गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह

 

 

यवतमाळ, दि 2 जून, (जिमाका) :-   गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला असून सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात एक व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण दोन आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 404 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 403 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79069 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77264 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. 

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथील एका 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 69 हजार 808 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 90 हजार 739 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.03 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.25 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.  

            नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी