जिल्ह्यात 25 जुन ते 1 जुलै पर्यंत कृषी संजिवनी मोहीम

यवतमाळ, दि 24 जून, (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजिवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनीक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. याअंतर्गत 25 जुन रोजी विविध पीकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दिन, 27 जुन रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन,28 जुन रोजी खत बचत दिन, 29 जुन रोजी प्रगतिशील शेतकरी दिन, 30 जुन रोजी शेतीपुरक व्यवसाय दिन व 1 जुलै रोजी कृषी दिन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी सदर सप्ताहामध्ये तालुकानिहाय विविध ठिकाणी होणाऱ्या शेतकरीसभा, प्रशिक्षण प्रात्यक्षिक, शेतीशाळा व शिवार फेरीमध्ये शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी