सहकारी व्यवस्थापन पदविका प्रवेश सुरू

महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांच्या वतीने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका (डि.सी.एम.) अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण पध्दतीने पूर्ण करता यावा तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे. अभ्यासक्रमाकरीता महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जानेवारी ते 30 जून या मुदतीकरीता दि. 1 जानेवारी 2024 से 30 जानेवारी 2024 या मुदतीत प्रवेश देणं सुरू आहे, त्या करीता प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी