स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 14 जून रोजी महारक्तदान शिबीर



वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी रक्तदानाचा संकल्प करावा

-        निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे

 

यवतमाळ, दि 1 जून, (जिमाका) :- 14 जून रोजी वटपौर्णिमेचा सन येत असून या दिवशी महिलांनी महारक्तदान शिबीरात रक्तदान करून अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्तदाता दिवस’ म्हणून घोषित केलेला आहे. या दिवसाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 14 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांच्या मदतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी वऱ्हाडे यांनी आज शासकीय अधिकारी व सामाजिक संस्थांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष जलालुद्दिन गिलाणी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक घनश्याम दरणे प्रामुख्याने उपस्थित होते.

आरोग्य विभागाला गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते.  त्यांची ही गरज भागविण्यासाठी  महारक्तदान शिबीरात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, खाजगी संस्था, आस्थापना, महाविद्यालयीन विद्यार्थी, एन.सी.सी. व एन.एस.एस. चे विद्यार्थी, खेळाडू, गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळ, शिकवणी वर्ग, उद्योजक, बचट गट व नागरिकांनी महारक्तदान शिबीरात सहभाग नोंदवावा. रक्तदानास इच्छुक आपल्या अधिनस्त कर्मचारी तसेच सहकारी वर्गाची यादी 8 जूनपर्यंत सादर करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला विविध शासकीय विभागाचे विभागप्रमुख, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी