Posts

Showing posts from January, 2024

बालगृहातील मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालमहोत्सव आजपासून ३ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन

महिला व बाल विकास विभागाकडून यवतमाळ जिल्ह्यातील अनाथ, निराधार, निराश्रीत बालकासाठी कार्यरत सर्व बालगृहातील प्रवेशित, प्रवेशितांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव दि १ ते ३ फेब्रुवारी या कालावधीमध्ये समर्थ प्राईड, आर्णी रोड बायपास, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या बालमहोत्सवाचे उद्घाटन दि. १ फेब्रुवारी रोजी होणार असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकासचे विभागीय उपायुक्त, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय बालमहोत्सवामध्ये मैदानी स्पर्धा, इनडोअर गेम, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे प्रयोग इत्यादीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी दिली. ०००

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आरोपीच्या अटकेबाबत कायदेविषयक मार्गदर्शन

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लोहारा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रि-अरेस्ट, अरेस्ट आणि रिमांड स्टेज" याबाबत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांचे मार्गदर्शनाखाली सोमवारी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सहायक लोकअभिरक्षक अजय दाणी होते. लोहारा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. सहायक लोकअभिरक्षक अजय दाणी यांनी अटक केलेल्या व्यक्तींना असलेल्या अधिकाराबाबत विस्तृत अशी माहिती दिली. पक्षकारांना अटकेपासून वाचविण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्याच्या हेतुने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला कायदेशिर मदत मिळणे आवश्यक असल्याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीला चौकशीसाठी का

शेगाव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा १,२२७ पदांसाठी थेट मुलाखत

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव यांचे्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि.२ फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव जि. बुलढाणा येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी एकूण १ हजार २२७ रिक्तपदे विविध कंपन्यांमार्फत अधिसूचित करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदविकाधारक, पदविधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या इच्छूक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून संधीचा लाभ घेता येणार आहे. मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांची प्रत्यक्ष थेट मुलाखतीद्वारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. 000

आज मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण दिनांक २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत केले जाणार आहे. या सर्वेक्षणाचा उद्या दि.३१ जानेवारी रोजी शेवटचा दिवस आहे. सर्वेक्षणासाठी नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करुन सर्वे यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे. पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्यादृष्टीने समिती गठित करण्यात आली आहे. याच अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वेक्षणाचा उद्या दिनांक ३१ जानेवारी रोजी शेवटचा दिवस आहे. सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 000

कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी कार्यशाळा कापूस उत्पादन क्षमता वाढीसाठी विशेष कापूस प्रकल्प

Image
भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दि. २५ जानेवारी रोजी येथील कृषि विज्ञान केंद्र येथे अतिसघन कापूस लागवड प्रकल्पाअंतर्गत शेतकरी कार्यशाळा पार पडली. विदर्भातील प्रमुख पीक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, दारव्हा आणि आर्णी तालुक्यात भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यत प्रचार-प्रसार व्हावा यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पार्लावार होते. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कीटकशास्त्र विशेषज्ञ डॉ. प्रमोद मगर, अभियांत्रिकी विशेषज्ञ राहुल चव्हाण, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. मयूर ढोल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि.५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा जिल्हास्तरीय लोकशाही दिन बळीराजा चेतना भवन अर्थात बचत भवन येथे सकाळी १० वाजता होणार असून जिल्हाधिकारी यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी जनतेच्या तक्रारी व गाऱ्हानी ऐकून घेतील. या लोकशाही दिनात स्वीकारलेल्या तक्रारींवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

सावकरी पथकाकडून अवैध सावकारी करण्याऱ्यांच्या घरी झडती

नेर तालुक्यातील खळणा गावात जिल्हा निबंधक कार्यालयाच्या सावकारी पथकाने अवैध सावकारी करण्याऱ्यांच्या घरी झडतीची कार्यवाही २४ जानेवारी रोजी केली. या कार्यवाहीत आक्षेपार्ह ५३ कागदपत्रे,दस्तऐवज,कोरे धनादेश व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे. ही कार्यवाही जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. दि. २४ जानेवारी रोजी गैरअर्जदार अंकुश देवानंद घरडे व देवानंद अर्जुन घरडे दोन्ही रा. खळणा, ता. नेर, जि. यवतमाळ यांच्या राहत्या घरी सावकारी अधिनियमानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. अंकुश घरडे व देवानंद घरडे यांच्या विरुध्द पुणे येथील अर्जदार विनिता नंदकिशोर शहाडे यांचा तक्रार अर्ज विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांचेकडुन जिल्हा निबंधक, (सावकारी) यवतमाळ यांच्या कडे प्राप्त झालेला आहे. या तक्रार अर्जानुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रुपये १ लाख 50 हजार चार टक्के दराने सावकारी मध्ये घेतली होती, त्याबद्दल गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडुन वाद शेताचे नाममात्र खरेदीखत करुन दिले होते. गैरअर्जदार यांची सावकारी रक्कम रुपये १ लाख 50 हजार व त्यावरील चार टक्के व्याज परत क

आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी

८ व ९ फेब्रुवारीला मुलाखत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता इसा सालेह अल गुर्ग, दुबई ही आस्थापना परिसर मुलाखतीकरीता उपस्थित राहणार आहे. या आस्थापनेला इलेक्ट्रीशियन, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कन्डीशनर टेक्नीशियन या व्यवसायातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत. पात्र उमेदवारांनी इंग्रजीतील कॉम्प्युटराईज्ड रिजूम, दहावी, बारावी गुणपत्रिका व टिसी, आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी), आधार कार्ड व पासपोर्ट फोटो प्रत्येकी दोन प्रतीमध्ये सोबत आणावे. आस्थापनेमधील वेतन दरमहा एईडी ११५० राहणार आहे. आस्थापनेमार्फत विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामध्ये एप्लॉयमेन्ट व्हीसा, एअर तिकीट इन एव्हरी टु इअर्स. मेडीकल इन्सुरन्स, कॅम्प ॲकोमोडेशन, ट्रान्सोर्पोटेशन, एअर तिकीट फॉर फस्ट जॉयनिंग या सुविधांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी ए.व्ही. पिंगळे (जेएए), भ्रमणध्वनी ९४२३४३४७०३ यांचेशी संपर्क साधावा, पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले

जिल्ह्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत २६ व ३० जानेवारी ते १३ फेबुवारी २०२४ या कालावधीत " स्पर्श" कुष्ठरोग जनजागृती अभियान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. या अभियानात मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पुण्याचे सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, सहा. संचालक पुणे, डॉ. आडकेकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)डॉ. गोपाळ पाटील यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. या अभियानातंर्गत २६ जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजित ग्रामसभेत व सर्व शासकीय कार्यालयात ध्वजारोहणानंतर कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकारी यांचे जनतेस केलेले आवाहन, कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा, सरपंच यांचे भाषण, कुष्ठरोग आजाराबाबत माहीती व संदेश दिले जाणार आहेत. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा कालावधी कुष्ठरोग पंधरवडा म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात कुष्ठरोगाबाबत विविध उपक्रमातंर्गत कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शाळा व महाविद्यालय येथे प्रार्थनेच्य

नानकीबाई वाधवानी कला महविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची उपस्थिती

Image
येथील श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महविद्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची उपस्थितीत १४ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय मतदार दिनाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाधवानी अध्यक्ष यवतमाळ सेवा समिती यवतमाळ तसेच प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया होते. यासह उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल चान्देवार उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात आयोगाकडून प्राप्त शपथ घेवून करण्यात आली. सन २०२३ या वर्षात उत्कृष्ट नवमतदार नोंदणी केलेले महाविद्यालय म्हणून अमोलाकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, आबासाहेब पारवेकर यवतमाळ यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून इंदू तीरमारे, संगीता खोब्रागडे, राजेश बरडे, सचिन इंगोले, वंदना राऊत, मंजुषा डेरे यांचासुद्धा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे आयोगाकडून दिलेल्या सूचनेनुसार रांगोळी, चित्रकला, वकृत्व स्पर्धा विविध महाविद्यालयात घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत व

‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

* समता मैदान येथे २९ ते ३१ जानेवारी रोजी नाट्यप्रयोग * महानाट्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘जाणता राजा’ या तीन दिवसीय महानाट्याचा शुभारंभ २९ जानेवारीपासून यवतमाळात होणार आहे. या महानाट्याच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी आज आढावा घेतला. शहरातील पोस्टल ग्राऊंड येथे होणाऱ्या महानाट्य आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात बैठक झाली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. सुखदेव राठोड, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.क्षीरसागर आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या महानाट्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला नेमून दिलेल्या कामकाजाची माहिती घेवून ‘जाणता राजा’ महानाट्य प्रयोगाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना देत या म

सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार - पालकमंत्री संजय राठोड

ग्रामीण भागातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिली. नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत नेर तालुक्यातील सर्व ५१ ग्रामपंचायतींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक व साहित्याचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक पदभरत्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात ७५ पद

नेर येथे अत्याधुनिक डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

Image
> विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे होणार कमी > पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने १ कोटी ८८ लाखांचा निधी नेर शहरातील अशोकनगरमधील नगरपरिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. नेर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ मधील अत्याधुनिक डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून या शाळेच्या इमारतीची आणि वर्गखोल्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नाने या डिजिटल क्लासरुम निर्मितीसाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एक कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून नेरमधील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ मधील चौथी ते सातवीच्या चार वर्गखोल्या ह्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. या चारही वर्गखोल्यामध्ये प्रत्येकी १८ संगणक बसविण्यात आले आहे. यासह शिक्षकांसाठी डिजिटल फळाही बसविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या संगणकांवर ई-बालभारतीची पाठ्यपुस्तके ॲानलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह लिहिण्या

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा: प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी,सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत, असे आवाहन जिल्ह

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरणा करण्याचे महाऊर्जाचे आवाहन

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या पीएम कुसुम योजनेंतर्गत जिल्ह्यातील 513 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला असूनही त्यांनी अद्याप लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी एमईडीए बेनिफीशिअरी अप्लिकेशन या ऑनलाईन अॅपव्दारे लाभार्थी हिस्सा सात दिवसांत भरणा करावा,असे आवाहन महाऊर्जाने केले आहे. या योजनेंतर्गत कुसुम ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त असलेल्या अर्जाची पडताळणी करुन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यालयाकडून लाभार्थी हिस्सा भरण्याचे संदेश वितरित केले जातात. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील 513 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला असूनही त्यांनी अद्याप लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. तसेच अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा, जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांचेकडून वेळोवेळी भ्रमणध्वनीव्दारे लाभार्थी हिस्सा भरणेबाबत कळविण्यात आलेले आहे. आता अशा लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा मुख्यालय, पुणे यांच्याकडून लाभार्थी हिस्सा भरणेबाबत करण्याकरीता सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या मुख्यालयामार्फत प्राप्त

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी

परदेशात विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व शेतकऱ्यांनी केलेला अवलंब आणि उत्पन्नात झालेली वाढ याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव ३१ जानेवारी पूर्वी तालुकास्तरावर सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढवणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकाबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्य वेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक साह्य व सोयी सुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपयोजनासाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. विविध देशांनी विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व तेथ

चर्मकार प्रवर्गातील 25 हजार युवक-युवती, महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षणाची संधी

Image
लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात चर्मकार प्रवर्गातील युवक युवती आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे तीन वर्षांत २५ हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळणार आहे. या करारावर लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली. या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया विपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयांचा समावेश असेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्यायी संधी मिळेल. या करारावेळी लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांचे आभार व्यक्त केले. चर्मकार प्रवर्गातील युवक युवतींनी आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी

जिल्ह्यातील दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार मैत्री प्रशिक्षण अर्ज करण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २०० सुशिक्षित बेरोजगारांना मैत्री-मल्टीपर्पज आर्टिफिशियल इन्सीमेशन वर्कर इन रुरल इंडिया (एमएआयटीआरआय) म्हणून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. या प्रशिक्षित व्यक्तींची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती केली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरूम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग ही पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येईल. प्रशिक्षण

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात सहभागी व्हा, लाखो रुपयांचे बक्षिस मिळवा

राज्य शासनाचे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व आस्थापनाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये शाळांनी सहभाग नोंदवून लाखो रुपयाचे बक्षीस मिळवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर पागोरे यांनी केले आहे. या अभियानांतर्गत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची नोंदणी शासन निर्णयानुसार करावी व विविध उपक्रम राबवून अभियानाचे फोटो, व्हिडीओ आदी संबंधित माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत सरल पोर्टलवर अपलोड करावी. शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानामध्ये शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन ; जादा पैसे आकारणाऱ्या दोन सेतु केंद्रांवर कारवाई

केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीतील जादा पैसे आकारणाऱ्या सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात आहे. दि.17 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय झरीजामणी येथे या पथकाने भेटे दिली असता सेतु सुविधा केंद्र चालक यांच्या कडून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर, उत्पन्नाचा दाखला, एपत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का पेक्षा जास्त पैसे घेत असल्याबाबत नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर येथील पथकाने सेतू केंद्रांची गुप्तपणे पाहणी केली. तसेच व्हीडीओ काढण्यात आलेला असून त्यामध्ये भोयर सेतु सेवा केंद्र, तहसिल कार्यालय चौक, झरीजामणी व ओम साई सेतु सेवा केंद्र, बिरसा मुंडा चौक, झरीजामणी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे सेतु केंद्रावर कडक कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी या सेतु केंद्रात कोणत्याही दाखल्यासाठी अर्ज करू नये, तसेच इतर कोणतेही सेतु केंद्र चालक शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश पूर्व परीक्षा सुरळीत

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षा शनिवार दि. २० जानेवारी रोजी जिल्ह्यातील ४० केंद्रावर सुरळीत पार पडली. ही पूर्व परीक्षा जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ४० केंद्रावर घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी ९ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ९१७२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. परीक्षा सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व शिक्षण विभागाने चांगली तयारी केली होती. यासाठी नवोदय विद्यालय समिती आणि प्राचार्य कमलाकर धोपटे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ८६ ग्रामपंचायतींना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप

Image
> बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानाची सुरुवात > सोळाही तालुक्यात पुस्तक व साहित्याचे वाटप होणार > अभ्यासिकांसाठी फर्निचर मिळणार शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात आज दारव्ह्यातून करण्यात आली असून या अभियानांतर्गत ८६ ग्रामपंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक व साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत, पुणे येथील सह्याद्री अकॅडमीचे तुषार घोरपडे आदी अधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग

यवतमाळात सलग तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्य

Image
Ø 350 वा शिवराज्यभिषेक सोहळानिमित्त आयोजन Ø महानाट्यात 200 पेक्षा अधिक कलावंतांचा सहभाग Ø यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात जवळपास 200 कलावंतांचा सहभाग राहणार आहे. महानाट्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तीन दिवशीय महानाट्याचे उद्घाटन दि.29 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 समता मैदान येथे होईल. उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहे. महानाट्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभि

आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या अर्थसहाय्य योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन २५ जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जाणार

पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत समाविष्ठ टिएसपी आणि ओटिएसपी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी न्युक्लियस बजेटअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या लाभासाठी आदिवासी बांधवांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रकल्पाच्यावतीने १०० टक्के अनुदानावर आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट, बियाणे व कीटकनाशक, तारकुंपण, व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजना राबविल्या जात आहेत. तसेच ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना शेळीगट, बियाणे, तारकुंपण, व्यवसाय, वनपटेधारकांना बियाणे, शेती अवजारे, आदिवासी पुरुष व महिला बचत गटांना विटभटीसाठी अर्थसहाय्य करणे या योजना राबविल्या जात आहेत. यासह गट क मधील १०० टक्के अनुदानावर आदिवासी खेळाडूंना अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना शेतजमीन मोजण्यासाठी अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अर्थसहाय्य, आणि वैद्यकिय व इंजिनिअरींग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य करणे या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूकांना आपले अर्ज, आवेदनपत्र दि.25 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत प्रकल

मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सर्वेक्षण प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण दिनांक २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत केले जाणार आहे. यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे. पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्यादृष्टीने समिती गठित करण्यात आली आहे. याच अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी सर्वेक्षण कामात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेचा वारसा सुरु ठेवावा - संजय राठोड

सेवानिवृत्त पोलीस स्नेहमिलन सोहळा उत्साहात पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवेचा वारसा अविरत सुरु ठेवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळद्वारा आयोजित सेवानिवृत्त पोलीस स्नेहमिलन सोहळा येथील सेलिब्रेशन हॉल येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास आमदार मदन येरावार, सेनि पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बयास, तारीक लोखंडवाला यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्याचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. निवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून पोलिसांनी समाजसेवेचा अविरत वारसा सुरु ठेवावा, असे आवाहन केले. या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

न्युक्लिअस बजेट अंतर्गत प्रशिक्षण योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाच्यावतीने प्रकल्पात समाविष्ठ टिएसपी व ओटिएसपी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या सामुहिक लाभाच्या प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या प्रशिक्षण योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे. न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत आश्रमशाळेवरील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण, शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेवर सीपीआर ट्रेनिंग, गुड टच बॅड टचबाबत मार्गदर्शन, आश्रमशाळेवरील विद्यार्थ्यांना संगित कलेचे प्रशिक्षण, आश्रमशाळेवर घनकचरापासून सेंद्रीय खत निर्मितीचे मशिन खरेदी, महिला बचत गटासाठी अर्थसहाय्य करणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देणे, आश्रमशाळेमध्ये ॲडव्हांस स्टेम्स लॅब स्थापन करणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अबॅकसचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी बिझनेस डेव्हलपमेंटबाबत कार्यशाळा आयोजित करणे या योजना राबविण्यात येत आहे. यासह गोंडवाना सम्राज्ञी दुर्गावतीबाबत दोन प्रयोग सादर करणे, बिरसा मुंडा महानाट्याचा प्रयोग सादर करणे, आदिवासी पारधी किंवा फासेपारधी पाड्यावर जनजागृती करण

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांच्या दारी - केंद्रीय मंत्री हरदिप सिंग पुरी

Image
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूर्वी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. आता विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पहिल्यांदाच सरकार आणि यंत्रणा नागरिकांच्या दारी पोहोचत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी सांगितले. वणी येथील एसबी लॅान येथे विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत लाभार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री हरदिप सिंग पुरी संवाद साधतांना म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शासकीय यंत्रणा नागरिकांपर्यंत पोहोचून लाभ मिळाला की नाही याची खात्री करीत आहेत. या यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाभार्थी आनंद व्यक्त करीत

श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिन म्हणून २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्य शासनाने या वर्षासाठी २२ जानेवारी रोजी श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिन म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे. ०००

रोजगार मेळाव्यात १८६ उमेदवारांची प्राथमिक निवड

> जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीमध्ये आयोजन जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीमध्ये आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात १८६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ अंतर्गत मॉडल करिअर सेंटर द्वारा जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीमध्ये समता मैदान पोस्टल ग्राऊंड येथे १४ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ६ कंपन्यांचे प्रतिनिधी व एचआर उपस्थित राहून २५४ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्यात. या कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे व पं.दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ३३० उमेदवारांनी लाभ घेतला असून १८६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल नाशिक या कंपनीकडून तीन उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. रोजगार म

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पना > आज दारव्हा येथून होणार अभियानाला सुरुवात > यवतमाळ जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे > युपीएससी, एमपीएससीसह सरळसेवा परीक्षांविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन > ग्रामपंचायतींमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तके जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची उद्या दि. २० जानेवारी दारव्हा येथून सुरुवात होणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यास साहित्य सर्व ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, विविध सरळसेवा भरती परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व सेवक पुरस्कार अर्ज सादर करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार २०२२-२३ साठी अर्ज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन देणे, वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्

आदिवासी भागात सांस्कृतिक संकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करावे

प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पुसद या कार्यालयांतर्गत चालू आर्थिक वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, महागाव, उमरखेड व नेर या सात तालुक्यातील आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक संकुल बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले आहे. हे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय जवळ, संत सेवालाल चौक, पुसद येथे २५ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांनी केले आहे. या योजनेच्या निकषानुसार सांस्कृतिक भवन किंवा सांस्कृतिक संकुल बांधकामाकरिता जमीन विनामूल्य असणे आवश्यक आहे. जमीन विनामूल्य उपलब्ध असल्याचे ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा ठराव आवश्यक आहे. जागेचा मूळ सातबारा व उतारा, जागेचा मोजणी नकाशा, ज्या ठिकाणी संकुल मंजूर करावयाचे आहे तेथील आदिवासी लोकसंख्या तसेच त्या परिसरातील किती गावांना किंवा लोकसंख्येला आदिवासी योजनेचा लाभ होणार आहे याचा सांख्यिकी तपशील, सांस्कृतिक संकुल किंव

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश पूर्व परीक्षा २० जानेवारीला

४० परीक्षा केंद्र ; ९९०९ विद्यार्थी देणार परीक्षा जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा शनिवार दि. २० जानेवारी रोजी पूर्व परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी प्रशासनाने पूर्व तयारी केलेली आहे. ही प्रवेश पूर्व परीक्षा जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ४० केंद्रावर घेण्यात येत आहे. ९ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेदरम्यान होईल. ही प्रवेश पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रावर न चुकता ९ वाजता हजर राहावे, असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर धोपटे यांनी केले आहे.

३८ विद्यार्थ्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ

Image
पालकमंत्र्यांच्या पत्राची शिक्षण मंत्र्यांकडून दखल ; ३९ लाखांचे अनुदान वितरित राज्य शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांसाठी ३९ लाख ३० हजार ७३९ रुपये निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. हे अनुदान विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व, शस्त्रक्रिया, आजारी पडून किंवा सर्पदंशाने मृत्यू, जखमी झालेल्यांना वाटप करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ऑक्टोबरमध्ये पत्राद्वारे केली होती. याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या मार्फत लाभार्थीस एकाच हप्त्यात धनादेशाव्दारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात निश्चित कालावधीत जमा करण्यासाठी शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांच्या आदेशानुसार वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे अपघातामध्ये निधन झाले असल्य

नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार

जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत एकही व्यवहार झालेला नाही असे तालुक्यातील 57 सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटर बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संबंधितांनी दि. 22 जानेवारी पूर्वी यवतमाळ तहसिल कार्यालयास स्वतः हजर राहून म्हणणे सादर करावे, असे आवाहन तहसिलदार योगेश देशमुख यांनी केले आहे. शासनाने दि. 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष, कार्यपध्दती व इतर बाबींविषयी विस्तृत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. राज्य सेवा आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यातील बंद स्थितीत असलेले आपले सरकार सेवा केंद्राबाबत चर्चा करुन नागरिकांच्या सोयीसाठी हे केंद्रे लवकरात लवकर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील बंद पडलेली आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याच्या अनुषंगाने पात्रतेच्या न

महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी पर्यटनसंचालनालयाचे “आई” पर्यटन धोरण

Ø आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी सवलती मिळणार पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. हे धोरण पर्यटन संचालनालयाद्वारे राबविण्यात येणार आहे. या धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसूत्री जाहीर केली असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सवलती दिल्या जाणार आहेत. पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहन व सवलती देण्यात येत आहेत. यानुसार पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या १० पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल, रेस्टोरेंट, टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल कॅराव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन (जमिन, हवा, जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी अॅण्ड बी, रिसार्ट, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, व्होकेशल हाऊस, पर्यटन व्हिला, एजन्सी इत्यादी पर्यटन व्यव

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बार्टी ई व्हॅलिडिटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. या अर्जाची प्रत काढून आवश्यक सर्व मुळ कागदपत्रांसह अर्ज यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयाकडे 31 जानेवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी यवतमाळ जिल्ह्यातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने, ते व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, यवतमाळ या समितीकडे 31 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करावा. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच अर्ज स्वीकार

निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा जाहीर लिलाव

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र या कार्यालयामार्फत निरुपयोगी, निर्लेखित द्रवनत्र पात्रांचा 30 जानेवारी रोजी लिलाव करण्यात येणार आहे. निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदी करणाऱ्या खरेदीदार संस्था, कंपन्या, व्यापारींनी या लिलावात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 201 पशुवैद्यकीय संस्थांना विर्यमात्रा जतन करण्यासाठी द्रवनत्र व द्रवनत्र पात्रे पुरवठा करण्यात येतात. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, यवतमाळ येथून निरुपयोगी, निर्लेखन केलेली द्रवनत्र पात्रे विक्री करावयाची आहेत. ही पात्रे इच्छुक खरेदीदार संस्था, कंपन्या, व्यापारी यांना अवलोकनासाठी ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.यात द्रवनत्र पात्रांच्या तपशिलानुसार बीए-1.5 ची 6 पात्रे, बीए-3 ची 6 पात्रे, आयएन-50 ची 7 पात्रे, आयआर-3 ची 4 पात्रे, टीए-55 ची 32 पात्रे असे एकूण 55 द्रवनत्र पात्रे विक्रीला आहे. त्याकरीता 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, यवतमाळ वाघापुर रोड यवतमाळ येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे. ज्या संस्था, कंपन्या, व्यापारी यांना निरुपयोगी द्रवनत्र पात्रे खरेदी करावयाची असतील

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजन

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयच्या येथील नेहरु युवा केंद्राव्दारे नुकताच स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अमरीश मानकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक अजीत राठोड, सेवा निवृत्त मुख्याध्यापक नितिन खर्चे, सेवा निवृत्त पोलीस उप अधिक्षक श्री बायस , कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य रितेश चांडक, नेहरु युवा केंद्राचे अनिल देंगे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे अनिल देंगे यांनी केले. करुन युवकांना राष्ट्रीय युवा दिन व सप्ताहच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी नेहरु युवा केंद्र सातत्याने प्रयत्न

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे - डॉ.पंकज आशिया

Image
जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी रस्त्यावर वाहन चालवितांना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रस्ता सुरक्षा अभियानांच्या उद्घाटनावेळी केले. रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचे निदर्शनानुसार १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियांनांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ तर्फे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, प्रकल्प संचालक अमरेश मानकर, राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, पोलिस निरिक्षक अजित राठोड, यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मोगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे उपस्थित होते. या कार्यक्रमात शासकीय तंत्रनिकेतन येथील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आव

प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन केळापूरमधील धारणा येथून जिल्ह्यात महाअभियानाला सुरुवात

Image
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय (पीएम जनमन) महाअभियान देशभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या महाअभियानाचे उद्घाटन केळापूर तालुक्यातील धारणा येथे प्रधानमंत्र्यांच्या दुरदृष्य उपस्थितीत करण्यात आले. या महाअभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार प्रा.डॅा.अशोक उईके, आमदार डॉ.संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक याशनी नागराजन, प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधतांना या अभियानाची माहिती दिली. तसेच आदिवासी समाजातील संस्कृती, लोककलेचे कौतूक केले. केंद्र सरकारने या अभियानासाठी सुमारे २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या दोन महिन्यात देशभरातील अनेक अतिमागास आद

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीशिल शेतकरी बनावे - पालकमंत्री संजय राठोड

Image
 कृषी महोत्सव व प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  कृषि तंत्रज्ञान, बियाणे, अन्नपदार्थ, तृणधाण्याचे प्रदर्शन व विक्री यवतमाळ, दि. 14 : शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले यवतमाळ शहरातील समता मैदानात आयोजित जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संत़ष डाबरे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, या जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनी पाहायला मिळणार आहेत.त्यासोबत शेतीमध्ये उपयुक्त ठरणारे अनेक नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन होणार आहे. राज्य शासनाने हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. या माध्यमातून