची दुकाने जसे किराणा, दुग्धजन्य पदार्थ, भाजी, फळे आदी खरेदी करण्याकरीता 12 ते 3 या वेळेत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ या वेळेत दि. 29 एप्रिल रोजी दुचाकी वाहनांना परवानगी राहील. यानंतर मात्र दुचाकी फिरविण्यास बंदी कायम राहील,असे प्रशासनाने कळविले आहे.  मात्र नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये तसेच आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी