जिल्ह्यातील नवयुवकांनी उद्योग निर्मितीसाठी समोर यावे

 

 

उद्यमिता यात्रेचे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

 

Ø  बचत गटाच्या महिला उद्योजकांनी प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा

           

यवतमाळ, दि 31 मे, (जिमाका) :- जिल्ह्यात कृषी पुरक उद्योग, मत्सव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, तेलबिया प्रक्रिया, अन्नप्रक्रीया आदि क्षेत्रात रोजगार व उद्योग निर्मितीसाठी मोठा वाव आहे. तसेच उद्योग निर्मितीसाठी रोजगार निर्मिती योजना, आदिवासी क्षेत्रासाठी पोकरा योजना व इतर विविध विविध योजनेअंतर्गत उद्योगांना अर्थसहाय्य केले जाते. याचा लाभ घेवून जिल्ह्यातील नवउद्योजकांनी उद्योग निर्मितीसाठी समोर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

           

उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शेतकरी स्वावलंबन भवन येथे काल करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, माविमचे रंजन वानखेड़े, उमेदचे निरज नखाते, व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सीडाम, आयटीआय चे प्राचार्य प्रमोद भंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.

            उद्यमिता प्रशिक्षण शिबीरात महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी तज्ञ मंडळीकडुन उद्योगाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आपला उद्योग समोर नेण्यासाठी या प्रशिक्षण शिबीराचा व शासकीय योजना जाणून  घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्याचे तसेच इतर उपलब्ध साधनसंपत्तीचा चांगल्या प्रकारे वापर करून उद्योग व रोजगार वाढविण्याचे सांगितले.

कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी गरजु व होतकरु उमेदवारांकरीता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विकास, जिल्हा प्रशासन व युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30, 31 मे, व 1 जून 2022 या कालावधीत उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे सांगितले.

            कार्यक्रमाला जिल्हातील नऊद्योजक तसेच बचतगटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी