आदिवासी कोलाम सांस्कृतिक महोत्सव-2022

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नांदेड जिल्ह्यातील पथकांना सहभाग घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि 7 जून, (जिमाका) :- आदिवासी कोलाम संस्कृतीचे जतन करण्याकरीता आदिवासी समाजाच्या पारंपारिक दंडार नृत्य, ढेमसा नृत्य, पारंपारीक वेशभुषा, हस्तकला, चित्रकला, कबड्डी (खेळ) आणि पारंपारिक खाद्य पदार्थ बनविणे इत्यादी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जि. यवतमाळ कार्यालयाकडून आदिवासी कोलाम सांस्कृतिक महोत्सव-2022 चे आयोजन दिनांक 18 व 19 जून 2022 रोजी करण्यात येणार आहे. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यातील कोलाम जमातींच्या पथकांनी या सांस्कृतिक महोत्सवातील स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता 14 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजयी पथकाला पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा / किनवट / वर्धा / पुसद / चिमुर व चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा चे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी