कोविड सानुग्रह अनुदानाचा 50 हजार निधी प्राप्त न झाल्यास

आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- कोविड-19 आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास शासनातर्फे रुपये 50 हजार सानूग्रह सहाय प्रदान करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ऑनलाईन पध्दतीने काही पात्र अर्जदारांच्या बॅंक खात्यात रुपये 50 हजार इतके सानूग्रह अनूदान जमा करण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्यावरही अनुदान खात्यात जमा झालेले नाही. महसूल व वनविभाग यांचे पत्रानूसार अर्जदारांच्या बॅक तपशील बरोबर नसल्याने किंवा आधार बॅंक खात्याशी सलंग्न नसल्याने सानूग्रह मदत जमा झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. करीता ज्या अर्जदारांना पैसे जमा झाल्याचा मॅसेज येत आहे परंतु खात्यात पैसे जमा झालेले नाही त्या सर्व अर्जदारांनी अर्ज केल्याचा टोकन आयडी, बॅंक खाते पासबुक, पर्यायी बॅक पासबूक इत्यादी माहितीसह आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे भेट द्यावी. अधिक माहिती करीता 07232-240720 / 242488 तसेच 7620046636 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी