कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा




यवतमाळ, दि. 3 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी व इतर बाबींचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी नियोजन सभागृह येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
इतर विभागाकडून माहिती जाणून घेतल्यानंतर विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, विस्थापित कामगार / मजूर यांचा प्रश्न सद्यस्थितीत मोठा आहे. त्यांच्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे. जीवनावश्यक वस्तु जसे भाजीपाला, फळे, दुध, औषधी आदी बाबी नागरिकांना नियमित मिळणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे नागरिकांना अन्नधान्य सुरळीत मिळत राहायला हवे.  तसेच एकाच दिवशी सर्व नागरिकांना धान्यासाठी न बोलाविता त्यांना वेगवेगळ्या दिवशी बोलवावे. भाजीपाला, खाद्यतेल व इतर किराणा वस्तुंची चढ्या भावाने विक्री होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. दिव्यांग नागरिकांना धान्य, औषधी मिळतात की नाही, याबाबत नोडल अधिका-यांनी त्यांच्याशी स्वत: संपर्क करावा आदी सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी