Posts

Showing posts from March, 2018

शेतक-यांचे आत्मबल वाढविणे हा कृषी महोत्सवाचा गाभा - पालकमंत्री मदन येरावार

Image
                                                v पोस्टल ग्राऊंड येथे पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 17 : शेती आणि शेतकरी हे सुरवातीपासूनच मानाचे बिंदू राहिले आहेत. उत्पादन निर्मितीचा आनंद देऊन जगाला पोसण्याचे शेती हे एक तंत्रज्ञान आहे. शेतक-यांना शेतीबाबत नवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान, विविध पीक पध्दती याविषयी माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याची संकल्पना समोर आली. त्यासाठी गतवर्षीपासून विशेष निधीची तरतूदसुध्दा करण्यात आली आहे. ख-या अर्थाने शेतक-यांचे मनोबल वाढविणे, हा कृषी महोत्सवाचा गाभा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, दारव्हाचे नगराध्यक्ष बबन इरवे, कृषी संशोधन केंद्राचे डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिका

सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक कामासाठी करा - अपर जिल्हाधिकारी जाजू

Image
                                               v जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सोशल मिडीया महामित्र उपक्रम यवतमाळ, दि. 16 : सुरवातीच्या काळात माहिती मिळण्याचे पर्याय मर्यादीत होते. मात्र आजचे युग हे माहितीचे युग आहे. विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. ही माहिती अनेक स्त्रोतांद्वारे आपण मिळवू शकतो. त्यातच सोशल मिडीया प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे चांगले समाजमन घडविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक पध्दतीने करा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय आणि जि.प. उर्दु कन्या शाळेत घेण्यात आलेल्या सोशल मिडीया महामित्र उपक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्थेच्या सहनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, डॉ. नितीन खर्चे, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने आदी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे संपूर्ण राज्यात सोशल मिडीया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सदर उपक्रम घेण्यात आला. यावेळी बोलतांना अपर ज

पालकमंत्र्यांची आसोला येथे भेट

Image
यवतमाळ, दि. 11 : किडनी आजारामुळे प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ तालुक्यातील आसोला या गावाला पालकमंत्री मदन येरावार यांनी आज (दि.11) भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी. धोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी किडनी आजार नेमका कशामुळे झाला, याची विचारणा करून पाण्याचे नमुने, नागरिकांच्या रक्तगटाची चाचणी आदी तपासण्याचे आदेश दिले. नेमका आजार कशाने झाला हे तांत्रिकदृष्टया शोधणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये असलेली भीती घालविण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये काही समस्या असेल तर त्यात तात्काळ सुधारणा करा. किराणा दुकानातून छोट्या-मोठ्या आजारासाठी औषधी घेतली जाते, असे निदर्शनास आणून देताच औषधी व अन्न प्रशासन विभागाने याबाबत तात्काळ तपासणी करावी. ज्या किराणा दुकानातून औषधी विकली जात असेल अशा दुकानांवर कारवाई करून ते सील करावे, असे आदेश त्यांनी संबंधित यंत्रण

अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यातून शेतीमध्ये गुंतवणूक करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
  v जिल्हाधिकारी कार्यालयात शेतक-यांना धनादेशाचे वाटप यवतमाळ, दि. 11 : स्वत:च्या मालकीची शेतजमीन ही आपली आई आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 करीता जिल्ह्यातील शेतक-यांनी कोणतेही आंदोलन न करता विकासात आपले योगदान दिले आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी स्वखुशीने जमिनी दिल्या. शासनानेसुध्दा अतिशय चांगला मोबदला शेतक-यांना दिला आहे. त्यामुळे अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यातून शेतीमध्ये गुंतवणूक केली तर अधिक चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हा‍धिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शेतक-यांना धनादेश वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्राच्या विकासासाठी भौतिक सुविधा महत्वाच्या आहेत. त्यासाठी मोठमोठ्या विकास प्रकल्पाकरीता शासनाच्यावतीने जमीन अधिग्रहीत केली जाते. आपल्या जिल्ह्यातसुध्दा शेतजमिनीचा आवश्यक काही भाग या राष्ट्रीय महामार्गासाठ

भारी गावात जिल्हाधिका-यांनी केली शिवार फेरी

Image
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यवतमाळ, दि. 10 : पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप 2018 मध्ये भारी गावाने सहभाग नोंदविला आहे. या अंतर्गत गावातील पाच नागरिकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. गावाने स्पर्धेपूर्वी करावयाच्या कामास सुरूवात केली आहे. या कामाची पाहणी व नियोजनाकरीता शिवारफेरी काढून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख गावात पोहचले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार सचिन शेजाळ, सरपंच गणपत गाडेकर, उपसरपंच शिलानंद कांबळे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, अशोक बगाडे  आदी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी गावक-यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शिवाराची पाहणी केली. जलसंधारणाकरीता माथा ते पायथा उपचार किती महत्वाचे हे सांगताना  अनघड दगडी बांध, गेबियन बंधारा, पाझर तलाव, शेततळे कुठे घ्यावे, याबाबत प्रशिक्षणार्थी व गावक-यांसोबत चर्चा केली. सर्व उपचार हे शास्त्रधारीत असावे, याकरीता स्वतः जिल्हाधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी जाऊन उपचाराची स्थळ निश्चिती केली.  सोबतच गावात     होणा-या शोषखड्ड्यांची पाहणी करत हे खड्डे गुणवत्तापूर्वक होण्याकरीता सूचना दिल्या.  शाळक

पाणी टंचाई निवारणासाठी सर्वांनी सहकार्य करावे - पालकमंत्री मदन येरावार

Image
                                 v जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक             यवतमाळ , दि. 10 : पाणी टंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे, याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता येणार नाही. या कठीण काळात योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जनतेला पाणी मिळण्यासाठी जे काही करता येईल, ते प्राधान्याने केले जाईल. त्यासाठी शासन-प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, न.प. मुख्याधिकारी अनिल अढागळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे आदी उपस्थित होते.             भविष्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नये म्हणून अमृत योजनेला मान्यता मिळाली आ

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 14 कोटींची मदत तालुक्याला वितरीत

* शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यवतमाळ , दि. 07 : गत महिन्यात जिल्ह्यात झालेल्या गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 14 कोटी 3 लक्ष 31 हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला 6 मार्च रोजी सायंकाळी प्राप्त झाला. हा निधी कालच तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी तहसीलदारांना दिले आहे. जिल्ह्यात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे जिल्ह्यात एकूण 11 हजार 90 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात 33 ते 50 टक्क्यापर्यंत 8 हजार 329 हेक्टर तर 50 टक्क्याच्या वर 2 हजार 761 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाला बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. अहवाल प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने सदर अहवाल शासनाकडे पाठविला. त्यानुसार जिल्ह्यातील गारपीट