Posts

Showing posts from July, 2019

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

Image
यवतमाळ, दि. 29 : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतक-यांना पुरक व्यवसायाची जोड मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वित केली आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या अंमलबजावणीच्या कामाचा आढावा पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोक्रा) जिल्ह्यात कृषी विभागाने त्वरीत कामे हाती घ्यावी, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले,या योजनेतील लाभार्थ्यांना कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न करून देण्यात येईल. येत्या आठ दिवसात कृषी सहाय्यकांमार्फत लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा भुजल सर्वेक्षण विभागाकडे द्याव्यात. याअंतर्गत केवळ धडक सिंचन विहिरींचाच लाभ नाही तर शेतक-यांना इतरही योजनेचा लाभ द्यावा. शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी ही योजना असल्यामुळे कृषी विभागाने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. तसेच हा व

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत 1 ऑगस्ट रोजी वाशिम येथे विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर

Image
v बालकांच्या अधिकारांच्या उल्लंघनाबाबत तक्रारींवर सुनावणी यवतमाळ, दि. 29 : बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आदी विषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत गुरुवार, 1 ऑगस्ट 2019 रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित या शिबिरात सकाळी ९ वाजेपासून तक्रारींची नोंदणी सुरु होईल. तसेच सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगामार्फत देशात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून बालकांच्या तक्रारी नोंदविल्या जातात. नीती आयोगाने निवडलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश असल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने वाशिम येथे तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. रस्त्यावर राहणारी बालके, शाळकरी बालके, बालकांची काळजी घेणारी संस्था, बालगृह, वसतिगृह किंवा इतर ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेली

डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

Image
यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत कार्यालयात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने आयोजित मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते कामगारांना बांधकाम किटचे वाटप करण्यात आले. यावेळी केळापूरचे तहसीलदार सुरेश कवाळे, बांधकाम मंडळाचे पी. एन. कांबळे, शंकर अमृतवार, उमरीचे सरपंच वसंत राठोड, महादेव ठाकरे, अक्कलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. इमारत व इतर कामगारांना सुरक्षा किटचा लाभ मिळावा, या उद्देशाने राळेगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावात कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या कामगारांना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सुरक्षा किटचा लाभ मिळावा म्हणून कामगारांनी उमरीच्या ग्रामपंचायतमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी   जवळपास 500 कामगारांना किटचे वाटप करण्यात आले।   परिसरात सकाळी पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असतांना मोठ्या प्रमाणावर येथे कामगार बांधव उपस्थित होते. या कामगारांशी डॉ. उईके यांनी त्यांच्या विविध समस्या वर चर्चा केली. एवढेच नाही तर ज्या कामगारांना नोंदणीसाठी अडचणी येत होत्या त्यांना स्वतः मा

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘योजना आपल्या दारी’ उपक्रम

Image
v सुवर्ण जयंती   महाराजस्व अभियानांतर्गत विविध गावांमध्ये आयोजन यवतमाळ, दि. 27 : शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचाव्यात, या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा व त्यांचे जीवनमान उंचवावे, या उद्देशाने जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढाकाराने सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत ‘ योजना आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रम विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजनांची प्रकरणे स्वीकारणे, अन्नधान्य सुरक्षेच्या सर्वोच्च प्राधान्य गटामध्ये समाविष्ट करण्याकरीता अर्ज स्वीकारणे, जीर्ण झालेले रेशनकार्ड नवीन करून देणे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असणा-या लाभार्थ्यांची माहिती संकलीत करणे, नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज स्वीकारणे आदींचा समावेश आहे. अकोला बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात 42 दुय्यम रेशन कार्ड, सात नवीन रेशन कार्ड व 12 व्यक्तिंची नावे कमी करणे अथवा वाढविणे तसेच निराधार / श्रावणबाळ योजनेची 6 प्रकरणे स्वीकारण्यात आली. सावरगड येथे 17 दुय्

पावसाअभावी होरपळलेल्या पिकांचा तात्काळ सर्व्हे करा - आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

Image
v मादणी, कृष्णापूर, कोटंबा, पिंपरी इजारा गावातील पिकांची पाहणी यवतमाळ, दि. 27 : खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. पेरणी झालेली पिके पावसाअभावी पूर्णपणे मृतावस्थेत आहेत. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवून आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी परिसरातील गावांत नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ सर्व्हे करावा, अशा सुचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तहसीलदार तसेच संबंधित अधिका-यांना दिल्या. बाभुळगाव तालुक्यातील मादणी, कृष्णापूर, कोटंबा, नायगाव आदी गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी ते गावक-यांशी संवाद साधत होते. डॉ. अशोक उईके पुढे म्हणाले, परिसरातील मादणी, कोटंबा, कृष्णापूर, पिंपरी इजारा, नायगाव, पंचगव्हाण, झपारखेड, उमरडा, गणोरी या आठ-दहा गावांमध्ये पिकांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे पिके हातून जाण्याची वेळ आली आहे. या गावांत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, कोतवाल आणि बळीराजा चेतना अभियान समितीच्या माध्यमातून नुकसानग्

विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Image
यवतमाळ, दि. 26 : अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखेडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी आधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के. अभर्णा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. 33 कोटी वृक्ष लागवडी मोहिमेचा आढावा घेतांना विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, विविध विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दररोज वृक्ष लागवड करा. नोंदणी पोर्टलमध्ये रोजचा आकडा बदलत राहणे आवश्यक आहे. गत तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ठराविक कालावधीत ही मोहीम पुर्ण करावयाची आहे. 15 ऑगस्टपर्यंत राज्यात 80 टक्के वृक्ष लागवड झाली पाहिजे, अशा वनमंत्र्यांच्या सुचना आहे. त्यासाठी अमरावती विभागाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. वृक्ष लागवडीकरीता जेवढे खड्डे झाले आहेत, त्यावर उपवनसंरक्षकांनी लक्ष केंद्रीत करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री किसा

आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला व्हीसीद्वारे आढावा

Image
यवतमाळ, दि. 24 : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मंत्रालयातून व्हिसीद्वारे आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. यात 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती जिल्हा परिषदेने तात्काळ वाटप करावी. या शिष्यवृत्तीचे ज्या जिल्ह्यात वाटप कमी झाले आहे, त्यांनी आपली गती वाढवून विद्यार्थ्यांना लाभ द्यावा. आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार घडू नये, यासाठी महिला अधिका-यांनी सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये विद्यार्थीनींसोबत संवाद साधून त्यांची तपासणी करावी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधा पूर्णपणे मिळतील याबाबत जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिका-यांनी खात्री करावी. आश्रमशाळांना जोडणारे रस्ते, विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आदी बाबी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच अधिक्षक, अधिक्षिका, वसतीगृह

आदर्श गाव स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या गावांना जिल्हाधिकारी व सीईओंच्या भेटी

Image
v नांझा, गणेशवाडी व देवनाळा गावात नागरिकांशी संवाद यवतमाळ, दि. 23 : आदर्श ग्राम बनविण्याच्या उद्देशाने संपूर्ण राज्यात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील एक हजार गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट असून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून विकास कामाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून आदर्श ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेकरीता पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील गावांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी भेटी देऊन गावक-यांशी संवाद साधला. गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, घरकुल, आरोग्य, कृषी विकास व विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व गावकरी यांच्यात समन्वय साधने हे अभियानाचे महत्वाचे उद्दिष्ट असून त्यानुसार कार्य पूर्ण करणाऱ्या गावामध्ये आदर्शग्राम   स्पर्धा राबिण्यात येत आहे. स्पर्धेच्या प्राथमिक मुल्यांकनात नांझा गावाला सर्वात जास्त गुण मिळाले असून त्या पाठोपाठ गणेशवाडी व देवणाळा गावसुद्धा स्पर्धेत आहे. येथील गावक-यांचा उत्साह वा

क्षमता ओळखून विद्यार्थ्यांचा विकास करणे गरजेचे - आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

Image
v राळेगाव येथे उद्योजकता, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मेळावा यवतमाळ दि.19 : आदिवासी विद्यार्थी हे अत्यंत निष्ठावंत तसेच संस्कृतीप्रिय असतात. काही प्रमाणात लाजाळू असले तरी प्रामाणिकता हा विशेष गुण त्यांच्यात आहे. या विद्यार्थ्यांची बुध्दी तल्लख असते. कुठलेही परिश्रम करण्यास ते मागेपुढे पाहत नाही. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. जगातील सर्वात उंच शिखर पार करणा-या सुषमा मोरे या विद्यार्थीनीचा आज येथे सत्कार झाला. असे सुप्त गुण अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. फक्त त्यांची क्षमता ओळखून त्यांना चालना दिली तर त्यांचा विकास नक्कीच होईल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. राळेगाव येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा तर मंचावर राळेगावच्या नग

शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी दहा डायलिसीस मशीन मंजूर

Image
v पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश यवतमाळ, दि. 17 : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किडनीच्या आजारासाठी आवश्यक असलेला डायलिसीस मशीनचा प्रश्न निकाली निघाला आहे. तीन महिन्यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन डायलिसीस मशीन लावण्यात आल्या होत्या. आता या रुग्णालयासाठी दहा मशीन मंजूर झाल्या असून पालकमंत्री मदन येरावार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किडनीच्या आजाराच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस मशीनची मागणी गत वीस वर्षांपासून प्रलंबित होती. जिल्ह्यातील किडनीच्या आजाराचे रुग्ण सावंगी, सेवाग्राम, अमरावती आणि नागपूर येथे डायलिसीसकरीता जात होते. यात रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी 2018 – 19 मध्ये जिल्हा नियोजन समितीमधून दहा डायलिसीस मशीनकरीता निधी उपलब्ध करून दिला. यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सदर प्रस्ताव शासनाकडे तसेच हापकिन इन्स्टिट्युटकडे सादर केला. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर येथील शासकीय

तर… बँकांमधून शासकीय खाते स्थलांतरीत – जिल्हाधिकारी

Image
v 20 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्जवाटप करणा-या बँकांना अल्टिमेटम यवतमाळ, दि. 15 :    खरीप हंगामामध्ये पीक कर्जवाटप करण्याची काही बँकांची गती चांगली आहे तर काही बँका अतिशय संथगतीने कर्जवाटप करीत आहे. शेतक-यांना यावेळेस पीक कर्जाची गरज आहे. मात्र काही बँकांच्या आडमुडेपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ज्या बँकांनी आतापर्यंत 20 टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केले असेल, अशा बँकामधील शासकीय खाते दुस-या बँकेत स्थलांतरीत करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत आदी उपस्थित होते. खरीप हंगाम हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जून अखेरपर्यंत 50 टक्के तर आजपावेतो   100पीक कर्जवाटप होणे अपेक्षित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत 73 टक्के तर स्टेट बँक ऑफ इंडियाने

वृक्ष लागवड हे ईश्वरी कार्य - आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके

Image
            यवतमाळ, दि. 13 : पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे.  वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले तर  मनुष्याला चांगले आरोग्य प्रदान होईल आणि व्याधींपासून मुक्ती मिळेल. शासनाने सुरू केलेली  वृक्ष लागवडीची  योजना सर्वांनी प्रामाणिकपणे राबवावी. वृक्ष लागवड हे  ईश्वरी कार्य आहे,  असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले. पांढरकवडा वन विभाग अंतर्गत तेजनी येथे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  मंचावर मुख्य वनसंरक्षक र. ना. वानखडे, उपवनसंरक्षक के. अभर्णा, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, जि.प. सदस्य चित्तरंजन कोल्हे, राळेगाव नगर पंचायतचे बाळासाहेब कविश्वर, पं.स.सदस्य प्रशांत तायडे आदी उपस्थित होते. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. उईके म्हणाले, येत्या काळात आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात येईल. वन विभागाला वृक्ष लागवडीसाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.   कार्यक्रमाला संजय काकडे, ब

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या विस्तारीकरण इमारतीचे उद्घाटन

Image
                                  यवतमाळ, दि. 13 : येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विस्तारीकरण इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, पोलिस उपअधिक्षक (गृह) अनिलसिंह गौतम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.पांडे, श्री. कोळी आदी उपस्थित होते. सुरवातीला पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते नवीन इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, इमारतीचे बांधकाम चांगले करण्यात आले आहे. पळसावाडी येथील पोलिस कर्मचा-यांच्या निवास स्थानासाठी निधी देण्यात आला आहे. त्याचे काम त्वरीत करा. शहर पोलिस स्टेशनला स्मार्ट बनविण्याकरीता 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी खाजगी आर्किटेक्ट नेमण्यात आला असून पुढच्या महिन्यात या पोलिस स्टेशनच्या नुतणीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे, अशा सुचना त्यांनी केल्या. रस्ते सुरक्षा संदर्भात पोलिस विभाग, स्थानिक नगर पालिका आणि उपप्रादेशिक परिवहन

दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
v ऑक्सिजन पार्क येथे झाडांचा वाढदिवस साजरा यवतमाळ, दि. 12 : देशात 125 कोटी लोकसंख्येपैकी 60 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आहे. पावसाचे प्रमाण वाढवायचे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. झाडामुळे पाणी आणि पाण्यामुळे समृध्दी हा एकमेव मार्ग असल्यामुळे भविष्यात दुष्काळावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ऑक्सीजन पार्क येथे यवतमाळ वन विभागाच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचा समारोप व वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करतांना ते बोलत होते. मंचावर उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, भारतीय वन सेवेचे अधिकारी अर्जुना, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस.गावंडे आदी उपस्थित होते. राज्य सरकारने चार वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, या उपक्रमात शासकीय विभागासोबतच अनेक सामाजिक संघटना मनापासून सहभागी झाल्या. त्यामुळेच वृक्ष लागवड मोहीम ही लोकचळवळ बनली. वन विभागानेसुध्दा यासाठी अतिशय मेहनत घेतली. गेत्या पाच वर्षात वन विभागाचा नावलौकिक वा

बस स्थानकाच्या नुतणीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

Image
यवतमाळ, दि. 11 : राज्यभरात बस स्थानकांच्या नुतणीकरणासाठी शासनाने अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून दिला आहे. यवतमाळ शहरातील बस स्थानकाचेसुध्दा नुतणीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, यवतमाळ आगार प्रमुख अविनाश राजगुरे, परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंता शीतल गोंड, नगरविकास विभागाचे सहाय्यक संचालक किरण राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत मरपल्लीकर, नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासनाने राज्यातील बस स्थानकांच्या नुतणीकरणासाठी 600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यवतमाळ बसस्थानकाचा यात समावेश आहे. कंत्राटदाराला 11 महिन्यात हे बसस्थानक पूर्ण करावयाचे आहे. मात्र परिवहन विभागाकडून संथगतीने काम सुरू आहे. परिवहन महामंडळाने ठराविक कालावधीत काम करावे. शहरातील बसस्थानक दुस-या जागेवर स्थलांतरीत करण्यासाठी जागेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जेणेकरून बस स्थानक स्थ

महिला बचत गटांमुळे गावांचा आर्थिक विकास - पालकमंत्री मदन येरावार

Image
v तेजस्विनी   महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम यवतमाळ, दि. 11 : ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून महिला बाहेर पडून आर्थिक प्रगती करीत आहेत. मुलाचे शिक्षण, मुलीच्या लग्नाचे नियोजन हे महिलांद्वारे योग्य प्रकारे होत असल्यामुळे कुटुंबाच्या ख-या अर्थमंत्री महिलाच आहे. त्यातच आता महिला बचत गटांचे जाळे गावागावात विणले गेले आहे. त्यामुळे गावांचा आर्थिक विकास हा महिला बचत गटांमुळे होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, सहाय्यक नियोजन अधिकारी सायली देवस्थळी, रेखा गुरव, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते. खेडे समृध्द तर भारत समृध्द, असे महात्मा गांधीजींचे वचन होते, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यांत्रिकीकरण आणि पाश्चिमात्य सं

किटकनाशके खरेदी करतांना व वापरतांना सुरक्षाविषयक काळजी घ्या

v कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन यवतमाळ, दि. 8 : शेतकऱ्यांनी किटकनाशके खरेदी करतांना व ती वापरताना सुरक्षाविषयक काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतक-यांनी कायदेशीर परवाना असणाऱ्या नोंदणीकृत किटकनाशक डीलरकडून किटकनाशके, जैवकिटकनाशके खरेदी करावे. दिलेल्या भागात वापरण्यासाठी एक वेळ पुरेल ऐवढेच किटकनाशके खरेदी करा. किटकनाशकाच्या पॅकवर, डब्यावर मान्यतेची लेबल्स नीट पाहून घ्या, आवरणावरील बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख, अंतीम मुदत इत्यादी बाबी तपासणे आवश्यक आहे. डब्यात व्यवस्थीत पॅक केलेली किटकनाशके खरेदी करावीत. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या किंवा कायदेशिर परवाना नसणाऱ्या व्यक्तीकडून किटकनाशके खरेदी करू नका. संपर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात किटकनाशक खरेदी करू नका. ज्या डब्यातून, पॅकमधून गळती होत असेल, डब्याचे, पॅकचे आवरण सैल झाले असेल किंवा सिलबंध नसेल तर अशी किटकनाशके खरेदी करू नका. किटकनाशके वापरतांना घराच्या आवारापासून दूर ठेवा. किटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यातच साठवून ठेवा. किटकनाशके आणि तणनाशके वेगवेगळी साठवून ठेवणे गरजेचे आहे. जेथे किटकनाशके साठव