जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

निधी वेळेत खर्च व कामांना गती देण्याच्या सूचना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेचा जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी आढावा घेतला. या योजनांच्या खर्चाची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. योजनेतून केली जाणारी कामे आणि खर्च वेळेत करण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुख अधिकाऱ्यांना दिले. महसूल भवन येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षातील अपुर्ण कामांची स्थिती जाणून घेतली. मागील कामे येत्या काही दिवसात पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर निधी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तसेच खर्च व कामांची प्रगती यांचा आढावा देखील त्यांनी घेतला. विभागांना मंजूर निधी आर्थिक वर्षात खर्च होणे आवश्यक आहे. वर्षाचे काहीच दिवस शिल्लक आहे. पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने विभागांनी फेब्रुवारी पुर्वीच कामे पुर्ण करून खर्च करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ज्या विभागांच्या प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे, त्यांनी त्या तातडीने प्राप्त करून घ्याव्या. निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी विभागांची आहे. त्यामुळे निधी अखर्चीक राहणार नाही, याची दक्षता घ्या. योजनेतून कामे करत असतांना ती वेळेत होण्यासोबतच गुणवत्तापुर्वक होणे आवश्यक आहे, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी