मधमाशा पालन योजना

लाभार्थ्यांकडून 30 जून 2022 पर्यंत अर्ज आमंत्रित यवतमाळ, दि 7 जून, (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता करीता पात्र व्यक्ती / संस्थाकडुन 30 जून 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. योजनेची वैशिष्टे - मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती. मधमाशाद्वारे शेतीपिके व फळबागायतीच्या पीकांचे परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात 80 टक्केपर्यंत वाढ होण्यास मदत होते. योजनेतील प्रमुख घटकाकरिता पात्रता- वैयक्तिक मधपाळ- अर्जदार साक्षर असावा, स्व:ताची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त. केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ- किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त, अशा व्यक्तिच्या नांवे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था - संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेले सेवक असावेत. अर्टी व शर्ती – लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य. अधिक माहितीसाठी संपर्क – जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, तिसरा मजला दारव्हा रोड, यवतमाळ, दुरध्वनी क्र. 07232–244791 मो.न. 9420771535. २) संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5, मु.पो. ता.महाबळेश्वर, जिल्हा सातारा, दुरध्वनी क्र. 02168-260264 तरी वरीलप्रमाणे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, यवतमाळ, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी