खान कामगारांसाठी सुरक्षा जागरूकता शिबीर संपन्न

यवतमाळ, दि 14 जून, (जिमाका) :- जिल्ह्यातील विविध गैर कोळसा खदानी मध्ये कार्यरत कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी खान अधिनियमाची माहिती तसेच 'सिलिकोसिस' या घातक बिमारी पासून बचाव करण्याबाबतच्या उपाययोजनाची माहिती सुरक्षा जागरूकता शिबीराचे आयोजन काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्ह्यातील गैर कोळसा खदान मालक व खान व्यवस्थापक, गौण खनिजाशी संबंधीत सर्व खनिपट्टेधारक यांच्या उपस्थितीत पावर पॉईन्ट सादरीकरणद्वारे विस्तृत माहिती खान निदेशालयाचे निदेशक सागेश कुमार व उपनिदेशक एम. के. गुप्ता यांनी दिली. शिबीराचे आयोजन जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी