रोजगार मेळाव्यात १८६ उमेदवारांची प्राथमिक निवड

> जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीमध्ये आयोजन जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीमध्ये आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात १८६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ अंतर्गत मॉडल करिअर सेंटर द्वारा जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीमध्ये समता मैदान पोस्टल ग्राऊंड येथे १४ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ६ कंपन्यांचे प्रतिनिधी व एचआर उपस्थित राहून २५४ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्यात. या कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे व पं.दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ३३० उमेदवारांनी लाभ घेतला असून १८६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल नाशिक या कंपनीकडून तीन उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. रोजगार मेळाव्याला खा.भावना गवळी, जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी भेट देवून उपस्थित उमेदवारांना व कंपनीला उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी दि.१८ जानेवारी रोजी कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे रोजगार मेळव्याचा समारोप मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत झाला. या रोजगार मेळाव्याचे आयोजन सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी