आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनानिमित्त 12 जून रोजी जनजागृती अभियान

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ, दि 10 जून, (जिमाका) :- 12 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात 2002 पासून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ तथा बालकामगार कृती दलाचे सदस्य सचिव चा.ब. काशिद यांच्या द्वारे बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान व सप्ताह यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये जिल्ह्यातील दुकाने हॉटेल्स व्यापारी संस्था व इतर आस्थापनांच्या व्यापारी बंधूंना बालकामगार या अनिष्ट प्रथा विरुद्ध जागृत करण्यात येईल तसेच त्यांना बालमजुरी निर्मूलनाचे महत्त्व समजून सांगण्यात येऊन जनजागृती करण्यात येईल. आमच्याकडे बालकामगार काम करीत नाही यापुढेही बालकामगार ठेवणार नाही असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरून घेण्यात येईल. लहान वयात काम केल्यामुळे बालकांच्या त्वचा, श्वसन मार्ग संस्था, मेंदू, जठर संस्था यावर विपरीत परिणाम होतो. त्यांची मानसिक शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. चांगले जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे तो आपण सर्वांच्या प्रयत्नाने व मदतीने त्यांना मिळाला पाहिजे. त्या निमित्याने बालमजुरी मुक्त महाराष्ट्र या मोहिमे मध्ये सुद्धा जागरूक नागरिक म्हणून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन चा.ब. काशिद सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ यांच्या द्वारे करण्यात आले आहे. --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी