आयसोलेशन वॉर्डातील सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह



v  गृह विलगीकरणात एकूण 89 नागरिक
यवतमाळ, दि. 7 : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 64 जण दाखल असून यापैकी सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी तीन नागरिकांचे निगेटिव्ह रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला प्राप्त झाले होते. गृह विलगीकरणात एकूण 89 नागरिक आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 230 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. उपचाराच्या दृष्टीने बेडची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेर देशातून, राज्यातून किंवा इतर ठिकाणांवरून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी कोणताही संकोच मनात न ठेवता स्वत:हून समोर यावे व प्रशासनाशी संपर्क करावा. यासाठी 07232- 239515, 07232- 240720, टोल फ्री क्रमांक 104 हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच संचारबंदीच्या काळात नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये. शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. तसेच स्वत:च्या आरोग्यासाठी घरातच राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी