पीक कर्जाची परतफेड 30 जून पुर्वी करून

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्या जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांचे आवाहन यवतमाळ, दि 14 जून, (जिमाका) :- सन 2021-22 या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकरी सभासदांनी त्यांचेकडील पीक कर्जाचा भरणा 30 जून 2022 पुर्वी करून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा संबंधीत बँक शाखा अथवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच सचिव याचेकडे 30 जूनपुर्वी केल्यास ते 21 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभास पात्र राहतील असे उपनिबंधक रमेश कटके यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी