Posts

Showing posts from June, 2022

गेल्या 24 तासात चार पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 11 जण बरे झाले आहेत. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 46 व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण 48 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 419 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 415 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79154 आहे तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77303 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 82 हजार 136 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख दोन हजार 982 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.97 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.95 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. आज पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये नेर तालुक्यातील एक, राळेगाव एक व यवतमाळ तालुक्यातील दोन रूग्ण असून त्यात चार पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसर

लाेहारा येथील कंपनीच्या प्रकल्पावर पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी 25 जुलै रोजी

यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- मे.बालाजी इलेक्ट्रो स्मेल्टर्रस प्रा.लि., एम.आय.डी.सी. लोहारा, यवतमाळ या कंपनीद्वारे लोहारा, येथे ७.५ MVA सबमर्ज आर्क फर्नेसच्या स्थापने द्वारे फेरो अलॉयज प्लॉटचे विस्तारीकरण व सिन्टर प्लॉटसह थर्माइट प्रक्रियेद्वारे नोबेल फेरो अलॉयज चे उत्पादन करणे व सिन्टर प्लॉट या प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेणे बाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडे अर्ज सादर केला आहे. सदर प्रकल्पामुळे यवतमाळ तालुक्यातील लोहारा,भुयार,वाघापुर, चिंचबर्डी, इचोरी, किन्ही ही गावे प्रभावित होणार आहे. त्याअनुषंगाने प्रस्तावित प्रकल्पाची जाहिर जनसुनावणी 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रकल्प स्थळ, प्लॉट नं.बी- १७,बी- १७/१ आणि बी १/१ एम आय डी सी लोहारा, ता.जि. यवतमाळ येथे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली आहे. सदर सुनावणी कंपनीचे परीसरात तसेच ऑनलाईन पध्दतीने वे-बॅक्स ॲप व्दार घेण्यात येईल. मौखिक किंवा लेखी आक्षेप जाहिर जनसुनावणीच्या वेळीसुध्दा नोंदविता येईल. सदर प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल पर्यावरण व्यवस्थापन

डी. एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची डी. एल.एड. प्रथम वर्ष प्रवेश पक्रिया ऑनलाईन पध्दतीने 23 जून 2022 पासून सुरु झाली आहे. डी. एल.एड. प्रवेश प्रक्रियेबाबतची प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालय यादी, वेळापत्रक, प्रवेशाबाबतच्या सूचना व अर्ज www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र 23 जून ते 8 जुलै 2022 या कालावधीत भरावययाचे असून अर्ज भरतांना विद्यार्थ्यांचे इमेल आयडी व मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. ऑनलाइन पडताळणी झाल्यावर त्रुटीसह गुणवत्ता यादी 11 जुलै रोजी तर पुर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी 13 जुलै रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रथम फेरी प्रवेशाची यादी 14 जुलै रोजी जाहीर होईल यानुसार उमेदवारांनी 14 ते 18 जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करावयाचा आहे. तद्नंतर 19 जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देता येईल. दुसऱ्या फेरीची यादी 21 जुलै व तिसऱ्या फेरीची यादी 28 जुलै रोजी जाहिर करण्यात येणार आहे. दिलेल्या विकल्पाप्रमाणे विद्यार्थ्यांनी डी.एल.एड. साठी आपले प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण

कोविड सानुग्रह अनुदानाचा 50 हजार निधी प्राप्त न झाल्यास

आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- कोविड-19 आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास शासनातर्फे रुपये 50 हजार सानूग्रह सहाय प्रदान करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ऑनलाईन पध्दतीने काही पात्र अर्जदारांच्या बॅंक खात्यात रुपये 50 हजार इतके सानूग्रह अनूदान जमा करण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्यावरही अनुदान खात्यात जमा झालेले नाही. महसूल व वनविभाग यांचे पत्रानूसार अर्जदारांच्या बॅक तपशील बरोबर नसल्याने किंवा आधार बॅंक खात्याशी सलंग्न नसल्याने सानूग्रह मदत जमा झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. करीता ज्या अर्जदारांना पैसे जमा झाल्याचा मॅसेज येत आहे परंतु खात्यात पैसे जमा झालेले नाही त्या सर्व अर्जदारांनी अर्ज केल्याचा टोकन आयडी, बॅंक खाते पासबुक, पर्यायी बॅक पासबूक इत्यादी माहितीसह आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे भेट द्यावी. अधिक माहिती करीता 07232-240720 / 242488 तसेच 7620046636 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले

गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील 23 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर नऊ जण बरे झाले आहेत. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 53 व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण 55 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 714 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79150 आहे तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77292 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 81 हजार 717 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख दोन हजार 567 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.98 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3.22 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. आज पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव तालुक्यातील एक, दारव्हा चार, दिग्रस 10, नेर सात व राळेगाव तालुक्यातील एक रूग्ण असून त्यात चार महिला व 19 पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे

यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार

31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता यवतमाळ जिल्ह्यात 245 ठिकाणी रास्तभाव दुकानांचे प्रधीकारपत्र मंजूर करणेकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. रास्तभाव दुकान परवाना मिळणेकरिता विहीत नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून 31 जुलै 2022 पर्यंत संबंधीत तहसिलदार यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. रास्तभाव दुकानांसाठी जाहीरनामा मंजुर केलेल्या गावाचे नाव पुढीप्रमाणे आहे. महागांव तालुक्यातील सेवादासनगर; पुसद तालुक्यातील पाळोदी, हर्षी, मांडवा, पोखरी, लोभिवंतनगर, बाळवाडी, धानोरा इ., पन्हाळा, मारवाडी खु, चोंढी, पारवा बु, येहळा, गहुली, अमृतनगर, इसापूर धरण, जामनाईक-२, माळआसोली, शिवाजीनगर; वणी तालुक्यातील रांगणा, झुला, बोर्डा, कोलेरा, वडजापूर, महाकालपूर, येनक, साखरा को., वणी-४, कायर, बाबापूर, पठारपूर, वांजरी, झरपट, वागदरा, गोवारी नि., नायगाव खु, धोपताळा, जुनाडा, बोरगाव जु, लाठी, निवली, शेलू बु, कुं

फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेयची नोंद सातबारावर घ्यावी

पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र जमिनीबाबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांचे आवाहन यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ज्या स्लॅब पात्र भूधारकांच्या / खातेदांराच्या जमीनी संपादीत (निवाडा घोषित) करण्याची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आली नाही, परंतू पुनर्वसन अधिनियमातील तरतूदी अन्वये अशा जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव म्हणून शेरे नमुद करुन हस्तांतरणावर निर्बंध लावण्यात आले आहे, तसेच पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र भुधारकांच्या खातेदाराच्या जमीनीच्या हस्तांतरण व्यवहारावर जमिनीच्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कामध्ये कोणतीही नोंद न घेता काही प्रकरणी केवळ संबंधीत अधिसुचनेच्या आधारे निर्बंध लादण्यात आले आहे, अशा प्रकरणी “पुनर्वसन अधिनियमातील तरतूदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भुसंपादनाचा अधिकार अबाधीत ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय” करण्यात आले आहे. पुनर्वसन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचेकडून सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना सदर शासन निर्ण

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती गठीत होणार

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकतेबरोबर नाविन्यतेस प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, स्थानिक आयटीआय चे प्राचार्य या बरोबर माविम आणि उमेद अभियानाचे प्रतिनिधी, खाजगी इन्क्युबेशन सेंटरचे प्रतिनिधी आदी सदस्य या समितीवर असतील. जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या संदर्भांतील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्याच्या खरेदी प्रक्रीयेत स्टार्टप्सना प्राधान्य देण्यास सहकार्य करण्यात येईल. स्टार्टअप्सना क्वालिटी टेस्टिंग पेटंटसाठी सहाय्य करण्यात येईल. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात महिला उद्योजकता कक्षाची स्थ

रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करा

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी करावी. तसेच ज्या उमेदवारांच्या नावात बदल, आधारकार्ड, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता याबाबत नमुद संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करुन घ्यावी. उमेदवारांनी जुना युझर आयडी, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकुन खाते उघडावे. आपला आधार क्रमांक व अचुक माहिती नमुद करुन सबमिट करावे. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकुन सबमिट करावे. त्यानंतर उमेदवारांनी माहिती भरुन पासवर्ड तयार करावा व तो सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी व पासवर्ड चा मेसेज येईल.त्यानंतर मुख्य होम पेजला भेट देवुन मोबाईल क्रमांकावर आलेल्या युझरनेम पासवर्डव्दारे लॉगईन करुन आपली संपुर्ण माहिती भरुन जनरेट रिसिप्ट व्दारे आपल्या रोजगार नोंदणी कार्डच्या प्रतीची प्रिंट प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या स

4 जुलै रोजी लोकशाही दिन

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, त्याअनुषंगाने सोमवार दि. 04 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाने ऐकूण घेतील व त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी व सिईओ यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Image
Ø पुष्पगुच्छ व चॉकलेट देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत Ø विद्यार्थ्यांकडून अक्षरे, अंक, ए,बी,सी,डी, चे वाचन Ø स्वच्छतेबाबत केले मार्गदर्शन Ø पारडी नक्सरी, मेटीखेडा, मारकंड, वाडी-पोड येथील शाळेत भेट यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी शाळेत संवाद साधला व त्यांना पुष्पगुच्छ तसेच चॉकलेट देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी हे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी आज कळंब तालुक्यातील पारडी नक्सरी, मेटीखेडा व मारकंड तसेच पांढरकवडा तालुक्यातील वाडी पोड येथील शाळेत भेट देवून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून अक्षरे, अंक, ए,बी,सी,डी, चे वाचन करवून घेतले. जिल्हाधिकारी यांनी वर्गखोल्यांची पाहणी केली व शाळेत काय

माॅडल रास्तभाव दुकानाचा अवलंब पुर्ण जिल्ह्यात करा- जिल्हाधिकारी

Image
* मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाचे उद्घाटन यवतमाळ दि. 28 : जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तयार केलेल्या मॉडेलप्रमाणे तयार करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांना आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे म्हणून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी जिल्हा पुरवठा कार्यालय यवतमाळ येथे मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाची निर्मिती केलेली असून सदर मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाची पाहणी केली. यावेळी विविध माहिती दर्शक फलके जसे- रास्तभाव दुकानाचे नाव, साठा फलक, भाव फलक, शिधापत्रिका तपशील फलक, वाटपाचे प्रमाण दर्शविणारा फलक, दक्षता समिती फलक, पुरवठा विभागाच्या विविध योजनांचे निकष दर्शविणारा फलक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभ दर्शविणारा फलक, वजने पडताळणी प्रमाणपत्र, परवाना प्रत, प्रथमोपचार पेटी, हरवलेल्या शिधापत्रिकांची पेटी, सर

सामाजिक न्यायासाठी धावले यवतमाळ... सामाजिक समतेचा संदेश पुढे न्या - जिल्हाधिकारी

Image
यवतमाळ दि. २६ जून : राजर्षी शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिन आणि अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'रन फॉर सोशल जस्टिस' चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, तीन वर्षीय बालकांसह ८२ वर्षीय माणिक जुनघरे तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, खेळाडू व यवतमाळकर नागरिक आज समता मैदान ते धामणगाव रोड मार्गावर धावले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे व निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे हे १० कि.मी. तर पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ हे ५ कि.मी. अंतर धावले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेला सामाजिक समतेचा संदेश तसेच अमली पदार्थापासून दूर राहणे व शारीरिक सुदृढता ठेवण्याचा संदेश या रन मधून प्रसारित करण्याचे सांगितले. यावेळी १० कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत विजेता ठरलेले अजिंक्य गायकवाड, मंगेश कोकांडे, संकेत सिंधनदुधे, रिना मेश्राम, गुंजन खिची, अवंती का वासनीक, ५ कि.मी. मधील ओम देशमुख, प्रणय टिचकु

राजर्षी शाहु महाराजांचे विचार समाजात रूजवण्याचा निश्चय करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
Ø शाहू महाराजांचे जीवन म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच Ø विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे चारित्र्य समजून घेत त्याचा अंगीकार करावा Ø परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शिक्षणाचा करा वापर यवतमाळ, दि 26 जून, (जिमाका) :- राजर्षी शाहू महाराजांनी जनहितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे रयतेचा राजा म्हणून त्यांची ओळख झाली. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, स्री-पुरूष समानता, महिलांना मताधिकार, आंतरजातीय विवाह यासारखे अनेक निर्णयातून काळाच्या पुढे जात त्यांनी समाजात समता प्रस्तापित करण्याचे कार्य केले आणि पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी व अंमलबजावणी त्याकाळी केली. आजच्या पिढीने सामाजिक समतेचा वारसा पुढे नेण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजात रूजवण्याचा निश्चय करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जात पडताळणी समितीचे उपाय

पुसद प्रकल्प कार्यालयातंतर्गत आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा संपन्न

Image
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे द्वारा पुरस्कृत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पुसद जि.यवतमाळ व्दारा आयोजित आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा दिनांक 24.06.2022 रोजी पुसद येथील कलावती पाटील मंगल कार्यालय येथे मोठया उत्साहात पार पडली. मनमोहक व उत्सफुर्तशाली अशा या कार्यक्रमाचे उदघाटन मा. साईनाथ नरोट, सहाय्यक वनसंरक्षक, पुसद यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आत्मारामजी धाबे, प्रकल्प अधिकारी, पुसद हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन ॲड. सुनिल ढाले, अध्यक्ष, प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समिती, पुसद तसेच समितीचे सदस्य पांडुरंग व्यवहारे, शिवाजी खरवडे, कु.पुजा खुडे यांच्यासह डॉ. प्रशांत नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी, पुसद दिपक ढुमने, सहा.पोलिस निरीक्षक,पुसद पिठलेवाड, माजी पोलिस निरीक्षक हे उपस्थित होते. तसेच आदिवासी समाजसेवक रामकृष्ण चौधरी व नारायण क-हाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मारोती भस्मे, नाईकडा समाज संघटनेचे अध्यक्ष नारायण पिलवंड व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी व

तंत्रज्ञानाचा उपयोग उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी करा

Image
डिजिटल शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन  डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करा  मुलांच्या शिकण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी दोन पावले पुढे जाऊन नियोजन करा यवतमाळ, दि 25 जून, (जिमाका) :- शिक्षकांनी डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करावा. तंत्रज्ञानाच्या उपयोगातून सर्व विद्यार्यां ना चांगल्या पद्धतीने घडविण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात आपले संपुर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिक्षकांना केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या पुढाकाराने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमाळ यांनी एज्युफ्रंट टेक्नॉलॉजी आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शिक्षक प्रशिक्षण अभियानाचे आयोजन आज सामाजिक न्याय भवन येथे केले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, एज्युफ्रंट टेक्नॉलॉजीचे विपणन अधिकारी अरूण मेहरा प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधि

गेल्या 24 तासात चार कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील चार महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यात बाभुळगाव तालुक्यातील एक, यवतमाळ दोन व इतर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 411 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी चार अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 407 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79110 आहे. तर काल एक जण बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77277 झाली आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 27 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 30 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 79 हजार 633 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 523 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.99 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.97 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

अनेकदा समाजात दारू आणि तंबाखू हेच अमली पदार्थ आहे असं समजलं जातं. परंतु आज समाजामध्ये भांग, गांजा, चरस, हीरोइन, एम.डी. पावडर यासारखे अमली पदार्थ आपल्या तरुणांच्या रक्तामध्ये दिसून पडतात. 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस. यानिमित्त अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम आणि व्यसमुक्तीची माहिती. किशोरवयाच्या उंबरठ्यावर प्रत्येक जण शारीरिक, भावनिक व मानसिक स्तरावर एका नव्या परिस्थितीचा अनुभव करत असतो. हे वय म्हणजे पाण्याच्या प्रवाहासारखे असतं. आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्साहात, उमेदीत तर कधी उन्मादात व्यतीत होत असतो. किशोर वयामध्ये नवीन प्रयोग करण्याचे, धोके पत्करण्याची मानसिकता तरुणांमध्ये असते. कधी पार्टीच्या निमित्ताने, तर कधी मित्राच्या दबावाखाली, सहजच उत्सुकता म्हणून अथवा सिनेमातील हीरो हीरोइन चे अनुकरण करून तरूणाई एखाद्या अंमली पदार्थाचे सेवन करत व्यसनाधीन होतात. तारुण्याचे अमृत प्राशन करत असतांना कळत-नकळत व्यसनाचा प्याला हातात येतो. मग पुष्कळदा मानसिक तणाव, उदासीनता, याच्या प्रभावाखाली किंवा उत्साह वाढवण्यासाठी या पदा

आयटीआय मध्ये 27 जून रोजी भरती मेळावा

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- सुझुकी मोटर गुजरात करिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 27 जून 2022 रोजी प्रशिक्षणार्थीं रोजगार भरती मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. फीटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिसियन, ट्रॅक्टर मेकॅनिक, टूल अँड डाई मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, सी.ओ.ई. ऑटोमोबाईल, पेंटर जनरल या व्यवसायाकरीता 18 ते 23 या वयोगटातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी 27 जून रोजी सकाळी 9 वाजता रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. भरती मेळाव्यासाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींची लेखी परीक्षा कंपनी तर्फे घेण्यात येणार आहे व उत्तीर्ण उमेदवारांनी दिनांक 28 जून रोजी आय.टी.आय. पुलगाव येथे प्रत्यक्ष मुलाखती करीता उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी दहावी, बारावी पास गुणपत्रिका, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, प्रत्येक सेमिस्टर चे आय.टी.आय मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व आवश्यक कागदपत्राच्या तीन झेरॉक्स प्रती तसेच पाच छायाचित्रे सोबत आणावे. रोजगार मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचा

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबाहुल शाळेत

पायाभूत सोयी-सुविधेसाठी रुपये दोन लक्ष अनुदान योजना Ø प्रस्ताव सादर करण्याची मुदत 31 जुलै 2022 यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासन मान्यताप्राप्त अनुदानित / विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रुपये दोन लक्ष अनुदान देण्याची योजना महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त नमूद शाळा/संस्थांमध्ये अल्पसंख्यांक (मुस्लिम,ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन ) विद्यार्थ्यांची संख्या किमान 70 टक्के तसेच शासनमान्य खाजगी अपंग शाळांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालविणाऱ्या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयं-अर्थसहाय्यित शाळा या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असणार नाह

गर्भपात कायदा उल्लंघनाची माहिती देणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- राज्यात गर्भधारणा किंवा प्रसवपुर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा 1994 सुधारित 2003 व वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गर्भपात केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असेल किंवा गर्भलिंग चाचणी करुन अवैधरित्या गर्भपात केले जात असतील किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करत असतील तर अशा केंद्राविषयी / व्यक्ती विषयी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांना कळवावी. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस त्यांनी दिलेल्या बातमीची खातरजमा करुन रुपये एक लाख बक्षीस देण्यात येईल. ती व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी /अधिकारी तसेच इतर शासकीय व निमशासकीय कर्मचारी/अधिकारी अशी कोणीही असू शकेल. माहिती देणाऱ्या व्यक्ती बद्दल गुप्तता ठेवण्यात येईल. तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास हेल्प लाईन क्र. 1800-233-4475 किंवा www.amchimulagi.gov.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी अथवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,यवतमाळ यांना कळवावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

Ø प्रस्ताव सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2022 Ø यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- राज्यातील नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसा चालविणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्याकरीता शिक्षकांना मानधन, पायाभूत सुविधांसाठी व ग्रंथालयासाठी अनुदान अनुदान देण्यात येते. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन अनुज्ञेय आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी फक्त प्रथम वर्षी रु.50 हजार व तद्नंतर प्रति वर्षी रु.5 हजार अनुदान देय आहे. तसेच पायाभूत सुविधांसाठी जास्तीतजास्त रु. 2 लाख अनुदान देय आहे. पायाभूत सुविधांपैकी ज्या प्रयोजनांसाठी यापूर्वी अनुदान देण्यात आले आहे, त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. ज्या मदरसांना स्किम फॉर प्रोव्हायडींग क्व

जिल्ह्यात 25 जुन ते 1 जुलै पर्यंत कृषी संजिवनी मोहीम

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजिवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनीक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. याअंतर्गत 25 जुन रोजी विविध पीकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दिन, 27 जुन रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन,28 जुन रोजी खत बचत दिन, 29 जुन रोजी प्रगतिशील शेतकरी दिन, 30 जुन रोजी शेतीपुरक व्यवसाय दिन व 1 जुलै रोजी कृषी दिन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी सदर सप्ताहामध्ये तालुकानिहाय विविध ठिकाणी होणाऱ्या शेतकरीसभा, प्रशिक्षण प्रात्यक्षिक, शेतीशाळा व शिवार फेरीमध्ये शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

गेल्या 24 तासात 11 कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तीन, नेर एक, राळेगाव एक व यवतमाळ येथील चार रूग्णांचा समावेश असून त्यात चार महिला व सात पुरूष आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 430 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 419 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79106 आहे. तर काल पाच जण बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77276 झाली आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 24 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 27 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 79 हजार 222 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 116 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.0 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.56 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व ती

अंमली पदार्थाचे सेवन हा देशद्रोहच ! प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांचे युवकांना प्रबोधन

Image
यवतमाळ दि. 24, अंमली पदार्थाचे सेवन हे शरीराला हानीकारक तर आहेच यासोबतच त्याच्या सेवनामुळे अंमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या शत्रु राष्ट्रांना यातून नफाखोरी मिळवून देण्याचे काम होत असल्याने अंमली पदार्थाचे सेवन हा देशद्रोह देखील असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे. 26 जून या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस प्रशासन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आज कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, जिल्हा न्यायाधीश ए.ए.लऊळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए.नहार, वकील संघाचे ॲड. संदिप गुजरकर, प्राचार्य पी.एम.खोडके प्रामुख्याने उपस्थित होते. सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी पुढे बोलतांना सांगितले की युवकांनी आपले मित्र मैत्रिण यांना अंमली पदार्थ घेण्यापासून परावृत्त करावे व जीवनात कितीही अडचणी किंवा नैराश्य आले तरी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता आपले राष्ट्र घडवि

26 जून 2022 रोजी “सामाजिक न्याय दिन”

यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- दि. 26 जून 2022 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागातर्फे सकाळी 9.00 वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. समता दिंडी 26 जून 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता नगर परिषद माध्यमिक विद्यालय,येरावार चौकातून निघणार आहे. समता दिंडीचा मार्ग-येरावार चौक पोलीसस्टेशन-बस-स्टँड चौक-अमरावती रोड या मार्गाने व शेवटी दिंडीचे विसर्जन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे होणार आहे. सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,यवतमाळ येथे सकाळी 11.00 वाजता मान्यवरांचे उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त,समाज कल्याण,यवतमाळ भाऊराव रा. चव्हाण यांनी कळविले आहे.

पी.एम. किसान योजनेंतर्गत बँक खात्याची इ-के.वाय.सी. पुर्ण करा जिल्हाधिकारी यांचे लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन

Ø इ-के.वाय.सी. पूर्ण करण्याकरिता 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ Ø इ-के.वाय.सी. साठी ओ.टी.पी. मोड व बायोमेट्रीक मोड या दोन पद्धती Ø इ-के.वाय.सी. पूर्ण करणेकरिता सुशिक्षीतांनी शेतकऱ्यांना करावी मदत यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा होण्याकरिता त्यांचे बँक खाते इ-केवायसी करणे बंधनकारक असून सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे खात्याची इ-केवायसी पुर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी 2019 पासुन सुरु केली आहे. आजरोजीपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३लाख ५३ हजार १७१ शेतकऱ्यांची नोंदणी पी.एम. किसान सन्मान निधी पोर्टलवर करण्यात आलेली आहे. लाभाचे हप्ते सर्व पात्र नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभ प्राप्तीची प्रक्रीया सुलभ व सुरळीत होण्याच्या उद्देशाने सर्व पात्र लाभार्थ्यांचे इ-केवायसी

गेल्या 24 तासात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात दारव्हा तालुक्यातील चार, मारेगाव एक, नेर दोन, राळेगाव एक व यवतमाळ येथील एका रूग्णांचा समावेश असून त्यापैकी एक महिला व आठ पुरूष आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 580 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 571 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79095 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77271 आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 18 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 21 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 78 हजार 792 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 99 हजार 697 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.0 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.55 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून पुर्ण लसीकरण कर

अध्ययन स्तरात वृद्धीसाठी शिक्षकांनी सुक्ष्म नियोजन करावे

Image
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिक्षकांना दिल्या सूचना शिक्षकांच्या सांघीक प्रयत्नातूनच गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडतील Ø जिल्हा प्रशासनातर्फे शिक्षकांसाठी ‘प्रेरणा कार्यशाळा’ Ø ‘यशस्वी शिक्षक.. आदर्श विद्यार्थी.. आदर्श शाळा..’ ही संकल्पना Ø 16 तालुक्यातील शिक्षकांसाठी चार दिवस प्रशिक्षणाचे आयोजन Ø प्रथमच सर्व प्राथमिक व माध्यमीक शाळांचे शिक्षकांना एकत्रित प्रशिक्षण Ø जिल्हा परिषद, नगरपरिषद, आश्रमशाळा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शाळेचे शिक्षक उपस्थित Ø यावर्षी शिक्षकांसाठी ‘झेप’ हा उपक्रम राबविण्यात येणार यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- शिक्षकांच्या सांघीक प्रयत्नातूनच जिल्ह्यात गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडणार असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वृद्धी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात अधिक सक्षमतेने योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. निपूण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढवून एकंदर शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शिक्षकां

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य 26 जून रोजी धावण्याची स्पर्धा

यवतमाळ, दि 22 जून, (जिमाका) :- राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य 26 जून 2022 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी पोस्टल मैदान ते धामणगांव रोड या मार्गावर 3 किलोमिटर, 5 किलोमिटर आणि 10 किलोमिटर पर्यत अंतरासाठी धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुक स्पर्धकांनी २६ जून २०२२ रोजी सकाळी ०५.३० वाजता पोस्टल ग्राउडला उपस्थित राहावे. सकाळी ०६.०० वाजता धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात होईल. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांनी आपले नाव व मोबाईल नंबरची यादी rdc_yavatmal@rediffmail.com या ई-मेल वर २४ जून २०२२ रोजी पर्यत सादर करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक अमोल पवार यांनी कळविले आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाची जन सुनावणी 5 जुलै रोजी अमरावतीला

यवतमाळ, दि 22 जून, (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केली असून अमरावती विभागाची सुनावणी 5 जुलै 2022 रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सकाळी 11 वाजतापासुन सुरू होणार आहे. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ., हडगर, तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत तसेच केवट समाजातील तागवाले/तागवाली इत्यादी जाती जमातीच्या लोकांनी सुनावणीस उपस्थित राहावे असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

आय. टी. आय. मध्ये प्रवेश सुरु

यवतमाळ, दि 22 जून, (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यवतमाळ येथे प्रवेश प्रक्रियेला 17 जून 2022 पासुन सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवारांना संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी WWW.ADMISSION.DVET.GOV.IN या संकेतस्थळाला भेट देवुन आपला प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. प्रवेश अर्ज पुर्ण भरल्यानंतर संस्थेत येवून प्रवेश अर्ज तपासुन, स्विकृत केल्याची पावती घ्यावी. नंतरच आपल्या पसंती क्रमानुसार व्यवसाय निवड करुन घ्यावे. संस्थेत एकूण 19 व्यवसाय असून 32 तुकड्यांमध्ये एकूण 704 उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही सन 1963 पासुन कार्यरत असून मागील वर्षी संस्थेला महाराष्टातुन प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता संस्थेच्या चौकशी कक्षात किंवा वरील संकेतस्थळावर भेट द्यावी, असे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी कळविले आहे.

नाबार्डतर्फे यवतमाळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Image
यवतमाळ, दि 21 जून, :- दिनांक २१ जून २०२२ रोजी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सुमारे ४० सहभागी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नाबार्ड, जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम यांनी केले होते. श्री विजय भगत, संचालक, आरएसईटीआय आणि श्री ए बी खिरटकर, सीबीआय, एफएलसी प्रभारी हे देखील योग सत्रात सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक अभिलाषा जोशी यांनी योगासन आणि त्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की योग आपल्याला आपल्या शरीरावर तसेच मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. तणाव आणि चिंतापासून मुक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. योगामुळे शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले राहते. मनाची ताकद, एकाग्रता वाढते. सर्व सहभागींनी प्रामाणिकपणे योग सत्रात उत्साहाने भाग घेतला. 000

सैनिकी मुलींचे वसतिगृहात सत्र 2022-23 साठी प्रवेश सुरू

यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- शैक्षणिक सत्र 2022-23 करीता यवतमाळ येथील शाळा, महाविद्यालयात उच्च शिक्षणाकरीता प्रवेश घेतलेल्या युध्द विधवा, माजी सैनिक विधवा, आजी / माजी सैनिकांच्या मुलींना वीरमाता रमाबाई पंडित व जनरल पंडित सैनिकी मुलींचे वसतिगृह, शासकीय रुग्णालयासमोर, यवतमाळ येथे प्रवेशप्रक्रीया सुरु करण्यात येत आहे. वसतिगृहामध्ये एकुण 25 विद्यार्थींची क्षमता असुन त्यात माजी सैनिकांचे अनाथ पाल्यांना भोजन, मोफत निवास व माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात शुल्क आकारण्यात येते. तसेच वसतिगृहात जागा शिल्लक असल्यास इतर नागरिक यांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 अशी आहे. तरी मुलींना वसतीगृहामध्ये प्रवेश घेणे करीता आपले ओळखपत्र, डिस्चार्च पुस्तक, प्रवेश घेतलेल्या शाळा/महाविद्यालयातील बोनाफाईड प्रमाणपत्र घेवुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ (फोन नंबर 07232-245273) किंवा सैनिकी मुलींचे वसतिगृह, शासकीय रुग्णालयासमोर, यवतमाळ येथे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. 000
सैनिकांच्या पेंशन प्रणाली “स्पर्श” वर पुलगाव येथे कार्यशाळा 22 जून रोजी आयोजन यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी/सैनिकांच्या पेंशन वाटपाची नविन प्रणाली “स्पर्श” टप्याटप्यात लागू करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी सी.ए.डी. पुलगांव येथील प्रेक्षागृहात बुधवार दिनांक 22 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिक / विधवा माजी सैनिक पेंन्शनधारक यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे. 000

गेल्या 24 तासात सहा कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात दारव्हा तालुक्यातील एक, दिग्रस दोन, यवतमाळ एक व इतर शहरातील दोन रूग्णांचा समावेश असून त्यापैकी चार महिला व दोन पुरूष आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 442 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79086 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77269 आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 11 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 14 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 77 हजार 798 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 98 हजार 712 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.01 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.36 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून पुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्

‘योगाभ्यास’ दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- रोज योग केल्यास आपले शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले राहून आपली कार्यक्षमता वाढण्यास नक्कीच फायदा होतो. त्यामुळे शारीरीक व्यायामासाठी रोज 15 ते 20 मिनीटे वेळ काढून योगाचा अभ्यास वर्षभर करावा व योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आठव्या योग दिन कार्यक्रमानिमित्त केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे केंद्रिय संचार ब्युरो कार्यालय, जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा क्रिडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, केंद्रीय संचार ब्युरो अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण व विविध योग संघटनांचे पद

१ ते १५ जुलै  विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या आणि शहरी भागातिल झोपडपट्ट्या भागात लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
यवतमाळ, दि 20 जून, (जिमाका) :- भारतामध्ये 0 ते 5 वर्ष या वयोगटात होणाऱ्या एकूण बालमृत्यूमध्ये अतिसार व निमोनियामुळे होणारे कुपोषण कारणीभूत आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य टक्केवर आणण्यासाठी धडक अतिसार नियंत्रण पंधरवडा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेत आदिवासी भागातील तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या तसेच शहरी भागातिल झोपडपट्ट्या आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.   धडक अतिसार नियंत्रण पंधरवडा यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी सजिवकुमार पांचाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया उपस्थित होते.   ओ. आर. एस. चे द्रावण कसे बनवावे याची माहिती आणि प्रात्यक्षिक प्रत्येक घरापर्यंत पोचवावे. त्याचबरोबर शरीर पाणीयुक्त कसे ठेवावे, अतिसा

एकल वापर प्लास्टीकवर 1 जुलैपासून बंदी प्लास्टीक निर्मूलनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

Image
• किमान 120 मायक्रॉन जाडीचेच प्लास्टीक वापरता येणार • 25 हजार रुपये दंड व तीन महिने कारावास शिक्षेची तरतुद • बंदी असलेले प्लास्टीक सर्व शासकीय कार्यालयातून नष्ट करा यवतमाळ, दि 20 जून, (जिमाका) :- केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार एकल वापर प्लास्टीकचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री व वापर करण्यावर 1 जुलै 2022 पासून संपुर्ण भारतात बंदी घालण्यात आली आहे, तसेच 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सर्व मोठे व मध्यम दुकानदार तसेच नागरिकांमध्ये आतापासूनच सूचना देवून जनजागृती करण्याचे व बंदी असलेले प्लास्टीक वापराविरूद्ध 1 जुलै पासून दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज यंत्रणेला दिल्या. प्लास्टीक निर्मूलनाकरिता जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरचे विभागीय अधिकारी अतुल सातफळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, नगर प्रशासन

खते व बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Ø बीजप्रक्रीया व अमरपट्टा पेरणीचे प्रात्याक्षीके शेतकऱ्यांच्या बांधावर घ्या Ø जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध Ø कृषी निविष्ठाच्या तक्रारी 9403961157या क्रमांकावर नोंदवा Ø बियाणे खरेदीची पावती जपून ठेवा यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची कृत्रीम टंचाई निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांना चुकीचे बियाणे देवून कोणी फसवणूक करणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे व जाणूनबुजून टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आमले येडगे यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गुवणवत्ता नियंत्रण अधिकारी शिवा जाधव, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच खते व बियाणे कंपण्याचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन शारिरिक व मानसिक सुदृढतेसाठी नियमित योग करा यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 21 जून 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्यात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच शारिरिक व मानसिक सुदृढतेसाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून रोजी सकाळी 6.30 ते 7.45 दरम्यान जिल्ह्यात योग दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त यवतमाळ शहरातील जिल्हा क्रिडा संकुल येथे तसेच प्रत्येक तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यालय, महाविद्यालय युवक, युवती, विद्यार्थी, नागरीक यांनी सकाळी 6.30 वाजेपासून कार्यक्रमात सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रमाला येतांना स्वत:चे आसन सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. योग दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी

ते व बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

ख Ø बीजप्रक्रीया व अमरपट्टा पेरणीचे प्रात्याक्षीके शेतकऱ्यांच्या बांधावर घ्या Ø जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध Ø कृषी निविष्ठाच्या तक्रारी 9403961157या क्रमांकावर नोंदवा Ø बियाणे खरेदीची पावती जपून ठेवा यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची कृत्रीम टंचाई निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांना चुकीचे बियाणे देवून कोणी फसवणूक करणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे व जाणूनबुजून टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आमले येडगे यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गुवणवत्ता नियंत्रण अधिकारी शिवा जाधव, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच खते व बियाणे कंपण्याचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधा

गेल्या 24 तासात एक कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ शहराच्या भोसा परिसरातील 70 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 413 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79074 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77267 आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात दोन व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण चार झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 76 हजार 106 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 97 हजार 32 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.03 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.24 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

सोयाबीन व तूर पेरणीची अमरपट्टा पद्धत प्रयोगशील शेतकरी केशवराव भगत यांचा उत्पन्नवाढीसाठीचा प्रयोग

Image
यवतमाळ, दि 16 जून, (जिमाका) :- जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी करतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकाची पेरणी न करता अमरपट्टा पद्धतीने येत्या खरीप हंगामात पेरणी करून तूर व सोयाबीनच्या उत्पन्नात सव्वा ते दीडपट वाढ करावी आणि बियाणे, किटकनाशके व मशागतीवर होणारा खर्च वाचवावा, असे आवाहन प्रयोगशील शेतकरी आणि अमरपट्टा पद्धतीचे जनक केशवराव भगत यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर जवळील चांभई शिवारात अकरा वर्षांपूर्वी प्रयोगशील शेतकरी असलेल्या केशवराव भगत यांनी सोयाबीन व तूर पिकाच्या पेरणीचा हा प्रयोग केला. आणि या पीक पेरणी पध्दतीला त्यांनी नाव दिले अमरपट्टा. अर्थात जो कधीही मरणार नाही तो अमरपट्टा. अमरपट्टा पध्दतीने सोयाबीन व तूर बियाण्यांची पेरणी करतांना सात दाती पेरणी यंत्रातील तूरीच्या बॉक्सच्या आजूबाजूचे दोन्ही बॉक्स बंद करण्यात येतात. त्यामुळे तूरीच्या दोन्ही बाजूला अडीच फुटाची मोकळी जागा शिल्लक राहून त्याच्या बाजूला सलग चार ओळी सोयाबीनच्या येतात. त्यांचे हे सोयाबीन व तूर पीक पेरणीच्या तंत्राचे अनुकरण सुरुवातीला मोजक्