पुसद प्रकल्प कार्यालयातंतर्गत आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा संपन्न

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे द्वारा पुरस्कृत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पुसद जि.यवतमाळ व्दारा आयोजित आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धा दिनांक 24.06.2022 रोजी पुसद येथील कलावती पाटील मंगल कार्यालय येथे मोठया उत्साहात पार पडली. मनमोहक व उत्सफुर्तशाली अशा या कार्यक्रमाचे उदघाटन मा. साईनाथ नरोट, सहाय्यक वनसंरक्षक, पुसद यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आत्मारामजी धाबे, प्रकल्प अधिकारी, पुसद हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन ॲड. सुनिल ढाले, अध्यक्ष, प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समिती, पुसद तसेच समितीचे सदस्य पांडुरंग व्यवहारे, शिवाजी खरवडे, कु.पुजा खुडे यांच्यासह डॉ. प्रशांत नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी, पुसद दिपक ढुमने, सहा.पोलिस निरीक्षक,पुसद पिठलेवाड, माजी पोलिस निरीक्षक हे उपस्थित होते. तसेच आदिवासी समाजसेवक रामकृष्ण चौधरी व नारायण क-हाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मारोती भस्मे, नाईकडा समाज संघटनेचे अध्यक्ष नारायण पिलवंड व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप, पुसद कार्यालयातील अधिकारी राजेंद्र अहिर, श्रीमती दक्षा बोराळकर, विष्णु चव्हाण, केशव शेगोकार, संदिप राऊत, अरुण चव्हाण, श्रीमती अग्रहरी, मेटांगे, लोणीकर, गजभिये, वीर, श्रीमती वानखडे हे उपस्थित होते. सदर नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमास पुसद, दिग्रस, नेर, दारव्हा, आर्णि, महागाव व उमरखेड या तालुक्यातील आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आंध, गोंड, कोलाम, नाईकडा या आदिवासी जमातीमधील नृत्य पथकांनी मनमोहक अशी पारंपारिक व समाज जागृतीपर आपली नृत्यकला सादर केली. सदर नृत्य स्पर्धेत जवळपास 13 सामुहिक नृत्य पथके सहभागी झाली होती. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य बिरसा मुंडा व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत करण्यात आले. वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनावर पाझारे सर यांनी गीत गाऊन सर्व प्रेक्षकांची मने जिकंली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रामकृष्ण चौधरी, ॲड. सुनिल ढाले, डॉ.प्रशांत नाईक यांनी सामाजिक उद्बोधन व विकासात्मक दृष्टिकोन सांगुन आदिवासी कलागुणांचे जतन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच आदिवासी संस्कृती व लोककलांचे जतन व संवर्धन व्हावे या करीता सदर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मा.आत्माराम धाबे साहेब यांनी मनोगतात सांगीतले. तसेच सांस्कृतिक भवन, प्रकल्प कार्यालय, वसतीगृह यासाठी जमीन उपलब्ध झाली असुन इमारत बांधकाम लवकर पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले व समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिहक उन्नतीसाठी प्रकल्प कार्यालय कठिबध्द राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमास सहभागी झालेल्या नृत्यपथकांमधुन जय सेवा गोंडी ढेमसा नृत्य पथक, बेलोरा यांनी प्रथम, विश्वनाथ दंडार नृत्य पथक, कोरटा यांनी व्दितीय, बिरसा ढेमसा नृत्य पथक, पाळोदी यांनी तृतीय क्रमांक मिळविला तसेच भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघ यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. विजेते पथकांना रोख रक्कम, शिल्ड व बुके देवून सन्मानीत करण्यात आले. आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे परीक्षण अमोल भालेराव व श्रीमती प्रत्येकी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र अहिर,स.प्र.अ. विकास यांनी तर सुत्रसंचालन शितल पोलकडे, नारायण राऊत व पाझारे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनयना अग्रहरी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गजानन खडीकर, रविंद्र घडयाळे, सतिश सपकाळ, गौतम इंगोले, सुनिल साबळे, श्रीधर चांगुणे, गृहपाल धिरज वाकडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी