सैनिकी मुलींचे वसतिगृहात सत्र 2022-23 साठी प्रवेश सुरू

यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- शैक्षणिक सत्र 2022-23 करीता यवतमाळ येथील शाळा, महाविद्यालयात उच्च शिक्षणाकरीता प्रवेश घेतलेल्या युध्द विधवा, माजी सैनिक विधवा, आजी / माजी सैनिकांच्या मुलींना वीरमाता रमाबाई पंडित व जनरल पंडित सैनिकी मुलींचे वसतिगृह, शासकीय रुग्णालयासमोर, यवतमाळ येथे प्रवेशप्रक्रीया सुरु करण्यात येत आहे. वसतिगृहामध्ये एकुण 25 विद्यार्थींची क्षमता असुन त्यात माजी सैनिकांचे अनाथ पाल्यांना भोजन, मोफत निवास व माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात शुल्क आकारण्यात येते. तसेच वसतिगृहात जागा शिल्लक असल्यास इतर नागरिक यांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 अशी आहे. तरी मुलींना वसतीगृहामध्ये प्रवेश घेणे करीता आपले ओळखपत्र, डिस्चार्च पुस्तक, प्रवेश घेतलेल्या शाळा/महाविद्यालयातील बोनाफाईड प्रमाणपत्र घेवुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ (फोन नंबर 07232-245273) किंवा सैनिकी मुलींचे वसतिगृह, शासकीय रुग्णालयासमोर, यवतमाळ येथे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी