राज्य मागासवर्ग आयोगाची जन सुनावणी 5 जुलै रोजी अमरावतीला

यवतमाळ, दि 22 जून, (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केली असून अमरावती विभागाची सुनावणी 5 जुलै 2022 रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सकाळी 11 वाजतापासुन सुरू होणार आहे. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ., हडगर, तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत तसेच केवट समाजातील तागवाले/तागवाली इत्यादी जाती जमातीच्या लोकांनी सुनावणीस उपस्थित राहावे असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी