शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत 13 जून रोजी

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा यवतमाळ, दि 9 जून, (जिमाका) :- शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 13 जून 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक कंपन्याचे प्रतिनिधी तसेच बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड, औरंगाबाद, एन.आर.बी. बेअरिंगस लिमिटेड, औरंगाबाद या शहरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. तरी या भरती मेळाव्यासाठी वेल्डर, फिटर, पेंटर जनरल, शीट मेटल वर्कर, मशिनिस्ट, टर्नर, कोपा, विजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे आय. टी. आय. प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच 10वी , 12वी, एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थी यांनी मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्या व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बी.टी.आर.आय. औद्यगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. बी. भंडारे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी