कोव्हिड लसीकरणाबाबत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक

 


Ø 24 तास सेवा उपलब्ध

यवतमाळ, दि. 14 : कोव्हिड – 19 महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लस उपलब्ध झाल्यानंतर राज्यात कोव्हिड – 19 लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील प्राप्त होणाऱ्या नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे टोल फ्री क्रमांक तसेच दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लसीकरणासंदर्भात प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांना 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष मधील टोल फ्री क्रमांक 1077, 07232-255077, 07232-240720, 07232-240844 उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरीता सदर नियंत्रण कक्षात 14 जानेवारी 2021 पासून पुढील आदेश आदेशापर्यंत कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी