कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण सम्मेलन कार्यक्रम संपन्न

 


 

          यवतमाळ, दि 1 जून, - कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे 31 मे रोजी गरीब कल्याण संमेलन व प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचे थेट ऑनलाईन सवांद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.  एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ तसेच प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक डॉ.विजय माने, सहयोगी अधिष्ठाता, अन्नतंत्रद्यान महाविद्यालय, यवतमाळ, डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ, मान्यवर  उपस्थित होते.

या प्रसंगी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी शिमला येथून साधलेल्या सवांदाचे थेट प्रक्षेपण उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.  तद्नंतर कृषी विज्ञान केंद्र येथे  डॉ.  एन. डी. पार्लावार यांनी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी लागणारे पीएसबी, रायझोबिअम आणि अझाटोबैक्टार जैविक सवर्धने महत्व याविषयी मार्गदर्शन केले तसेच ते महाविद्यालय व कृविके  येथे  विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा असे  अवाहन केले.

 मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी कार्यक्रामाचे महत्त्व  व उद्देश या प्रंसगी विषद केले.  कार्यक्रामाचे  मार्गदर्शक सहयोगी अधिष्ठाता डॉ.विजय माने यांनी शेती पूरक व्यवसायाचे महत्व तर  डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी पिकाचे कमी खर्चिक कीड व रोग  व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये  डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी खरीप हंगामातील पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन व  डॉ. एस. एस. वाणे,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी यांनी सुधारित कृषि अवजाराचा लागवडीसाठी वापर या विषयी मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे संचालन विशाल राठोड, प्रयोगशाळासहाय्यक(माती परीक्षण), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रतिक रामटेके कार्यलयीन अधीक्षक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  केले, असे कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळतर्फे कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी