Posts

Showing posts from January, 2018

छायाचित्र प्रदर्शनीतून महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीचे प्रतिबिंब - पालकमंत्री मदन येरावार

Image
v माहिती व जनसंपर्क विभागाच्या “ महाराष्ट्र माझा ” छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन यवतमाळ, दि. 22 –   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या “ महाराष्ट्र माझा ” छायाचित्र स्पर्धेत राज्यातील अनेक प्रतिभावंत कलाकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी हुबेहुब रेखाटन करून आपल्यातील प्रतिभा लोकांपर्यंत पोहचविली आहे. राज्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात झालेल्या सर्वांगीन प्रगतीचे प्रतिबिंब या प्रदर्शनीत उमटले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. नगर भवन येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित “ महाराष्ट्र माझा ” छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, न.प.शिक्षण सभापती कीर्ति राऊत, केळापूरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. ही प्रदर्शनी अत्यंत उत्कृष्ट आणि महत्वाची आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, अधिवेशन काळात ही प्रदर्शनी नागपूर येथे आयोजित करण्य

समाज जीवनात साहित्यिक, कवी, लेखक यांचे स्थान मोठे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

Image
v वणी येथील 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप यवतमाळ, दि. 21 : समाज जीवनात अनेक‍ स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो. त्यामुळेच या व्यक्तिंचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. वणी येथील 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, प्रसिध्द दिग्दर्शक राजदत्त, विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन तेलंग,  संजोजक माधव सरपटवार, श्रीपाद जोशी, विलास मानेकर, दिलीप अलोणे आदी उपस्थित होते. शिक्षण आणि साहित्य क्षेत्र हे स्वायत्त असले पाहिजे, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जीवन जगतांना विचार महत्वाचा आहे. लोकशिक्षण आणि लोकसंस्कार हे विचाराशी निगडीत असतात. भारत हा सुसंस्कृत देश आहे. मुल्याधिष्ठित परिवारपध्दती आणि समाजसंस्कृती आपली ताकद आहे. साह

जिल्ह्यात रस्त्याची हजारो कोटींची कामे मंजूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Image
यवतमाळ, दि. 21 :  रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात विविध रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. वणी येथे राष्ट्रीय महामार्ग 930, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय व्यवस्थापक एम. चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी उपस्थित होते. यवतमाळ आणि

विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणारे शिक्षण द्या - शिक्षणमंत्री विनोद तावडे

Image
यवतमाळ, दि. 20 –   शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असते. शहरासोबतच ग्रामीण आणि मागास भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, हे शासनाचे धोरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे, त्याचा विकास करून शिक्षण दिले तर तो रोजगाराभिमुख होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विदर्भातील संस्थाचालक व प्राचार्यांसोबत संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विजय दर्डा होते. मंचावर संस्थेचे सचिव किशोर दर्डा, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर उपस्थित होते. कौशल्य विकासासाठी नवीन प्रकारच्या अभ्यासक्रमाला प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे सांगून शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, याबाबतचे अभ्यासक्रम केवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) न चालविता ते अभियांत्रिकी महाविद्यालयातसुध्दा चालविणे गरजेचे आहे. शिक

“आपले पोलिस” लोकराज्य विशेषांक उत्कृष्ट व वाचणीय

Image
v पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते प्रकाशन यवतमाळ, दि. 17 –   जनतेच्या सेवेसाठी पोलिस विभाग हा नेहमीच तत्पर आहे. पोलिस विभागाच्या सकारात्मक बाबी नियमित प्रकाशित होणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्याच्या “ आपले पोलिस, आपली अस्मिता ” या लोकराज्य विशेषांकांत पोलिसांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. हा विशेषांक उत्कृष्ट व वाचणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वतीने जानेवारी 2018  या महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, पोलिस उपअधिक्षक पियुष जगताप, उपअधिक्षक (गृह) सेवानंद तामगाडगे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. लोकराज्यच्या माध्यमातून जनतेमध्ये पोलिसांच्या सकारात्मक बाबी पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, हे कौतुकास्पद आहे, असे यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार म्हणाले. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना, सायबर गुन्हे,

सरकारच्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवा

Image
v पालकमंत्र्यांच्या अधिका-यांना सुचना v पुसद उपविभागाची आढावा बैठक यवतमाळ, दि. 17 –   केंद्र आणि राज्यात जनतेला अभिप्रेत असलेले सरकार आहे. लोकांप्रती सरकार उत्तरदायी आहे. शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवाव्यात, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या. पुसद येथील उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहर नाईक, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, पुसदचे तहसीलदार संजय गरकल, माजी राज्यमंत्री संजय देशमुख उपस्थित होते. पुसद तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा असल्याने येथे उद्दिष्टही मोठे आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, पुसदचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो. त्यासाठी अधिका-यांनी शासकीय नोकरीत नवनवीन कल्पना राबवाव्या व कामासाठी स्वत: पुढाकार घ्यावा. शासनाने कितीही लोकोपयोगी निर्णय घेतले आणि ते जनतेपर्यंत पोहचले नाही, तर सरकारची प्रतिमा खराब होते. त्यामुळे अधिका-यांनी गांभिर्याने कामे करावीत, अ

कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना करण्यावर भर - पालकमंत्री मदन येरावार

Image
v जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक यवतमाळ, दि. 15 –   पाणी टंचाई निवारणासाठी अमृत योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत रखडलेल्या अनेक योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणीस्त्रोत आहे, त्याचा उपयोग करून पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना करण्यावर भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, खासदार राजीव सातव, विधान परिषद सदस्य हरीभाऊ राठोड, ख्वाजा बेग, विधानसभा सदस्य सर्वश्री मनोहर नाईक, डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलाज शर्मा, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य किरण मोघे आदी उपस्थित होते. नियोजन समितीची पुनर्रचना होऊन नवीन सदस्यांची ही पहिलीच बैठक आहे, अस

अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर

Image
v विशेष तरतुदीनुसार 100 टक्के निधी अदा करण्याला मंजूरी v   पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्याला यश यवतमाळ, दि. 10 –   यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत बेंबळा प्रकल्पातून पाणी आणण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित कंपनीकडून पाईपचा पुरवठा नियमित होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत हा पुरवठा होण्यास अडचण निर्माण होत होती. या गंभीर बाबीवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून शासनाच्या वतीने जिल्ह्यातील पाईपलाईनचा पुरवठा नियमित करण्यासाठी विशेष तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळणार आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 302 कोटी रुपये खर्च करून अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत पाण्याच्या 16 टाक्या आणि 3 उंच टाक्या बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी सुरुवातीला 30 महिन्यांचा होता. ऑक्टोबर 2019 पर्यंत हे काम अपेक्षित होते. मात्र यावर्षी पाणीटंचाई पाहता मार

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा गांभीर्याने करा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
नेर येथील समाधान शिबिरात अधिकाऱ्यांना निर्देश तत्काळ निर्णय घेऊन अनेक प्रश्न मार्गी यवतमाळ, दि. ६ –   नागरिक आपल्या तक्रारी, समस्या मोठ्या विश्वासाने शासन, प्रशासनाकडे घेऊन येतात. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या समस्यांचा गांभीर्याने निपटारा करून नागरिकांचे समाधान केले पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराजस्व अभियानांतर्गत नेर येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित दारव्हा उपविभागस्तरीय समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.   कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मनिषा गोळे, उपसभापती समीर माहुरे, जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, पंचायत समिती सदस्य रमेश बुरांडे, भीमराव खोब्रागडे, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, विशेष कार्य अधिकारी शिवानंद मिश्रा उपस्थित होते. यावेळी बोलताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना समाधान देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागाशी सर्वसामान्य जनतेचा दररोज थेट संबंध येतो

समन्वयातून कृषी व शाश्वत विकासाचे नियोजन

Image
v जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती v सिध्दी 2017 – संकल्प 2018 अंतर्गत वार्तालाप यवतमाळ दि . 05 : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शेतक-यांसाठी अनेक “ फ्लॅगशीप ” योजना राबविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणाचा तो महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कृषी व शाश्वत विकासासाठी मागेल त्याला शेततळे, धडक विहिरी, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम लागवड, स्वच्छ भारत मिशन यासारख्या विविध योजना समन्वयाच्या माध्यमातून राबविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “ सिध्दी 2017 संकल्प 2018 ” उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. प्रशासनात सुसुत्रता यावी व शासकीय कार्यालयातून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने जिल्ह्यात 10 नोव्हेंबर 2017 पासून “ झिरो पें

सावरकर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत सेवालाल आणि बिरसा मुंडा यांची जयंती आता शासनस्तरावर साजरी

v सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्याला यश यवतमाळ, दि. 05 : राष्ट्रपुरुष तसेच थोर व्यक्ती यांची जयंती दरवर्षी मंत्रालय आणि राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. या वर्षीपासून सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या विशेष प्रयत्नातून संत सेवालाल महाराज जयंती (दि. 15 फेब्रुवारी), संत गाडगे बाबा महाराज जयंती(दि. 23 फेब्रुवारी), संत तुकडोजी महाराज जयंती (दि. 30 एप्रिल), स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती (दि. 28 मे) आणि बिरसा मुंडा जयंती (दि. 15 नोव्हेंबर) साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले समाजसुधारक, महापुरुष संत सेवालाल यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याची समाजाची मागणी होती. संत गाडगे बाबा महाराज यांनी स्वच्छतेबाबत महान असे कार्य केले. 1876 मध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग करून खेडोपाडी स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधन, समाजकार्य आदींसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. खेडोपाडी फिरून झाडू हाती घेत स्वच्छता केली. त्यांच्या कार्या

मिशन इंद्रधनुष्य व पल्स पोलिओ अंतर्गत 100 टक्के लसीकरण करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
यवतमाळ दि . 03 : जिल्ह्यात 8 ते 15 जानेवारी या कालावधीत मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा चवथा टप्पा राबविण्यात येत आहे. तर 28 जानेवारी आणि ११ मार्च 2018 रोजी पल्स पोलिओ मोहीम आहे. या दोन्ही उपक्रमाबाबत आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करून 100 टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम व मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेसंदर्भात आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी.धोटे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, आयएमएचे सचिव डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. तगडपल्लीवार, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. एस.एस. ढोले, न.प.चे डॉ. विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. मिशन इंद्रधनुष्यबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पहिल्या तीन टप्प्यात ज्या मुलांचे किंवा महिलांचे लसीकरण करायचे राहिले असेल, त्यांच्यापर्यंत पोहचून लसीकरण करा. गावस्तरावरील आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी लो

सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाला दिशा देणारे - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन यवतमाळ दि . 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ एक शिक्षिका नाही तर थोर समाजसुधारक होत्या. समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा यांच्याविरुध्द त्यांनी लढा देऊन समाजसुधारणेचे मोठे कार्य केले आहे. आजही त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते. आजच्या समाज जीवनात सावित्रीबाईंचे विचार आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या वेळेस पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली त्यावेळेस त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत त्यांनी संघर्ष करून समाजाला शिक्षित केले. सोबतच समाजातील सती प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाहाला संमती देण्यासारखे अनेक क्रांतीकारी पाऊले उचलली, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेश द