विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बार्टी ई व्हॅलिडिटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. या अर्जाची प्रत काढून आवश्यक सर्व मुळ कागदपत्रांसह अर्ज यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयाकडे 31 जानेवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी यवतमाळ जिल्ह्यातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने, ते व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, यवतमाळ या समितीकडे 31 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करावा. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच अर्ज स्वीकारले जाणार नाही असा निर्णय समितीने घेतला आहे, असे संशोधन अधिकारी मंगलामुन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी