आता संचारबंदीचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत


       यवतमाळ, दि. 13 : राज्यात कोरोना विषाणूमुळे (कोव्हिड - 19) उद्भवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी अधिसुचनेच्या दिनांकापासून सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात अधिसुचनेच्या अनुषंगाने 14 एप्रिल 2020 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता या संचारबंदीचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे.
            राज्याचे मुख्य सचिव यांच्या 13 एप्रिल 2020 च्या अधिसुचनेनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, याकरीता उपाययोजना म्हणून संचारबंदीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.डी. सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता सध्या लागू असलेल्या संचारबंदीचा कालावधी 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्याचे आदेशान्वये कळविले आहे. संचारबंदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे 26 मार्च 2020 च्या पत्रानुसार सर्व अटी व शर्ती लागू राहतील.
            वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम  1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.डी.सिंह यांनी कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी