कृषि महोत्सवात पौष्टिक तृणधान्य पाककला व रांगोळी स्पर्धा महिलांनी मोठ्यासंख्येत सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हा कृषि महोत्सव व प्रदर्शनीचे दि. 14 ते 18 जानेवारी दरम्यान यवतमाळातील समता मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 1.00 वाजता होणार असून उ‌द्घाटन कार्यक्रम मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हा कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या महोत्सवात दि. 15 व 16 जानेवारी रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व दि. 17 जानेवारी रोजी तृणधान्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महिला आणि इच्छुकांनी मोठ्यासंख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाककला स्पर्धा : पौष्टिक तृणधान्य विषयावर आधारित पाककला स्पर्धा ही 15 व 16 जानेवारी रोजी दुपारी 4.30 ते 5.30 यावेळेत यवतमाळमधील समता मैदान अर्थात पोस्टल ग्राऊंड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी ही 13 जानेवारीपर्यंत करावी लागणार आहे. या स्पर्धेसाठी सिमा संजय अवझाडे यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही पाककला स्पर्धा महिलांसाठी खुल्या गटाकरिता आहे. या स्पर्धेत एक दिवस अगोदर सहभाग नोंदवावा. पाककलेमधील पदार्थ स्पर्धकाने तयार करुन आणणे अनिवार्य असून पाककलेच्या मांडणी करिता अर्धा तास तथा परिक्षणाकरिता अर्धा तास अवधी देण्यात येईल. केवळ पोष्टिक तृणधान्यावर आधारित पाककला स्पर्धा असल्याने पदार्थ हे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगीरा, भगर, रावा या पौष्टिक तृणधान्याचा वापर करुन तयार केलेले असावेत. स्पर्धकाने वेळेच्या अर्धा तास अगोदर स्पर्धेच्या स्थळी हजर रहावे. परिक्षकांचा निर्णय अंतिम समजण्यात येईल. रांगोळी स्पर्धा : पौष्टिक तृणधान्य विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा ही 17 जानेवारी रोजी दुपारी 3.30 ते 4.30 यावेळेत यवतमाळमधील समता मैदान अर्थात पोस्टल ग्राऊंड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणी ही 13 जानेवारीपर्यंत करावी लागणार आहे. या स्पर्धेसाठी निलिमा बाघलकर यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही रांगोळी स्पर्धा महिलांसाठी खुल्या गटात घेण्यात येईल. या स्पर्धेत एक दिवस अगोदर सहभाग नोंदवावा. पौष्टिक तृणधान्याचा वापर करुन रांगोळी काढावी. रांगोळी स्पर्धेचा विषय मकरसंक्रात असेल. केवळ पौष्टिक तृणधान्यावर आधारित रांगोळी स्पर्धा असल्याने स्पर्धकाने पौष्टिक तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगीरा, भगर, रावा, वापर करुनच रांगोळी काढणे अनिवार्य राहील. फुले, वाणाचे-साहित्य जसे गाजर, बाटाणा, ऊस, बोर दिवे इ. यांचा वापर करण्यास मुभा दिली जाईल. स्पर्धकाने वेळेच्या अर्धा तास अगोदर स्पर्धेच्या स्थळी हजर रहावे. परिक्षकांचा निर्णय अंतिम समजण्यात येईल, अशा सूचना आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाने जारी केल्या आहेत. जिल्हा कृषि महोत्सव व प्रदर्शनीत आयोजित पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व तृणधान्य रांगोळी स्पर्धेत मोठ्यासंख्येने सहभाग घ्यावा,असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी