Posts

Showing posts from January, 2021

जिल्ह्यात 73 जण पॉझेटिव्ह, 39 जण कोरोनामुक्त

              यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात 73 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 614 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 73 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 541 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 478 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14307 झाली आहे. 24 तासात 39 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13404 आहे. तर जिल्ह्यात एकूण 425 मृत्युची नोंद आहे.             सुरवातीपासून आतापर्यंत 141779 नमुने पाठविले असून यापैकी 141551 प्राप्त तर 228 अप्राप्त आहेत. तसेच 127184 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

अंगणवाडी, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणावर भर देणार – पालकमंत्री संजय राठोड

Image
              यवतमाळ, दि. 29 : आंगणवाड़ी आणि शाळा हे दोन्ही विषय मुलांच्या भविष्याशी निगडित आहे. ग्रामीण भागातील या दोन्ही बाबी चांगल्या स्थितित असल्या की मूलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातून नागरिकांना आरोग्यच्या उत्तम सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आंगनवाड़ी, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणा वर भर देणार, असे राज्याचे वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. विश्राम गृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.             जिल्ह्यातील शाळा सूंदर व आकर्षक झाल्या पाहिजे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, रंगरंगोटी करून शाळा आकषर्क करा. सुसज्ज अंगणवाडी उभारणेतसेच ज्या ठिकाणी अंगणवाडी नाही अशा व मोडकळीस आलेल्या जवळपास 500 अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करणार लवकरच करण्यात येईल. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या दृष्टीने आकर्षक इंटेरीअर तसेच कमी उंचीवर खिडक्या केल्यास मुलांना आवड निर्माण होईल, असे टाईप प्लॉन बनविणे. याशिवाय जिल्ह्यातील शाळा व प्राथमिक

जिल्ह्यात 79 जण पॉझेटिव्ह, 64 जण कोरोनामुक्त

               यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात 79 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 64 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 1273 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 79 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1194 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 444 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14234 झाली आहे. 24 तासात 64 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13365 आहे. तर जिल्ह्यात एकूण 425 मृत्युची नोंद आहे.             सुरवातीपासून आतापर्यंत 141359 नमुने पाठविले असून यापैकी 140877 प्राप्त तर 482 अप्राप्त आहेत. तसेच 126643 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

यवतमाळात शल्य चिकित्सकासह इतर डॉक्टरांनी घेतली लस

Image
  v जिल्ह्यात नव्याने चार ठिकाणी लसीकरण केंद्र यवतमाळ, दि. 27 : यवतमाळ जिल्ह्यात 16   जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीला जिल्ह्यातील पाच ठिकाणी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. आजपासून आणखी चार ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु झाली असून जिल्ह्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे एकूण नऊ केद्र झाले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर डॉक्टरांनी कोरोनाची लस घेतली. आजपासून सुरु झालेल्या केंद्रामध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय, यवतमाळ शहरातील पाटीपूरा येथील नागरी आरोग्य केंद्र तसेच यवतमाळ शहरातील क्रिटीकेअर हॉस्पीटलचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेवून नवीन केंद्राच्या लसीकरणाची सुरुवात केली. त्यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर आणि डॉ. भारती, डॉ. चव्हाण, डॉ. दीपक अग्रवाल यांनी सुध्दा लस घेतली. यावेळी डॉ. दिलीप देशमुख, डॉ. सचिन बेले यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित ह

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये लिफ्टचे उद्घाटन

Image
              यवतमाळ, दि. 27 : ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यात दिव्यांग नागरिकांसह ज्येष्ठांचाही समावेश असतो. या नागरिकांना सुविधा व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी   जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, समाजकल्याण सभापती विजय राठोड आदी उपस्थित होते. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट अतिशय आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अनेक सभापतींचे कॅबिन वरच्या माळ्यावर आहे. तेथे जाण्यासाठी दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. त्या अनुषंगाने लिफ्ट बसविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 41 जण पॉझेटिव्ह, 38 जण कोरोनामुक्त

  यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात 41 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 38 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 563 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 41 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 522 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 429 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14155 झाली आहे. 24 तासात 38 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13301 आहे. तर जिल्ह्यात एकूण 425 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 139994 नमुने पाठविले असून यापैकी 139604 प्राप्त तर 390 अप्राप्त आहेत. तसेच 125449 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्ह्याच्या विकासासाठी 100 टक्के निधी मिळणार – पालकमंत्री संजय राठोड

Image
  Ø उत्कृष्ट पंचायत समिती, ग्रामपंचायतींचा सत्कार यवतमाळ, दि. 27 : कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विविध विकास कामांसाठी 33 टक्केच निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संकटावर मात करून शासनाने ‘पुन:श्च हरीओम’ म्हणत नव्याने सुरवात केली आहे. त्यामुळे विकास कामांसाठी आता पूर्ण निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 100 टक्के निधी मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमध्ये नुकताच उत्कृष्ट पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार तर मंचावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, समाजकल्याण सभापती विजय राठोड आदी उपस्थित होते. विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचा 100 टक्के निधी मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले,

संकटावर मात करून विकासाकडे वाटचाल – पालकमंत्री राठोड

Image
  Ø प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम यवतमाळ, दि. 26 : अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. संकटाच्या काळात शासन, प्रशासन, सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या सहकार्याने ‘पुन:श्च हरीओम’ म्हणत राज्याचे आणि जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे विचार राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. पोस्टल ग्राऊंड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक कामात जिल्हा अग्रेसर आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ज

पेपरवरून पेपरलेसकडे निवडणुकांची वाटचाल - जिल्हाधिकारी सिंह

Image
  Ø जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन Ø एका वर्षात जिल्ह्यात 19798 नवमतदार यवतमाळ, दि. 25 : लोकशाहीमध्ये निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रशासकीय दृष्टीने निवडणुकांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे प्रशासनाला 24 बाय 7 काम करावे लागते. पूर्वीच्या काळात बॅलेट पेपरवर मतदान होत होते. आता मात्र इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन आल्या आहेत. तसेच पारदर्शी आणि विश्वासार्ह निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक ॲप विकसीत केले आहे. एक प्रकारे पेपरवरून पेपरलेसकडे निवडणुकांची वाटचाल सुरू असल्याचे मत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त निवडणूक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते. गतवर्षी झालेल्या निवडण

एका मृत्युसह जिल्ह्यात 77 जण पॉझेटिव्ह

  Ø 48 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 77 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये 48 वर्षीय पुरषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 48 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 1130 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 77 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1053 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 423 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14067 झाली आहे. 24 तासात 48 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13220 आहे. तर जिल्ह्यात एकूण 424 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 137967 नमुने पाठविले असून यापैकी 137736 प्राप्त तर 231 अप्राप्त आहेत. तसेच 123669 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जन्मत: दोष असणा-या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार - पालकमंत्री संजय राठोड

Image
                                               Ø जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन यवतमाळ, दि. 24 : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल - पालकमंत्री संजय राठोड

Image
                                                           Ø महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला वाहन हस्तांतरीत यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. रक्तदान करणा-यांची जिल्ह्यात कमतरता नाही. मात्र ग्रामीण भागातील अनेक रक्तदाते शहरात येऊन रक्तदान करू शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी वनविभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रक्त संकलन वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्तसाठा वाढण्यास मदत होईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संकलन वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख एम. रामबाबू, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, ऋषिकेश रंजन, व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य वनसंरक्षक