रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करा

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी करावी. तसेच ज्या उमेदवारांच्या नावात बदल, आधारकार्ड, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता याबाबत नमुद संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करुन घ्यावी. उमेदवारांनी जुना युझर आयडी, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकुन खाते उघडावे. आपला आधार क्रमांक व अचुक माहिती नमुद करुन सबमिट करावे. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकुन सबमिट करावे. त्यानंतर उमेदवारांनी माहिती भरुन पासवर्ड तयार करावा व तो सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी व पासवर्ड चा मेसेज येईल.त्यानंतर मुख्य होम पेजला भेट देवुन मोबाईल क्रमांकावर आलेल्या युझरनेम पासवर्डव्दारे लॉगईन करुन आपली संपुर्ण माहिती भरुन जनरेट रिसिप्ट व्दारे आपल्या रोजगार नोंदणी कार्डच्या प्रतीची प्रिंट प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी